• Register
2.4k views
in Hindu - Traditions by (11.2k points)

2 Answers

0 votes
 
Best answer

सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा , उदाहरणार्थ हरिपाठ वाचन , गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप ,कीर्तन ,प्रवचन करण्यास हरकत नाही . नित्याची नोकरी , कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये . सुतकामधे पलंग , गादीवर झोपु नये , चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये , नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी , सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू , टिकली गंध लावावे .

 

by (1.1k points)
selected by
0 votes
सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
by (50 points)
...