• Register

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?

779 views
asked Jul 9, 2014 in Hindu - Traditions by TransLiteral (10,840 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
"आषाढी एकादशीचा अर्थ" :
आषाढी एकादशीचा नक्की significance(प्रयोजन) काय असेल? हा प्रश्न आपल्याला कधी ना कधी पडलाच असेल! आज आषाढी एकादशी म्हणजेच "देवशयनी एकादशी"...(स्मार्त एकादशी आज आहे व भागवत एकादशी उद्या आहे... हा फ़रक चांद्र गणनेमुळे पडतो [Lunar calendar] असो.)

पण देवशयनी एकादशी म्हणजे नक्की काय हो? देव शयनी म्हणजे देव ज्या दिवशी शयन करतात, निजतात तो दिवस...आणि कार्तिकी एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो दिवस...आता मला सांगा, देव कधी असा निजेल किंवा उठेल का हो? तर यामागे फ़ार मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे!
आपला भारतदेश हा मान्सून पट्ट्यात येणारा! अर्थात इथे चारच महिने पाऊस!  ज्येष्ठ, आखाड (आषाढ), श्रावण आणि भादवा (भाद्रपद)...
त्यामुळे पेरण्या ज्येष्ठात होतात...त्या करायच्या आणि एकदा देवाला मनोमन भेटून त्याला निजवून यायचे! अर्थात तिथुन पुढच्या काळात शेतात अधिक कष्ट आवश्यक असल्याने, देवाला विनवायचे की बाबारे, आता मला तुझ्या भजनात, पूजनात अधिक काळ नाही रमता यायचे, हे चारच महिने मला जरा मोकळीक दे,,,मी अपार कष्ट करून या ४ महिन्यात पीके उगवेन आणि मग पुन्हा तुला उठवायला येईन!

अश्विनात तोडणी, कार्तिकात मळणी आणि धान्याच्या गोण्या भरून झाल्या की देवोत्थान!!! किती सुंदर आणि डोळस शास्त्र आहे पहा!

भक्तीलाही पूर्ण न्याय आणि कर्तव्यालाही!!!
धन्य धन्य तो सनातन धर्म!!

 
समर्थही दासबोधात हेच सांगुन गेले आहेत...
आधीं प्रपंच करावा नेटका | मग घ्यावें परमार्थविवेका |
येथें आळस करूं नका | विवेकी हो ||
प्रपंच सांडून परमार्थ कराल | तेणें तुम्ही कष्टी व्हाल |
प्रपंच परमार्थ चालवाल | तरी तुम्ही विवेकी ||
प्रपंच सांडून परमार्थ केला | तरी अन्न मिळेना
खायाला | मग तया करंट्याला | परमार्थ कैंचा ||

 
पुंडलिकावरदे हरि विठठल!!! श्रीज्ञानदेव तुकाराम!!!!
पंढरीनाथ महाराज की जय! माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!!!
 
Reference :
A post by भेटी लागी जीवा  / https://www.facebook.com/amuekvedaticha Dated: July 9, 2014.
answered Jul 9, 2014 by TransLiteral (10,840 points)
selected Jan 31, 2015 by TransLiteral Admin
...