• Register

कुंभमेळ्याबद्दल माहिती द्या? नजिकचा कुंभमेळा कोठे आहे ?

475 views
asked Mar 21, 2015 in Hindu - Traditions by TransLiteral (9,340 points)

1 Answer

+1 vote
 
Best answer

अयोध्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत ज्ञानदास यांनी कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा केलीय. 12 वर्षांतून एकदा हा महाकुंभ सोहळा आयोजित केला जातो. 

यापूर्वी 2003 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा झाला होता. त्यानंतर आता 2015 मध्ये कुंभमेळा होणार आहे... 

या कुंभमेळ्याच्या तारखांवर एक नजर टाकूयात.... 
* 19 ऑगस्ट 2015 - आखाड्यांचे ध्वजारोहण पर्व
* 29 ऑगस्ट 2015 - पहिले शाही स्नान
* 13 सप्टेंबर 2015 - दुसरे शाही स्नान
* 18 सप्टेंबर 2015 - तिसरे शाही स्नान

.............................................................................................................................................

आख्यायिका व पौराणिक संदर्भ[संपादन]

समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वारप्रयागउज्जैन व त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही व बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र व गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

answered May 9, 2015 by Jeevanlal Patel 1 (710 points)
selected Jul 4, 2015 by TransLiteral Admin

Related questions

...