TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

प्रबोधसुधाकर - देहनिन्दाप्रकरणम् ।

भगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.


देहनिन्दाप्रकरणम् ।
देहनिन्दाप्रकरणम्।
नित्यानन्दैकरसं सच्चिन्मात्रं स्वयंज्योति: ॥
पुरुषोत्तममजमीशं वन्दे श्रीयादवाधीशम् ॥१॥
जो परमेश्वर नित्यानंदरुप एकाच रसानें पूर्ण असून सत्य व ज्ञान हेंच ज्याचें स्वरुप आहे, अशा स्वयंप्रकाश व अनादि असलेल्या त्या पुरुषश्रेष्ठ भगवान् श्रीकॄष्णास मी वंदन करितों. ॥१॥

यं वर्णयितुं साक्षाच्छ्रुतिरपि मूकेव मौनमाचरति ॥
सोऽस्माकं मनुजानां किं वाचां गोचरो भवति ॥२॥
ज्याचें वर्ण्न करण्याविषयीं श्रुति देखील मुक्यासारखें मौन धरते; त्या परमात्माचें वर्णन आम्हां मानवांच्या वाणीस करितां येईल काय? ॥२॥

यद्यप्येवं विदितं तथाऽपि परिभाषितो भवेदेव ॥
अध्यात्मशास्त्रसारैचिन्तनकीर्तनाभ्यासै: ॥३॥
पण ही गोष्ट जरी आम्हांस ठाऊक असली तरी वेदांतशास्त्रांतील तात्पर्य, हरीचें चिंतन व गुणकीर्तन यांच्या अभ्यासानें त्या परमात्माचें वर्णन करतां येईल. ॥३॥

क्लॄप्तैर्बहुभिरुपायैरभ्यास-ज्ञान-भकत्याघै: ॥
पुंसो विना विरांग मुक्तेरधिकारिता न स्यात् ॥४॥
योगाभ्यास, ज्ञान व भक्ति बगैरे अनेक खात्रीचे उपाय असले तरी वैराग्य जर नसेल तर पुरुषास मोक्षाचा अधिकार प्राप्त होत नाहीं. ॥४॥

वैराग्यमात्मबोधो भक्तिश्चेति त्रयं गदितम् ॥
मुक्ते: साधनमादौ तत्र विरागो वितृष्णता प्रोक्ता ॥५॥
वैराग्य, आत्मज्ञान, व भक्ति हे तीन मोक्षाचे उपाय आहेत. पैकीं निरिच्छतेला वैराग्य असें म्हणतात. ॥५॥

सा चाहंममताभ्यां प्रच्छन्ना सर्वदेहेषु ॥
तत्राहंता देहे ममता भार्यादिविषयेषु ॥६॥
ती निस्स्पॄहता सर्वाच्या देहांत वास करणार्‍या अहंकार आणि ममता यांनीं झांकून गेली आहे. त्यांत अहंकार हा स्वत: च्या देहावर असून, ममता हे भार्या, मूल वगैरे विषयांवर असते. ॥६॥

देह: किमात्मकोऽयं क: संबन्धोऽस्य वा विषयै: ॥
एवं विचार्यमाणेऽहंताममते निवर्तेते ॥७॥
देह हा कशानें बनला आहे? किंवा त्याचा विषयांशी कोणता संबंध आहे? असा विचार केला असतां अहंकार व ममता ह्या दोन्ही वॄत्ति निघून जातील. ॥७॥

स्त्रीपुंसो: संयोगात् संपाते शुक्रशोणितयो: ॥
प्रविशज्जीव: शनकै: स्वकर्मणा देहमाधत्ते ॥८॥
स्त्रीपुरुषांच्या समागमानें वीर्य व रज यांचा संयोग झाला असतां त्यांत जीव प्रवेश करुन स्वत:च्या कर्मानुसार क्रमाक्रमानें देह धारण करतो. ॥८॥

मातॄगुरुदरदर्या कफ़मूत्रपुरीषपूर्णायाम् ॥
जठराग्निज्वालाभिर्नवमासं पच्यते जन्तु: ॥९॥
कफ़, मूल, आणि मल (विष्ठा) यांनीं भरुन गेलेल्या मातेच्या मोठ्या उदररुपगुहेंत तो जीव जठराग्नीच्या ज्वालांनीं नऊ महिनेपर्यत परिपक्क होतो. ॥९॥

दैवात् प्रसूतिसमये शिशुस्तिरश्चीनतां यदा याति ॥
शस्त्रैर्विखण्ड्य स तदा बहिरिह निष्कास्यतेऽतिबलात् ॥१०॥
नंतर तें बालक जेव्हां दैवयोगानें वांकडें होतें तेव्हां लोक अत्यंत बलात्कारानें त्याचे शस्त्रांनीं तुकडे तुकडे करुन त्यास बाहेर काढितात. ॥१०॥

