Dictionaries | References

बाळ

   
Script: Devanagari
See also:  बाळक

बाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A child. 2 m A boy.
Young, immature. For compounds with बाळ other than these occurring below see in order under बाल.

बाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A child.
 m  A boy.

बाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या जीवातून निर्माण झालेला दुसरा एखादा लहान जीव   Ex. लहान बाळांबरोबर वेळ कसा जातो हे कळतच नाही.
HOLO MEMBER COLLECTION:
चिल्ली-पिल्ली
HYPONYMY:
पिल्लू चातकाचे पिल्लू
ONTOLOGY:
जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मूल बालक अपत्य संतती
Wordnet:
gujબચ્ચું
kasشُر
kokपेटो
sanअपत्यम्
tamகுட்டி
telపిల్ల(వాడు)బిడ్డ.
urdبچہ , طفل
noun  लहान मुलांसाठी प्रेमाने वापरायचे संबोधन   Ex. माझा बाळ आज जेवत का नाही ?
ONTOLOGY:
उपाधि (Title)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসোণ
benসোনা
hinलाल
kokबाबू
malഓമന പൈതൽ
oriଧନ
telముద్దుబిడ్డ
urdلال , لالا , دلارا , بیٹا
See : मुलगा, अर्भक

बाळ     

 न. 
बालक ; लहान मूल .
 पु. मुलगा ; शिशु . जसा वारावा चपळ बाळ बापानें । - मोभीष्म ११ . ६९ . - वि .
लहान ; अल्पवयी .
मूर्ख . पंडित न गमसि जरि बहु पांडित्यहि करिसि दिससि बाळ मला । - मोकर्ण ४१ . १८ .
अजाण . नुमजे बाळासि किमपि ... । - मोमौसल १ . १ . [ सं . बाल = मूल ; बाल + क = बालक ] म्ह० असतील बाळ तर फेडतील काळ .
०आंबा  पु. कच्चा किंवा हिरवा आंबा .
०कडू   डूं - न .
लहान मुलांना किराईत वगैरे कित्येक कडू औषधें ( विशेषत : सकाळीं ) उगाळून पाजतात तें ; घुटी .
( ल . ) लहानपणीं मिळालेलें शिक्षण किंवा वळण . बाळकडू असणें - उपजत प्रवृत्ति किंवा गुण असणें ; गोडी असणें . कोळ्याच्या मुलांना पोहोण्याचें बाळकडूच असतें . बाळका - पु . गोसाव्याचा शिष्य . [ बालक ]
०क्रीडा  स्त्री. लहानपणींचे लहान मुलांचे खेळ . [ सं . बालक्रीडा ]
०खुंट  पु. केळीच्या खुंटास नवीन फुटणारा कोंभ ; मोना .
०गळा  पु. लहान मुलाचा बारीक आवाज ; न फुटलेला आवाज .
०गुंडा  पु. बालगुंडा पहा .
०गोपाळ   पुअव .
( कृष्णाचे खेळ - गडी , गवळ्यांचीं पोरें यावरुन ). लहान मुलें ; लहानमोठीं एकत्र जमलेलीं मुलें .
एकत्र जमलेलीं गांवांतील लहानथोर माणसें . महाराज , हे सर्व बाळगोपाळ मिळाले आहेत . त्यांजवर आपण दया करावी . [ बाळ + गोपाल = गवळी ]
०चरित   त्र - न . लहानपणचें चरित्र ; बालक्रीडा . [ सं . ]
०छंद  पु. लहान मुलानें घेतलेला चाळा ; हट्ट . [ सं . ]
०टोळ  पु. लहान व हिरवा टोळ .
०टोंक   ढोंक - पु . बगळा .
०ताड  पु. नर जातीचा ताड . यास फळें येत नाहींत .
०दशा  स्त्री. बाल्य ; बाळपण ; बाल्यावस्था . लोपली उघडे बाळदशा । - ज्ञा ६ . २६० . [ सं . ]
०दांत   पुअव . लहानपणचे किंवा पहिले दांत ; दुधाचे दांत .
