• Register
1.8k views
in Hindu - Beliefs by (11.2k points)
edited by

1 Answer

0 votes
 
Best answer
प्रथम आपला स्थूल देह  म्हणजे अन्नमय कोश गळून पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप झाडावरून पडावे तैसे. यावेळी देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडताचं आत्मा चार कोषच सूक्ष्म देह धारण करून तेव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहाभोवतीच हा आत्मा घूटमळतच असतो. घरात रडारड सुरू होते. शेवटी स्मशानभूमीत या देहावर अग्नीसंस्कार करतात. आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो. म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ.
अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हटले जातात, त्याचा अर्थ असा आहे की, मेलेल्या व्यक्तीला संबोधून मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पाहत असतो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की, आता तुमचा ( आत्म्याचा ) या देहाशी काहीही संबंध राहिलेला नाही, तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात. आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळून टाकणार आहोत, असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर माठ घेऊन प्रेताला अपसव्य डावी प्रदक्षिणा घालतो, या वेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक भोक पाडतात अशा तीन प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणार्‍याच्या मागे ठेवतात, मग खांद्यावरील माठ मागे सोडून देतात फऽऽऽट् असा आवाज होऊन तो फुटतो त्यालाच घटस्फोट असे म्हणतात ( असा नवरा जिवंत किंवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो ) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही येथून जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामध्ये बांधतात याला अष्मा असे म्हणतात. त्यानंतर प्रेताला जाळले जाते. आत्मा हे सगळे पाहत असतो, त्याला आपला देह जाळताना पाहून वाईट वाटते, त्याला रडायला येते, ( येथे अशी कुणी शंका घेऊ नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजूनही चार कोशामध्ये बद्ध आहे व यात मनोमय कोश असल्यामुळे, वासना, भावना असतात ) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो, आत्माही आपल्यासोबत घरी येतो, मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो. म्हणून फडक्यात बांधलेला अश्मावर बसतो. म्हणून फडक्यात बांधालेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात, दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.
घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो. याला नमस्कार करून आलेली मंडळी निघून जातात. घरातली माणसं आंघोळ करून पिठलं भात खायला मोकळी होतात.....
पुढे काय होते ... ?
आत्मा घराबाहेर ठेवतात, आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघून जातात व घरातील मंडळी पिठलं भात खाऊन दुःख करीत बसतात. पुढे अशी अंधश्रद्धा आहे की, मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पीठावर किंवा राखेवर, मेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला, त्याची पावले उमटतात असा सर्वदूर समज आहे, पण हा समज पूर्णतः चूकीचा आहे. लगेच त्याला दूसरा जन्म मिळत नाही, त्याची प्रक्रिया काय आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक आहे. आता फोटो काढण्याची व्यवथा आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो, पण पूरातन काळी फोटो काढण्याची सोय नव्हती, म्हणून त्या आत्म्याचे प्रतिक, आत्मज्योत म्हणून पणतीमध्ये ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेरच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसानंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरु होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्रमैत्रिणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्तीबद्दल घरात चांगलं बोलतात आणि बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पाहत असतो, ऐकत असतो. आपल्याबद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो, हे सगळं त्याला कळतं असतं. त्यामुळे त्याला खूप दुःख होतं व रडायला येतं.
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्तींचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कळशातून कळशासकट करावे.
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेऊन घाटावर जातात. तेथे अग्नी देणार्‍याने क्षौर करावे. म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत, या घाटावर जो विधी केला जातो तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय .... दहाव्या दिवशी ज्या अश्मावर आत्म्याचा वास असतो तो अश्माघेऊन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी संस्कार करतात, आता ते संस्कार म्हणजे काय करतात ते पुढे पाहू...........
एकाने शंका विचारली, की क्षौर का करतात, तर त्याचे उत्तर असे आहे की, जेव्हा आपण एखादे पुण्यकर्म करतो, व्रत करतो, अनुष्ठान करतो, तेव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत. आपण कळत नकळत दररोज कळत नकळत अनेक प्रकारची पापे करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला घट्ट धरून बसतात. म्हणून दर पौर्णिमेला व अमावस्येला प्रत्येकाने क्षौर करावे. अजूनही संन्यासी दर अमावस्या व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फॅशन आहे, एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला आणि दाढी मिश्या भादरल्या की आमचे सर्व हिंदू तरूण आपल डोक भादरून मिशी काढून टाकतील अगदी बाप जिवंत असताना सुद्धा.
थोडक्यात एका जिवाला सद्गती देणं हे सुद्धा पुण्यकर्मच आहे.
त्या मागचा दुसरा हेतू हा असतो की, गेलेल्या माणसाबद्दलची कृतज्ञता, भावना, प्रेम मुंडन करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामध्ये विलिन करतात आणि त्यांना असे सांगितले जाते की, तुमचा देह जाळून टाकला आहे, तुमच्या  नावाने क्षौर केले आहे, आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही, आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा अशा आशयाचा विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात. जर त्या आत्म्याची कशातच वासना राहिलेली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो. अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येऊ देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की, त्यांना मृत्यू व आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथली कुत्री बेसूर रडतात.
जेव्हा महाभारतात धर्मराज पांडवांबरोबर स्वर्गात चालले असतां धर्मराजाच्या मागे सर्व पांडव द्रौपदीसह पडले आणि त्यांनी देह सोडला पण धर्मराजाला एक कुत्रा स्वर्गाची वाट दाखवत असताना स्वर्गाच्या दारात पहारेकर्‍यांनी धर्मराजाला सांगितले की तुलाच फक्त स्वर्गात जाता येईल पण हा कुत्रा जाऊ शकणार नाही. पण धर्मराजाने नकार दिला आणि कुत्र्याचे उपकार स्मरले, त्यावेळेस कुत्रा श्रीकृष्णाच्या रुपात प्रकट झाला आणि धर्मराज हा स्वर्गात गेला. म्हणून कुत्र्याला मृत्यू समजतो.
कावळा शिवल्यानंतर  मग सगळे त्या आत्म्याला म्हणजे दगडाला अंठ्यावरून पाणी देतात त्याला तर्पण असे म्हणतात.....
एकाने प्रश्न विचारला की, अंगठ्यावरून पाणी का देतात ?
याचे उत्तर असे आहे की, देवाला, ऋषी, आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटे आहेत. त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरिता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्याकरिता वापरावेत. करंगळीच्या शेजारचे बोट ज्याला अनामिका म्हणतात याने देवाला, गुरुंना, साधूसंतांना गंध लावावे. म्हणून तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे, पितरांना अंगठाच्या बाजूने तिरपा हात करून पाणी द्यावे.
by (11.2k points)
selected by
...