• Register

हिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय?

1,361 views
asked May 8, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (10,840 points)

2 Answers

0 votes
 
Best answer
३३ कोटी या शब्दाचा अर्थ इथे ३३ करोड संख्यात्मक नसून कोटी या शब्दाचा अर्थ आहे, प्रकार, दर्जा किंवा श्रेणी.

खादी व्यक्ती उच्च कोटीची आहे म्हणजे त्या व्यक्तीची पात्रता उच्च कोटीची आहे, .त्याचप्रमाणे देवांची सुद्धां पात्रतेप्रमाणे ३३ प्रकार केले गेले आहेत.

समजा आपण एखाद्या कार्यालयात कामासाठी गेलो तर आपण त्यात्या श्रेणीच्या अधिकार्‍याकडे जातो, आणि आपले काम करून घेतो, त्याच प्रमाणे देवांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे श्रेणी आहेत.

३३ प्रकारचे देव कोणते, तर ते खालीलप्रमाणे -

धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य.
(संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)

 

धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु.
(संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)

 

हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र.
(संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)

 

आणि अदिक २ अश्विनीकुमार!

अशा प्रकारचे ३३ कोटी म्हणजे ३३ प्रकारचे देवांचे प्रकार.
answered May 8, 2015 by TransLiteral (10,840 points)
selected Jul 4, 2015 by TransLiteral Admin
0 votes

अजुन एक उत्तर 

 

बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे.

कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत.

प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे : 
आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . अकरा

रूद्रांची नावे : 
मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

बारा आदित्यांची नावे : 
अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.

असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३.

answered Jul 12, 2015 by TransLiteral (10,840 points)
...