TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रबोधसुधाकर - आनुग्रहिकप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


आनुग्रहिकप्रकरणम् ।
विषविषमस्तनयुगलं पाययितुं पूतना गृहं प्राप्ता ॥
तस्या: पृथुभाग्याया आसीत्‍ कृष्णार्पणो देह: ॥२२८॥
पूतना राक्षसी विषानें भरलेलें असें भयंकर स्तनव्दय बालकृष्णास पाजण्याकरितां गोकुळांत नंदाचे घरीं आली; पण तिचें भाग्य थोर होतें; म्हणून तिचा देहच कृष्णार्पण झाला. ॥२२८॥

अनयत्पृथुतरशकटं निजनिकटं तं कृतापराधमपि ॥
कण्ठाश्लेषविशेषादवधीव्दात्याऽसुरं कृष्ण: ॥२२९॥
तसेंच श्रीकृष्णानें अत्यंत मोठया शकटासुरास स्वस्वरुपांत मिळविलें; आणि वावटळीच्या रुपानें स्वत:चा अपराध करणार्‍या तृणावर्त नांवाच्या राक्षसाच्या गळ्यास मिठी मारुन त्याचाहि वध केला. ॥२२९॥

यमलार्जुनौ तरु उन्मूल्योलूखलगतश्चिरं खिनौ ॥
रिगन्नगणभूमौ स्वमालयं प्रापयनृहरि: ॥२३०॥
यशोदेने उखळास बांधलेला श्रीकृष्ण अंगणांत रांगत असतां  त्यानें पुष्कळ दिवस दु:ख भोगीत असलेल्या आणि अर्जुनवृक्षांचें रुप धारण करणार्‍या आपल्या भक्तांस खालीं पाडून स्वर्लोकीं पाठविलें. ॥२३०॥

नित्यं त्रिदशव्देषी येन च मृत्योर्वशीकृत: केशी ॥
काक: कोऽपि वराको बकोऽप्यशोकं गतो लोकम्‍ ॥२३१॥
नित्य देवांचा व्देष करणारा केशीदैत्य (घोडयाचें  रुप घेऊन वृन्दावनांतील गोपाळांस पीडा देऊं लागला तेव्हां) त्यास श्रीकृष्णानें मारिलें . त्याचप्रमाणें कावळ्याचें आणि बगळ्याचें रुप घेणार्‍या अधम दैत्यांसहि श्रीकृष्णानें निजधामास पाठविलें . ॥२३१॥

गो-गोपी -गोपानां निकरमहिं पीडयन्तमतिवेगात्‍ ॥
अनघमघासुरमकरोत्‍  पृथुतरमुरगेश्वरं भगवान्‍ ॥२३२॥
गाई, वांसरें आणि गोपाळ यांच्या समुदायास आपल्या तीव्र विषवेगानें पीडा देणार्‍या सर्परुपधारी अघासुरास सुध्दां कृष्णानें ॥विष ओकऊन॥ निर्दोषी केलें. ॥२३२॥

पीत्वाऽरण्यहुताशं हताशमकरोत्‍, तदोजसा निहतान्‍ ॥
दग्वान्‍ मुग्धानखिलाज्जुगोप गोपान्‍ कृपासिन्धु: ॥२३३॥
अरण्यभर पसरलेला वणवा पिऊन टाकून त्या वणव्याची (स्वत:ला) मारण्याची इच्छा नष्ट केली; आणि त्या वणव्यांत आगीनें भाजल्यामुळें मूर्च्छित झालेल्या सर्व गोपाळांचें त्या दयासागर श्रीकृष्णानें रक्षण केलें. ॥२३३॥

पातुं गोकुलमाकुलमशनितडिव्दर्षणै: कृष्ण: ॥
असहाय एकहस्ते गोवर्धनमुद्दधारोचै: ॥२३४॥
वारा,॥पाऊस॥ आणि विजा यांच्या वर्षावानें व्याकुळ झालेल्या गोकुळांतील लोकांचें रक्षण करण्यासाठीं एका हातानें एकटया श्रीकृष्णानें गोवर्धन पर्वतात उचलून वरचेचर झेललें. ॥२३४॥

वासोलोभाकलितं धावद्रजकं शिलातलैर्हत्वा ॥
विस्मृत्य तदपराधं विकुण्ठवासोऽर्पितस्तस्मै ॥२३५॥
॥मथुरेंत॥ वस्त्रांच्या लोभानें पळणार्‍या मथुरेंतील परिटास दगडांनीं मारुन शेवटीं त्याचा अपराध विसरुन त्यास वैकुंठास पाठविलें ॥२३५॥

