• Register

वास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे? त्याचे परिणाम जाणवतात काय?

1,135 views
asked Jun 30, 2014 in Hindu - Beliefs by TransLiteral (10,840 points)

1 Answer

0 votes
वास्तुशास्त्र हा केवळ एक श्रद्धेचा भाग आहे. एक उदाहरण घेऊ - रोज आपण एका रस्त्याने जात असतो, दिवसा किंवा रात्रीही. आपण अजिबात घाबरत नाही. पण समजा एके दिवशी कोणी आपल्याला सांगीतले की इथे भूत आहे मग मात्र आपल्याला त्या रस्त्याने जायला भिती वाटते. जोपर्यंत आपण वास्तु पहात नाही तोपर्यंत कांही नाही पण जर एकदा वास्तु पाहिली आणि कोणी सांगितले हा कोपरा दिशेत नाही तर लगेच मनांत भिती उत्पन्न होते आणि कांहीही अशुभ घडले की वाटते त्या दिशेतील दोषामुळेच घडले. वास्तु पाहतांना जर त्या घराच्या मालकाच्या पत्रिकेत दोष असेल तर? आणि पत्रिकेतील ग्रह उत्तम आहेत आणि वास्तुत दोष असेल तर? या सर्वांची गोळाबेरीज काय? साधारण वीसेक वर्षांपूर्वी वास्तुशास्त्र पहात नव्हते. दहा बाय दहाच्या खोलीला कसले वास्तुशास्त्र? त्या घरातील कुटुंबाची प्रगती झालीच नाही काय? इतर धर्मात वास्तु पहात नाहीत मग त्यांचे काय?

हा फक्त श्रद्धेचा भाग आहे.
answered Jul 4, 2014 by TransLiteral (10,840 points)
Vastushastra has some scientific support as well. For e.g. East Facing home is preferred / recommended in Vastushastra. Science behind that is during morning hour, if we get morning sunrays, it helps to increase Vitamin D in Human Body which helps n improving resistance power. Same way, there is logic behind every aspect. One should not blindly follow it, but understand it from a context of that property & rationale behind suggestion.

Related questions

...