• Register

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?

551 views
asked Jul 19, 2016 in Hindu - Traditions by TransLiteral (9,340 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे.
सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये.
जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे.
अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीही उशीरा झोपला तरी अंघोळ ही त्या त्या वेळेला झालेली पाहिजे.
ब्रह्म मुहूर्ताची अंघोळ म्हणजे सकाळी ४ ते ६.
मनुष्याची अंघोळ म्हणजे सकाळी ६ ते ८.
राक्षसांची अंघोळ म्हणजे सकाळी ८ ते १०.
प्रेतभूतांचे अंघोळ सकाळी १० ते १२.
त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.
ब्रह्म मुहूर्तातील स्नान म्हणजे देवांची अंघोळ. ह्यावेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मनदेखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्यावेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.
६ ते ८ ही मनुष्याची अंघोळ असते. ह्यावेळेस अंघोळ केली की पापी मनुष्य, परोपकारी मनुष्यासारखा वागतो. राग द्वेष, कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो, पण ब्रह्ममुहूर्ताइतका उत्साह मिळत नाही. फक्त मनुष्य सर्वबाबतीत समप्रमाणात असतो. सकाळी स्तोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते.
राक्षसांची अंघोळ सकाळी ८ ते १० वेळेत जो मनुष्य करतो त्याच्या मनात क्रोध, अहंकार जास्त निर्माण होतो. मत्सर, लोभ, मनुष्यात जास्त प्रमाणात येतो. दैविकशक्ति फार कमी प्रमाणात मिळते. शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जडतात. या वेळेत स्नान करणार्‍या व्यक्तीला उच्चरक्तदाब, अशक्तपणा आणि मधुमेह यांसारखे आजार होतात. काम करताना सतत आळशीपणा येतो. त्यामुळे मनुष्य सारखा चिडचिडा होतो.
प्रेतभूतांची अंघोळ ही सकाळी १० ते १२ असल्याने ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ती खूप आजारी होते. या वेळेत अंघोळ केल्याने काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपून राहणे, खूप खाणे, त्यामुळे ऍसिडिटी ( acidity ) होऊन कोठा साफ न होणे, केस गळणे, लवकर सुरकुत्या येणे किंवा चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य इतका रागीट होतो की त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही.
सकाळची पूजा सकाळीच झाली पाहिजे. म्हणून मनुष्याने कितीही उशीरा झोपले किंवा कितीही काम केले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान देवपूजा झाल्यावर थोडावेळ झोपले तरी हरकत नाही.
answered Jul 19, 2016 by TransLiteral (9,340 points)
selected Aug 24, 2016 by TransLiteral Admin
...