• Register
3.3k views
in Hindu - Traditions by (11.2k points)

1 Answer

+1 vote
घरातील शुभकार्य व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावे, म्हणून घरात कुलदैवत आणि विविध देवी देवतांची स्थापना करून पूजा केली जाते यांस ' देवक '

पूजणे अथवा ठेवणे म्हणतात. देवक फक्त ज्येष्ठांकडूनच पूजले जाते, अन्यथा घरातील कोणीही पुरूष व्यक्ति चालते.

 

देवकाआधी सर्व घार्मिक विधी कराव्या लागतात, कारण प्रत्यक्ष देवच आपल्या घरी आल्याची भावना असते. म्हणून ब्राह्मणाकडून पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध,

मातृकापूजन केले जाते.

विवाहप्रसंगी वर आणि वधू, दोघांचेही घरी शुभ कार्य असल्याने देवक बसविले जाते.

देवक बसविल्यानंतर त्या घरातील कोणीही व्यक्ति कोणत्याही अशुभ कार्याला हजेरी लावत नाही. एकदा देवक बसविल्यानंतर त्या घरात कांहीही अशुभ घटना

घडली तरी विवाह थांबत नाही अगदी घरात कोणी दगावले असतांना सुद्धां.
by (11.2k points)
...