TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रबोधसुधाकर - व्दिधाभक्तिप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


व्दिधाभक्तिप्रकरणम् ।
चित्ते सत्त्वोत्पतौ तडिदिव बोधोदयो भवति ॥
तर्ह्येव स स्थिर: स्याद्यदि चित्तं शुध्दिमुपयाति ॥१६७॥
अन्त:करणांत सत्त्वगुणाची उत्पत्ति झाली; म्हणजे विद्युल्लतेप्रमाणें ज्ञानाचा उदय होतो. पण आपलें चित्त जेव्हां निर्मल (शुध्द) होतें तेव्हांच तें ज्ञान टिकतें-स्थिर राहातें. ॥१६७॥

शुध्दयति हि नान्तरात्मा कृष्णपदाम्भोजभक्तिमृते ॥
वसनामिव क्षारोदैर्भक्त्या प्रक्षाल्यते चेत: ॥१६८॥
अन्त:करण श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या भक्तीवांचून शुध्द होत नाहीं. पापडखारासारखा क्षारयुक्त पदार्थ घातलेल्या पाण्यानें वस्त्र जसें शुध्द होतें तसें भक्तीच्या योगानें चित्त शुध्द होतें. ॥१६८॥

यव्दत्समलदर्शे सुचिरं भस्मादिना शुध्दे ॥
प्रतिफलित वक्त्रमुचै: शुध्दे चित्ते तथा ज्ञानम्‍ ॥१६९॥
ज्याप्रमाणें आरसा राखेनें (भस्मानें) वगैरे शुध्द-स्वच्छ झाला असतां त्यांत आपल्या मुखाचें प्रतिबिंब पूर्णपणें दिसतें त्याप्रमाणें पवित्र अंत:करणांत आत्मज्ञान प्रगट होतें. ॥१६९॥

ज्ञानं तु तत्र बीजं हरिभक्त्या ज्ञानिनो ये स्यु:॥
मूर्त चैवामूर्त व्दे एव ब्रह्मणो रुपे ॥१७०॥
इत्युपनिषत्तयोर्वा व्दौ भक्तौ भगवदुपदिष्टौ ॥
क्लेशादक्लेशाव्दा मुक्ति: स्यादेतयोर्मध्ये ॥१७१॥
हरिभक्तीनें (अंत:करण शुध्द होऊन) जे ज्ञानी होतात त्याला कारण तें हरिभक्तीनें प्राप्त झालेलें ज्ञानच होय. ॥यावर शंका अशी कीं, हरिभक्तीनें आत्मज्ञान कसें होईल? श्रीकृष्ण साकार तर आत्मा निराकार. या शंकेचें निरसन करण्याकरितां म्हणतात कीं-
मूर्त आणि अमूर्त अशीं ब्रह्माचीं दोन रुपें उपनिषदांत सांगितलीं असून भगवंतांनीं याचे दोन तर्‍हेचे निरनिराळे भक्त सांगितले आहेत. पैकीं कांहींस कष्टानें मुक्ति प्राप्त होते आणि कांहीस ती कष्टावांचून प्राप्त होते. ॥१७०-७१॥

स्थूला सूक्ष्मा चेति व्देधा हरिभक्तिरुद्दिष्टा ॥
प्रारम्भे स्थूला स्यात्‍ सूक्ष्मा तस्या: सकाशाच ॥१७२॥
हरिभक्तीचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकार आहेत. त्यांत प्रथम स्थूल भक्ति असते व तिजपासूनच सूक्ष्म भक्ति उत्पन्न होते. ॥१७२॥

स्वाश्रमधर्माचरणं कृष्णप्रतिमार्चनोत्सवो नित्यम्‍ ॥
विविधोपचारकरणैर्हरिदासै: संगम: शश्वत‍ ॥१७३॥
स्थूल भक्तीचा प्रकार असा कीं,-आपल्या स्वधर्माचें आचरण, नानाप्रकारच्या उपचारांनीं भगवंताच्या मूर्तीचा पूजामहोत्सव, आणि संतमंडळींचा नित्य सहवास ॥१७३॥

कृष्णकथासंश्रवणे महोत्सव: सत्यवादश्च ॥
परयुवतौ द्रविणे वा परापवादे पराड्‍मुखता ॥१७४॥
भगवंताच्या कथा ऐकण्याला मन उत्साही असणे,  सत्य भाषण करणें आणि पर स्त्री, पर-धन आणि पर-निन्दा यांपासून दूर असणें ॥१७४॥

ग्राम्यकथासूव्देग: सुतीर्थगमनेषु तात्पर्यम्‍ ॥
यदुपतिकथावियोगे व्यर्थ गतमायुरिति चिन्ता ॥१७५॥
लोकवार्ता- बाजारगप्पा-कुटाळक्या यांचा तिटकारा, चांगल्या तीर्थयात्राकरण्याविषयीझं तत्परता; आणि श्रीकृष्णाच्या कथेवांचून जें आयुष्य गेलें तें फुकट गेलें याची मनास चिंता लागणे. ॥१७५॥

