• Register

श्राद्धाचें प्रयोजन काय ? आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत ?

617 views
asked Mar 14, 2017 in Hindu - Traditions by TransLiteral (10,920 points)

1 Answer

0 votes
 
Best answer

श्राद्धाचें प्रयोजन :-
मृत मनुष्याचे आत्म्यास सुख व्हावे म्हणून श्रद्धेने अर्थात् भक्तिभावानें जें दान देतात अगर जीं इतर कृत्यें करितात, त्यास श्राद्ध म्हणतात. होम ( अग्नौकरण ), ब्राह्मण - भोजन व पिण्डदान, ही तीन कृत्यें श्राद्धांत मुख्य होत. धर्मसिंधूंत म्हटले आहे कीं, जो श्रद्धा न ठेवितां, पितर नाहींत असें मानून श्राद्ध करीत नाही, त्याचें रक्त पितर पितात !
श्राद्धाचे चार भेद आहेत.

  1. एकोद्दिष्टश्राद्ध - एकाला म्हणजे मृताला उद्देशून एक पिंडानें जें श्राद्ध करावयाचें तें एकोद्दिष्टश्राद्ध
  2. सपिंडीश्राद्ध, - वर्षांती किंवा बारावे दिवशीं अर्घ्य व पिंड यांचे संयोजन करून जें श्राद्ध करावयाचें ते सपिंडीकरणश्राद्ध
  3. पार्वणश्राद्ध - बाप, आजा व पणजा या तिघांस उद्देशून तीन पिंडांनी युक्त असें जें श्राद्ध करावयाचें तें पार्वनश्राद्ध ( प्रतिसांवत्सारिक वगैरे ).
  4. नांदीश्राध - चौल, पुत्रजन्म, विवाह इत्यादि प्रसंगीं जें वृद्धिश्राद्ध करावयाचें तें नांदीश्राद्ध होय.

अंत्येष्टिप्रकरणांत पहिल्या दोन प्रकारच्या श्राद्धांचा समावेश होतो.

answered Mar 14, 2017 by TransLiteral (10,920 points)
selected Jun 5, 2017 by TransLiteral Admin
...