Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.
182 views
in Hindu - Beliefs by (11.2k points)

1 Answer

0 votes
‘‘वैराग्य हे वृत्तीत असते. भगवंताने जे दिले त्यात समाधान असून इतर काही हवे असे न वाटणे म्हणजे वैराग्य होय.’’
देहाच्या ठिकाणी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते.
वैराग्याच्या चार अवस्था -

१ - यतमान वैराग्य -
एकदा वैराग्याचा उदय झाला म्हणजे मुमुक्षूकडून विषयवासना जिंकण्यासाठी चढता प्रयत्न सतत केला जातो, त्यास यतमान वैराग्य म्हणतात.

२ - व्यतिरेक वैराग्य -
चित्तात वासना असणे हा त्यांचा चित्तातील अन्वय होय आणि त्या चित्तातून नाहिशा होणे हा त्यांचा व्यतिरेक होय. आत्मनिरीक्षणाने मुमुक्षूला त्यांचा अन्वय - व्यतिरेक स्पष्ट कळतो. त्यास व्यतिरेक वैराग्य म्हणतात.

३ - एकेंद्रिय वैराग्य -
इंद्रिये, मन, बुद्धे ही तिन्ही वासनांचे अधिष्ठान होत. इंद्रिये व मन स्वाधीन झालेली असली तरी बुद्धी या अधिष्ठानात वासना बीजरुपाने उरलेली असल्यामुळे तिची जागृती न होण्यासाठी साधने चालू ठेवण्याची आवश्यकता संपत नाही. या वैराग्याच्या अवस्थेला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात.

४ - वशीकार वैराग्य -
या अस्वस्थेत वैराग्य हा योग्याचा सहजस्वभाव बनलेला असतो. वैराग्यासाठी साधनांची गरज उरत नाही. व्युत्थान दशेतही (समाधी उतरणे म्हणजे व्युत्थान) त्याच्या चित्तात वासना अंकुर उद्भवत नाही. या वैराग्यास वशीकार वैराग्य म्हणतात.
by (11.2k points)
...