त्रेधा वक्रशरीरामतिलंबोष्ठीं स्खलव्दपुर्वचनात्‍ ॥
स्रक्चंदनपरितोषात्कुब्जामृज्वाडनामकरोत्‍ ॥२३६॥
तीन ठिकाणीं वांकडी, लांब ओठाची, कांपणारी, व अडखळत बोलणारी अशी कुब्जा नांवाची दासी श्रीकृष्णानें अव्यंग ॥सरळ॥ केली. ॥२३६॥

समरपराडमुखमारादिषुमेवाग्रे समीरयति ॥
नित्यं प्रतिकूलत्वात्कोदण्डं दण्डयामास ॥२३७॥
नंतर युध्दास पराड्‍मुख असलेल्या बाणास दूर पाठविलें. आणि धनुष्य आपणास प्रतिकूल असल्यामुळें तें श्रीकृष्णानें मोडून टाकिलें. ॥२३७॥

निहत: पपात हरिणा हरिचरणाग्रेण कुवलयापीड: ॥
तुगोन्मत्तमतग: पतड्‍वद्दीपकस्याग्रे ॥२३८॥
श्रीकृष्णानें मारलेला कुवलयापीड या नांवाचा मोठा व मदोन्मत्त हत्ति दिव्यावर झडप घालणारा पतंग मरुन पडावा तसा त्याच्या पायांपुढें (मरुन) पडला. ॥२३८॥

युध्दमिषात्सह रडे श्रीरडेनाडंसंगमं प्राप्य ॥
मुष्टिकचाणूराख्यौ ययतुर्नि:श्रेयसं सपदि ॥२३९॥
मल्लयुध्दाच्या मिषानें रंगभूमीवर श्रीक्रृष्णाशीं कुस्ती खेळून मुष्टिक आणि चाणूर तत्काळ मोक्षास गेले. ॥२३९॥

देहकृतादपराधाव्दैकुण्ठोत्कण्ठितान्तरात्मानम्‍ ॥
यदुवरकुलावतंस : कंसं विध्वंसयामास ॥२४०॥
यदुराजाच्या कुलाला भूषविणार्‍या श्रीकृष्णानें वैकुंठप्राप्तीविषयीं ज्याचें मन उत्कंठित झालें आहे अशा कंसास त्याच्या देहाकडून अपराध घडल्यामुळें मारिलें. ॥२४०॥

हरिसंदर्शनयोगात्‍ पृथुरणतीर्थे निमज्जते तस्मै ॥
भगवान्नु प्रददाद्य: सद्यश्चैद्याय सायुज्यम्‍ ॥२४१॥
युध्दांत मरण पावलेल्या कंसास आपलें दर्शन झाल्यानें कृष्णानें त्यास मुक्ति दिली. तसेंच दुष्ट शिशुपालास मारुन त्यासहि तात्काल सायुज्यमुक्ति दिली. ॥२४१॥

मीनादिभिरवतारैर्निहता: सुरविव्दिषो बहव: ॥
नीतास्ते निजरुपं तत्र च मोक्षस्य का वार्ता ॥२४२॥
ज्या परमेश्वरानें मत्स्य, कूर्म, वगैरे अवतार घेऊन पुष्कळ दैत्यांचा वध केला त्या सर्वास स्वत:च्या रुपांत मिळवून टाकिलें (त्यांना ईश्वरस्वरुप केलें.) मग त्यांना मोक्ष मिळाला काय ? असें कशाला विचारावयास पाहिजे. ॥२४२॥

ये यदुनन्दननिहतास्ते तु न भूय:पुनर्भवं प्रापु: ॥
तस्मादाताराणामन्तर्यामी प्रवर्तक: कृष्ण : ॥२४३॥
श्रीकृष्णानें ज्यांचा ज्यांचा वध केला ते पुन: जन्मास आले नाहींत. अर्थात्‍ मोक्षास गेले. म्हणून सर्व अवतारांचा अन्तर्यामीं प्रेरक श्रीकृष्णच आहे. ॥२४३॥

ब्रह्माण्डानि बहूनि पकजभवान्प्रत्यण्डमत्यद्भुतान्‍
गोपान्वत्सयुतानदर्शयदजं विष्णूनशेषांश्च य: ॥
शंभुर्यचरणोदकं स्वशिरसा धत्ते च मूर्तित्रयात्‍
कृष्णो वै पृथगस्ति कोऽप्यविकृत: सचिन्मयो नीलिमा ॥२४४॥
ज्यानें अनेक ब्रह्माडें व प्रत्येक ब्रह्मांडांत एक  एक ब्रह्मदेव व वासरें आणि गोपाळ या सर्वास विष्णुस्वरुपांत ब्रह्मदेवास दाखविलें, ज्याच्या चरणाचें पाणी ॥गंगा॥ श्यामसुंदर सच्चिदानंद श्रीकृष्ण सर्वाहून निराळा आहे. ॥२४४॥