अथवा यन्त्रछिद्राद्यदा तु नि:सार्यते प्रबलै: ॥
प्रसवसमीरैश्च तदा य: क्लेश: सोऽप्यनिर्वाच्य: ॥११॥
किंवा जेव्हां जोराच्या प्रसूतिवायूनें (वेणांनीं) योनींतून तें बालक बाहेर फ़ेकलें जातें तेव्हां त्या बालकास क्लेश होतात ते सांगतां येणें कठिण आहे. ॥११॥

आधि-व्याधि-वियोगात्मीयविपत्कलह-दीर्घदारिद्यै: ॥
जन्मानन्तरमपि य: क्लेश: किं शक्यते वक्तुम् ॥१२॥
बरें; जन्म झाल्यावरसुद्धां चिंता, रोग, प्रियजनांची ताटातूट, स्वत:च्या माणसांवर संकटें कोसळणें, भांडणें, अत्यंत दारिद्य आणि पुनर्जन्म यांच्या योगानें होणारे क्लेश वाणीनें तरी वर्णन करण्यासारखे (सामान्य) आहेत का? (अर्थात नाहींत). ॥१२॥

नर-पशु-विहंग-तिर्यग्योनीनां चतुरशीतिलक्षाणाम् ॥
कर्मनिबध्दो जीव: परिभ्रमन् यातना भुडेक्त ॥१३॥
मनुष्य, पशु, पक्षी, इत्यादि चवर्‍यांयशीं लक्ष योनींत स्वत:च्या पूर्वकार्मानें बांधला गेलेला जीव अनेक कठीण यातना भोगीत फ़िरत असतो. ॥१३॥

चरमस्तत्र नृदेहस्तत्रोज्जन्मान्वयोत्पत्ति: ॥
स्वकुलाचारविचार: श्रुतिप्रचारश्च तत्रापि ॥१४॥
त्या चवर्‍यांयशीं लक्ष योनींत मनुष्यदेह शेवटचा (श्रेष्ठ). त्यांतहि उच्चकुलांत जन्म. फ़ार उत्तम. पण त्याहीपेक्षां स्वत:चें कुल व त्याला अनुरुप असलेला आचार यांचा विचार करुन त्याप्रमाणें वागणारा श्रेष्ठ, आणि या सर्वापेक्षां वैदिकधर्माचा प्रसार करणारा श्रेष्ठ होय. ॥१४॥

आत्मानात्मविवेको नो देहस्य च विनाशिताज्ञानम् ॥
एवं सति स्वमायु: प्राज्ञैरपि नीयते मिथ्या ॥१५॥
आत्मा व अनात्मा (आत्माहून इतर वस्तू) यांचा तारतम्य विचार, आणि देह नाशिवंत आहे ह्या  गोष्टीचें ज्ञान नाहीं म्हणून शहाणे पुरुष आपलें आयुष्य व्यर्थ घालवितात. ॥१५॥

आयु: क्षणलवमात्रं न लभ्यते हेमकोटिभि: क्कापि ॥
तच्चेद्रच्छति सर्व मृषा तत: काऽधिका हानि: ॥१६॥
मनुष्याच्या आयुष्याचा एका क्षणाचा अगदीं लहानसा हिस्सा (भाग) देखील कोट्यावधी सुवर्णाचें नाणें खर्च केले तरीसुध्दां मिळणार नाहीं. मग असलें अमूल्य आयुष्य सर्वच्या सर्व जेथें फ़ुकट जातें तेथें त्याहून अधिक हानि कोणती व्हावयाची राहिली? ॥१६॥

नरदेहातिक्रमणात् प्राप्तौ पश्वादिदेहानाम् ॥
स्वतनोरप्यज्ञाने परमार्थस्यात्र का वार्ता ॥१७॥
अत्यंत श्रेष्ठ असा मनुष्यदेह व्यर्थ घालविल्यानंतर प्राप्त झालेल्य पशु-पक्षी-वगैरेंच्या योनींत स्वत:च्या शरीराचेंच अज्ञान असल्यावर परमार्थाची वार्ता कोठून असणार? ॥१७॥

सततं प्रवाह्यमानैर्वॄषभैरश्वै: खरैर्गजैर्महिषै:। हा कष्टं क्षुत्क्षामौ: श्रान्तैर्नो शक्यते वक्तुम् ॥१८॥
एकसारखीं ओझीं वाहणारे बैल, घोडे, गाढव, हत्ती आणि रेडे हे भुकेनें कासावीस होऊन कितीहि कष्टी झाले तरी त्यांस आपलें दु:ख बोलून दाखविण्याचें सामर्थ्य नाहीं; ही गोष्ट किती वाईट आहे बरें? ॥१८॥

