• Register

उपासना किती प्रकारची असते?

41 views
asked Aug 2 in Hindu - Puja Vidhi by TransLiteral (11,160 points)

1 Answer

0 votes
उप+आसन.
उप म्हणजे सान्निध्य, निकटपणा, आसन म्हणजे बसणे. उपासनेत ज्याची उपासना करावयाची त्या उपास्य देवतेच्याजवळ तनमनधनाने राहून त्याची भक्ती करावयाची असते. ‘शिवं भूत्वा शिवं यजेत्‍’ म्हणजे शिवस्वरुप होऊनच शिवाची म्हणजे उपास्य देवतेची उपासना करावी. ही सर्वश्रेष्ठ उपासना होय. प्रकार -
१ - निर्गुणोपासना
२ - सगुणोपासना

१ - निर्गुणोपासना -
अदृश्य, अव्यक्त, अचिंत्य ब्रह्मधर्मभावनेस निर्गुणोपासना म्हणतात. प्रकार -
अ - अहंग्रहोपासना -
अव्यक्तवादी धर्मी ब्रह्म मी आहे अशी संकेतावाचून जी भावना तिला अहंग्रहनिर्गुणोपासना म्हणतात.

ब - प्रणवोपासना -
प्रणवाचे अकार, उकार, मकार या तिहींचा अनुच्चार्य अर्धमात्रेच्या ठायी लय करुन ब्रह्मधारणा करणे.

२ - सगुणोपासना -
सगुणसाकार होणार्‍या ईश्वराची उपासना.

प्रकार -
अ - वैराज -
विश्वरुप पुरुषाची उपासना.
ब - प्रतिकोपासना -
एकांगरुप - आदित्य, अग्नी इ. ची उपासना, सर्वांगरुप - प्रतिमांची उपासना, बिंदुरुप - शालिग्रामादी पंचायतनोपासना.

उपासनेची फळे -
१ - दृष्ट फळे -
धनप्राप्ती, भयनिवारण इ.
२ - अदृष्ट फळे -
पुण्यप्राप्ती
३ - क्रमोमुक्ती -
लोकांतर प्राप्ती
४ - जीवन्‍ मुक्ती -
निष्काम उपासनेचे स्वरुपानुभव.
answered Aug 2 by TransLiteral (11,160 points)
...