कृपापात्रं यस्य त्रिपुररिपुरम्भोजवसति:
सुता जह्रो: पूता चरणनखनिर्णेजनजलम्‍ ॥
प्रदानं वा यस्य त्रिभुवनपतित्वं विभुरपि
निदानं सोऽस्माकं जयति कुलदेवो यदुपति: ॥२४५॥
शंकर हा ज्याच्या कृपेस पात्र झालेला आहे, (प्रियभक्त आहे) ब्रह्मदेव हा ज्याच्या पुत्र आहे, गंगा हें ज्याचें पाय धुण्याचें पाणी, ज्यावर कृपा करील त्यास त्रिभुवनाचें राज्य देणें ही ज्याची दैवी शक्ति, असा जो सर्वत्र भरुन असलेला यादवांचा रक्षणकर्ता व आमचा कुलदेव श्रीकृष्ण तो उत्कर्षानें राहात आहे. ॥२४५॥

मायाहस्तेऽर्पयित्वा भरणकृतिकृते मोहमूलोद्भवं मां
मात: कृष्णाभिधाने चिरसमयमुदासीनभावं गताऽसि ॥
कारुण्यैकाधिवासे सकृदपि वदनं नेक्षसे त्वं मदीयं
तत्सर्वज्ञे न कर्तु प्रभवसि भवती किं नु मूलस्य शान्तिम्‍ ॥२४६॥
दयेचें मुख्य आश्रयस्थान असलेल्या श्रीकृष्ण नांवाच्या आई ! मोहाच्या मूलापासून उत्पन्न झालेल्या मला पालनपोषन करण्यासाठीं मायेच्या हातीं देऊन जर तूं पुष्कळ कालपर्यत माझ्याविषयीं निश्चिंत्य ॥उदासीन॥ आहेस, आणि एकदां सुध्दां माझें मुखावलोकन करीत नाहींस (तोंड पडात नाहींस;) तर त्यावरुन असें वाटतें कीं तूं माझ्या मोहमूलाची शांति करण्यास समर्थ नाहींस. ॥२४६॥

उदासीन: स्तब्ध: सततमगुण: सडरहितो
भवांस्तात: काऽत: परमिह भवेज्जीवनगति: ॥
अकस्मादस्माकं यदि न कुरुते स्नेहमथ त
व्दहस्व स्वीयान्तर्विमलजठरेऽस्मिन्पुरपि ॥२४७॥
हे श्रीकृष्णा ! तुं उदासीन, स्तब्ध, नेहमीं गुणरहित (निर्गुण) संगरहित असा पिताच ॥बाप॥ असल्यानें माझा या लोकीं उत्कर्ष घडवून आणणारा तुझ्यावांचून दुसरा कोण असणार? असें असतां एकाएकीं आम्हांवर प्रेम करण्याचें तूं सोडून देतोस तर पुन: आह्मांला आपल्या निर्मल उदरांत (पोटांत) च ठेव. ॥२४७॥

लोकाधीशे त्वयीशे किमिति भवभवा वेदना स्वाश्रितानां
संकोच: पडजानां किमिह समुदिते मण्डले चण्डरश्मे: ॥
भोग: पूर्वार्जितानां भवति भुवि नृणां कर्मणां चेदवश्यं
तन्मे दुष्टैरदृष्टैर्ननु दनुजरिपोरुर्जितं निर्जितं ते ॥२४८॥
हे श्रीकृष्णा ! तूं सर्व लोकांचा राजा असल्यामुळें माझा सुध्दां स्वामी तूच आहेस. मग तुझ्या आश्रितांस संसारापासून दु:ख कां व्हावें? सूर्य उदय पावला असतां येथें सूर्यविकासि कमले मिटतात काय? असें असतां पृथ्वीवरील मनुष्यांस पूर्वीं केलेल्या कर्माचें ॥प्रारब्धकर्माचें॥ फल जर अवश्य भोगलेंच पाहिजे तर दैत्यनाशका ! तुझे सर्वोत्कृष्ट अखंड ऐश्वर्य माझ्या दुष्ट प्रारब्धकर्मांनीं जिंकलें असें नाहीं कां म्हणतां यावयाचें? ॥२४८॥