रुधिर-त्रिधातु-मज्जा-मेदो मांसास्थिसंहतिर्देह: ॥
स बहिस्तवचा पिनध्दस्तस्मान्नो भक्ष्यते काकै: ॥१९॥
देह म्हणजे रक्त, कफ़, पित्त, वात, मज्जा, मेद, मास आणि हाडें यांचा समुदाय होय. तो बाहेरुन कातडीनें झांकलेली आहे म्हणूनच कावळे त्यावर झडप घालून त्याचे लचके तोडीत नाहीत. ॥१९॥

नासाग्राद्वदनाद्वा कफ़ं मलं पायुतो विसॄजन् ॥
स्वयमेवैति जुगुप्सामन्त: प्रसॄतं च नो वेत्ति ॥२०॥
नाकांतून किंवा तोंडांतून पडणाराअ कफ़, आणि गुदद्वारांतून पडणारा मल यांचीच तेवढी आपण किळस बाळगतों; पण आपल्या शरीरभर पसरलेल्या इतर मलांची आपण पर्वा करीत नाहीं. ॥२०॥

पथि पतितमस्थि दृष्टा स्पर्शभयादन्यमार्गतो याति ॥
नो पश्यति निजदेहं चास्थिसहस्त्रावृतं परित: ॥२१॥
रस्त्यांत पडलेलें हाडूक पाहून त्याचा स्पर्श टाळण्यासाठीं आपण दुसर्‍या वाटेनें जातो;   परंतु आपल्या देहांतसुध्दां हजारों हाडें आहेत हें आपण जाणत नाहीं. ॥२१॥

केशावधि नखराग्रादिदमन्त: पूतिगंधसंपूर्णम् ॥
बहिरपि जानन् चन्दनकर्पूराद्यैर्विलेपयति ॥२२॥
पायाच्या नखाग्रापासून डोकीवरील केसांपर्येत आपलें शरीर दुर्गंधानें पूर्ण भरुन गेलें आहें. हें ठाऊक असून सुध्दां देहास बाहेरुन चंदन, कापूर वगैरे सुगंधी पदर्थाचीं उटणीं लावीत असतात. ॥२२॥

यत्नादस्य पिघत्ते स्वाभाविकदोषदोषसंघातम् ॥
औपाधिकगुणनिवहं प्रकाशयत्र्श्लाघते मूढ: ॥२३॥
इतकेंच नव्हे तर; मूर्ख मनुष्य देहांत स्वाभाविकपणें असलेल्या दोषसमूहावर प्रयत्नपूर्वक पांघरुण घालतो व कॄत्रिम डामडौल करुन लोकांत सुंदर म्हणून दिमाखानें मिरवतो. ॥२३॥

क्षतमुत्पन्नं देहे यदि न प्रक्षाल्यते त्रिदिनम् ॥
तत्रोत्पतन्ति बहव: कॄयो दुर्गन्धसंकीर्णा: ॥२४॥
देहास झालेली जखम जर तीन दिवस धुतली नाहीं तर तींत दुर्गधियुक्त पुष्कळ किडे उत्पन्न होतात. ॥२४॥

यो देह: सुप्तोऽभूत् सुपुष्पशय्योपशूभिते तल्पे ॥
संप्रति स रज्जुकाष्ठैर्नियन्त्रित: क्षिप्यते बह्यौ ॥२५॥
जो देह चांगल्या फ़ुलांनीं बनविलेल्या शय्येवर झोंपला होता तो आतां दोर्‍या व काठ्या यांच्या योगानें घट्ट बांधून. अग्नींत टाकता जातो. ॥२५॥

सिंहासनोपविष्टं दॄष्टा यं मुदमवाप लोकोऽयम् ॥
तं कालकॄष्टतनुं विलोक्य नेत्रे निमीलयति ॥२६॥
जे लोक सिंहासनावर बसलेल्या राजास पाहून संतोष पावतात तेच लोक त्या राजाचें शरीर कालानें आपल्या पुढून ओढून नेलेलें पाहून दु;खानें डोळे झांकतात. ॥२६॥

एवंविधोऽतिमालिनू देहो यत्सत्तया चलति ॥
तं विस्मृत्य परेशं वहत्यहंतामनित्यऽस्मिन् ॥२७॥
अशा प्रकारचा नश्वर आणि अत्यंत मलिन देह ज्याच्या सत्तेनें चालतो; त्या परमेश्वरास विसरुन ह्या अनित्य देहावर अहंबुध्दि ठेवतात. ॥२७॥

कात्मा सच्चिद्रूप: क मांसरुधिरास्थिनिर्मितो देह:॥
इति यो लज्जति धीमानितरशरीरं स किं मनुते ॥२८॥
सत्यज्ञानरुप आत्मा कोणीकडे व मांस, रक्त व हाडें यांचा बनलेला देह कोणीकडे? अशा विचारानें जो शहाणा मनुष्य (स्वत:च्या देहविषयक भावनेबद्दल) लाजला तो इतर शरीरांस मानील काय? (अर्थात् नाहीं असा भाव.) ॥२८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-11T21:27:05.6830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

homoclinal ridge

  • समनतिक कटक 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.