एवं कुर्वति भक्तिं कृष्णकथानुग्रहोत्पन्नाम्‍ ॥
समुदेति सूक्ष्मभक्तिर्यस्या हरिरन्तराविशति ॥१७६॥
याप्रमाणें कृष्णकथेच्या कृपेनें प्राप्त झालेली अनन्य भक्ति करीत असतां सूक्ष्म भक्ति उत्पन्न होते आणि मग जीमुळें अन्त:करणांत भगवान श्रीकृष्ण प्रगट होतो. (प्रविष्ट होतो) ॥१७६॥

स्मृतिसत्पुराणवाक्यैर्यथाश्रुतायां हरेर्मूर्तौ ॥
मानसपूजाभ्यासो विजननिवासेऽपि तात्पर्यम्‍ ॥१७७॥
स्मृति, पुराणें; आणि विश्वासू लोक यांच्या वाक्यावरुन भगवंताच्या मूर्तीचें जसें ज्ञान झालें असेल तशाप्रकारच्या मूर्तीची मानसपूजा करण्याचा अभ्यास, आणि एकांतवासाविषयीं आवड ॥१७७॥

सत्यं  समस्तजन्तुषु कृष्णस्यावस्थितेर्ज्ञानम्‍ ॥
अद्रोहो भूतगणे ततस्तु भुतानुकम्पा स्यात्‍ ॥१७८॥
यथार्थ ॥खरें॥ बोलणे, सर्व प्राण्यांच्या ठिकाणीं भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करीत आहे अशी भावना, प्राण्यांचा द्रोहव्देष न करणें व सर्वाविषयीं दयाबुध्दी असावी. ॥१७८॥

प्रमितयदृच्छालाभे संतुष्टिर्दारपुत्रादौ ।
ममताशून्यत्वमतो निरहंकारत्वमक्रोध: ॥१७९॥
ईश्वराच्या इच्छेनें मिळेल त्यांत संतोष आणि स्त्री-पुत्र वगैरे विषयीं ममत्वबुध्दि नसणे, तसेंच अहंकार व अभिमान यांनीं रहित असणें ॥१७९॥

मृदुभाषिता प्रसादो निजनिन्दायां स्तुतौ समता ॥
सुख दु:ख- शीतलोष्णव्दन्व्दसहिष्णुत्वमापदो न भयम्‍ ॥१८०॥
मृदु- (दुसर्‍यास न दुखाविणारें) भाषण, चित्त नेहमीं प्रसन्न, आपल्या निंदा-स्तुतींविषयीं सारखीच बुध्दि असणें, म्हणजे निंदेनें राग न येणे आणि स्तुतीनें आनंदहि न होणें, सुख-दु:ख, थंड-उष्ण वगैरे व्दंव्दें सहन करणें, आणि (येणार्‍या) संकटांस न भिणें ॥१८०॥

निद्राऽऽहाराविहारेप्वनादर: सड्‍गराहित्यम्‍ ॥
वचने  चानवकाश: कृष्णस्मरणेन शाश्वती शान्ति: ॥१८१॥
निद्रा, खाणें-पिणें, वगैरे शारीरिक गोष्टींविषयीं आसक्ति नसणें, सहवास न करणें ॥एकांती राहणें॥, आणि कारणावांचून भाषण न करणें, श्रीकृष्णाच्या ध्यानानें शांति प्राप्त करुन घेणें ॥१८१॥

केनापि गीयमाने हरिगीते वेणुनादे वा ॥
आनन्दाविर्भावो युगपत्स्यादष्टसात्त्विकोद्रेक: ॥१८२॥
कोणीहि भगवंताच्या गुणांचें गायन केलें असतां किंवा मुरली वाजविली असतां, आनंद होऊन एकदम आठ सात्विक भाव उत्त्पन होणें. ॥१८२॥

तस्मिन्ननुभवति मन: प्रगृह्यमाणं परात्मसुखम्‍ ॥
स्थिरतां याते तस्मिन्याति मदोन्मत्तदन्तिदशाम्‍ ॥१८३॥
त्या आठ सात्त्विक भावांचा अनुभव घेत असतां परमात्मसुखाचा आस्वाद घेणारें मन स्थिर झालें म्हणजे तें मदोन्मत्त हत्तीसारखें (ब्रह्मानंदानें बेहोष) होतें. ॥१८३॥

जन्तुषु भगवद्भावं भगवति भूतानि पश्यति क्रमश: ॥
एतादृशी दशा चेत्तदैव हरिदासवर्य़: स्यात्‍ ॥१८४॥
सर्व प्राण्यांत भगवान व भगवंतामध्यें सर्व प्राणी असें क्रमानें (पहातां येऊं लागलें तर) जो पाहतो त्या वेळींच तो भक्त खरा भगवद्भक्त झाला असें समजावें. ॥१८४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-13T02:59:27.5270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चंडाळण्या

  • स्त्रीअव . ( व . ) खटाळया ; खोडया . नाहक आमच्या चंडाळण्या करूं नका . [ चांडाल + णी प्रत्यय ] 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.