नित्यानन्दसुधानिधेरधिगत: सन्नीलमेघ: सता -
मौत्कण्ठयप्रबलप्रभज्जनभरैराकर्षितो वर्षति ॥
विज्ञानामृतमद्भुतं निजवचोधाराभिरारादिदं
चेतश्चातकवन्न वाञ्छसि तृषाक्रान्तोऽपि सुप्तोऽसि किम्‍ ॥२४९॥
सच्चिदानंदरुप अमृतसागरापासून निघालेला, अत्यंत निळा मेघ (श्मामसुंदर श्रीकृष्ण) साधूंच्या उत्कंठारुपी सोसाटयाच्या वार्‍यांनीं वाहून आणलेला असा आपल्या जवळच स्वत:चीं वचनें ह्याच कोणी धारा त्यांनीं अद्भुत अशा विज्ञानरुपी अमृताचा वर्षाव करीत आहे. असें असतां  हे चित्ता ! तूं चातकाप्रमाणें तहानेनें व्याकूळ झालेला असतांहि तें अमृत पिण्याची इच्छा कां करीत नाहीस? तूं निजला आहेस काय ? ॥२४९॥

चेतश्चज्चलतां विहाय पुरत: संधाय कोटिव्दयं
तत्रैकत्र निधेहि सर्व विषयानन्यत्र च श्रीपतिम्‍ ॥
विश्रान्तिर्हितमप्यहो क नु तयोर्मध्ये तदालोच्यतां
युक्त्या चानुभवेन यत्र परमानन्दश्च तत्सेव्यताम्‍ ॥२५०॥
तर हे चित्ता !द तूं चंचलपणा सोडून देऊन आपल्यासमोर दोन कोटया ठेव. एका कोटींत सर्व विषय ठेव आणि दुसरींत श्रीकृष्ण ठेव. आणि मग स्वत:चा विसावा व हित-कल्याण विषयांपासून कीं परमेश्वरापासून या गोष्टीचा युक्तिनें व पूर्वीं मिळालेल्या अनुभवानें विचार कर; आणि विचारांती ज्यापासून उत्कृष्ट- सर्वोत्तम अखंड आनंद मिळेल त्याचेंच सेवन कर. ॥२५०॥

पुत्रान्पौत्रमथ स्त्रियोऽन्ययुवतीर्वित्तान्यथोऽन्यध्दनं
भोज्यादिष्वपि तारतम्यवशतो नालं समुत्कण्ठता ॥
नैतादृग्यदुनायके समुदिते चेतस्यनन्ते विभौ
सान्द्रानन्दसुधार्णवे विहरति स्वैरं यतो निर्भयम्‍ ॥२५१॥
पुत्र, नातु, स्त्रिया, इतर तरूण स्त्रिया, स्वत:चें व दुसर्‍याचें द्रव्य, खाद्य, पेय वगैरे पदार्थ; यांविषयीं नेहमीं सारासार -श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा विचार करुन वागावें. केवल विषयांच्या उत्कंठेच्या भरांत विचार सोडून वागूं नये. पण हा न्याय श्रीकृष्णाकडे लावूं नये. (त्यावर अधिकाधिक प्रेम करावें व तें स्थिर ठेवावें) कारण सर्वव्यापक अनंत अंत:करणांत प्रगट झाला असतां तुडुंब भरलेल्या आनंदरुपी निर्भय सागरांत जीव निर्भयपणें यथेच्छ क्रिडा करितो. ॥२५१॥

काम्योपासनयाऽथर्यन्त्यनुदिनं किंचित्फलं स्वेप्सिंत
किंचित्स्वर्गमथापवर्गमपरैर्योगादियज्ञादिभि: ॥
अस्माकं यदुनन्दनाडघ्रियुगलध्यानावधानार्थिनां
कीं लोकेन , दमेन किं, नृपतिना, स्वर्गावर्गैश्च किम्‍ ॥२५२॥
या जगांत कांहीं लोक सकाम  उपासनेनें आपली इष्ट वस्तु मिळंवू इच्छितात, तर दुसरे कांहीं याग यज्ञ किंवा योग वगैरे करुन स्वर्ग किंवा मोक्ष मिळवूं इच्छितात. पण श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे ध्यानांतच चित्ताची एकाग्रता व्हावी असें इच्छिणार्‍या आम्हांला लोक, धन, राजा, स्वर्ग आणि मोक्ष यांच्याशीं काय कर्तव्य आहे ? ॥२५२॥

आश्रितामात्रं पुरुषं, स्वाभिमुखं कर्षति श्रीश: ॥
लोहमपि चुम्बकाश्मा, संमुखामात्रं जडं यव्दत्‍ ॥२५३॥
लोखंड हें स्वभावत: जड असतें तथापि तें लोहचुंबकाशेजारीं असतां हालूं लागतें (त्यास लोहचुंबक आपल्याकडे ओढून घेतो.) त्याप्रमाणें कितीहि अनधिकारी व अज्ञ पुरुष असो तो श्रीकृष्णाचा आश्रय -भक्ति करुं लागतांच त्यास श्रीकृष्ण आपल्याकडे आढून घेतो. ॥त्याचें चित्त आपल्या ठिकाणीं स्थिर करितो. ॥२५३॥

अयमुत्तमोऽयधमो जात्या, रुपेण, संपदा, वयसा ॥
श्लाघ्योऽश्लाघ्यो वेत्थं न वेति भगवाननुग्रहावसरे ॥२५४॥
भगवान अनुग्रह- कृपा करिते वेळीं जांति, रुप , संपत्ति, वय, वगैरेनीं हा श्रेष्ठ (उत्तम) आणि हा कनिष्ठ ॥कमी दर्जाचा॥ असा विचार करीत नाहीं. ॥२५४॥

अन्त:स्थभावभोक्ता ततोऽन्तरात्मा महामेघ: ॥
खदिरश्चम्पक इव वा प्रवर्षणे किं विचारयति ॥२५५॥
श्रीकृष्णास अंत:करणांत आपल्याविषयीं किती श्रध्दा आहे हेंच पहावयाचें असतें म्हणून तो प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करितो. ज्याप्रमाणें खैराचें कांटेरुं झाड, व सुंगधि चाफ्याचें झाड यांविषयीं वैषम्य न बाळगतां पाऊस दोहोंवर सारखीच वृष्टि करितो. ॥२५५॥

यद्यपि सर्वत्र समस्तथाऽपि नृहरेरथानन्या: ॥
भक्ता: परमानन्दे रमन्ति सदयावलोकेन ॥२५६॥
श्रीकृष्णपरमात्मा जरी सर्वास सारखाच आहे तरी त्याच्या दयायुक्त पहाण्यानें (कृपाकटाक्षानें) त्याचे अनन्य भक्तच श्रेष्ठ आनंदाचें सेवन करितात. ॥२५६॥

सुतरामनन्यशरणा: क्षीराद्याहारमन्तरा यव्दत्‍ ॥
केवलया अनन्य शरण कच्छपतनया: प्रजीवन्ति ॥२५७॥
केवल अनन्य शरण सर्व प्रकारें एकावरच अवलंबून असणारीं (अशीं कांसवीणीचीं पिल्लें दूध वगैरे कोणताहि आहार नसतां मातेच्या केवळ प्रेमळदृष्टीनेंच वांचतात)हें प्रसिध्द आहे. ॥ ॥२५७॥

यद्यपि गगनं शून्यं तथाऽपि जलदामृतांशुरुपेण ॥
चातक-चकोरनाम्रोर्दृढभावात्‍ पूरयत्याशाम्‍ ॥२५८॥
ज्याप्रमाणें शून्य असलेलें आकाशहि, अनन्य शरण होऊन आपल्याकडे दृष्टि देऊन राहणार्‍या चातक व चकोर पक्षी यांची इच्छामेघ आणि चंद्र यांच्या योगानें जशी पुरी करुं शकतें ॥२५८॥

तव्दद्भजतां पुंसां दृगवाडमनसागगोचरोऽपि हरि: ॥
कृपया फलत्यकस्मात्सत्यानन्दामृतेन विपुलेन ॥२५९॥
त्याचप्रमाणें श्रीकृष्ण हा वास्तविक दृष्टि (नेत्र) वाणी व मन यांच्या योगानें कळणारा नाहीं, तरीं अनन्य भक्तांस दयेनें सत्य, आनंद आणि अमृत यांची विपुलतेनें प्राप्ति करुन देण्यानें फलद्रूप होतो. ॥२५९॥


इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्
पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छंकरभगवत: कृतौ
प्रबोधसुधाकर: समाप्त: ॥
याप्रमाणें  श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य वैदिकमार्गो
ध्दारक श्रीमज्जगद्रुरु श्रीमदाद्यशंकराचार्य यांनीं रचलेल्या
प्रबोधसुधाकराचें रामचंद्र दत्तात्रेय दीक्षित किंजवडेकर
शास्त्री यानें यथामति केलेलें मराठी भाषान्तर ईशेच्छेनें
समाप्त झालें. शके १८५२ विजया १०.


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T03:08:31.9030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुसटाण

  • कुजट - टाण , कुजणें पहा . 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.