०दृष्टि  स्त्री. तारुण्यांतील बारीक व लांबची वस्तु जिनें दिसते अशी दृष्टि ; जोमदार दृष्टि . [ सं . ]
०पणचें   - न . पहिल्यानें व्यालेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावरील लोणी .
लोणी   - न . पहिल्यानें व्यालेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधावरील लोणी .
०परवेशी   परवशी परवर्षी - स्त्री . बालपरवेशी पहा .
०पाठ  पु. लहानपणीं शिंकलेली विद्या ; लहानपणींची शिकवण . [ सं . ]
०फूट  न. 
बाळआंबा .
रुपया इ० कांस असलेली बारीक चीर .
०फोक  पु. ( नाजुक किंवा कोंवळी फांदी यावरुन ) तरुण ; तरणाबांड ; आडबाप्या .
०बद   बोध - वि . बालबोध पहा .
०बंद  न. बाळबोध ; देवनागरी लिपी .
०बोध   - पु . ( ल . ) उदार धोरण . मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना ... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन . - टिले १ . ४३६ .
कित्ता   - पु . ( ल . ) उदार धोरण . मी मुंबई इलाख्याचा कारभार चालवितांना ... एल्फिन्स्टन यांनीं घालून दिलेला बाळबोध कित्ता वळवीन . - टिले १ . ४३६ .
०बोध   - न . साधी रीत ; जुनी , सनातनधर्माची रीत .
वळण   - न . साधी रीत ; जुनी , सनातनधर्माची रीत .
०बुद्धि  स्त्री. मुलाची बुद्धि . - वि . पोरकट समजुतीचा ; अज्ञानी ; पोरबुद्धि ; लेकुरबुद्धि .
०बेल  न. बेलाचें कोंवळें फळ .
०ब्रह्मचारी   भाषा मित्र - इ० बालमध्यें पहा .
०भिकारी   पु जन्मापासून भिकारी . याच्या उलट गर्भश्रीमंत .
०भूक  स्त्री. ( मुलाची भूक यावरुन ) वरचेवर , घटकेघटकेला लागणारी भूक .
०भोंक  न. 
बगळा ; बाळढोंक .
( ल . ) लांब मानेचा इसम ; लांबमान्या .
०भोग  पु. 
प्रात : काळची पूजा झाल्यानंतर देवाला अर्पण केलेला उपहार .
( यावरुन ल . ) लहान मुलांचा सकाळचा फराळ .
अशा नैवेद्याचे किंवा फराळाचे पदार्थ . ( क्रि० देणें ; करणें ).
( सामान्यत : ) हिस्सा ; वांटा ; भाग . ( क्रि० करणें ).
०मति  स्त्री. अज्ञान . रत्नें म्हणोनि भरि इंगळ जेंवि खोळे । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे । - आपू २९ .
०मायणी  स्त्री. गाडीच्या चाकाच्या आंतील बाजूचा वसू ; आंतील वसवी ; कणा आखरींत भक्कम करण्याची लोखंडी चाकी ( माण ) बाळमाइनी
०मुकी  स्त्री. 
मेजवानीच्या किंवा फराळाच्या वेळीं गुपचूप वानगी म्हणून राखून ठेवलेला एखादा जिन्नस किंवा घास .
असा राखून ठेवलेला नसेल त्यास दंड द्यावा लागणें किंवा दिलेला दंड . ( क्रि० लागणें ).
०मुंज्या  पु. लहानपणापासून मुंज्या ; मोठा झाला असला तरी अविवाहित किंवा ब्रह्मचारी असलेला मनुष्य .
०रंडा   रांड विधवा - स्त्री . बालरडा पहा .
०राजा  पु. पुंड , धीट किंवा दांडग्या मुलाला लाडिकपणें लावण्यांत येणारा शब्द . [ सं . ]
०लेणें   ल्याणें - न . लहान मुलाच्या अंगावर घालावयाचे बिंदली इ० दागिने . विषयांचें बाळलेणें । - शिशु ९२ .
०वाटी  स्त्री. 
सकाळचा अल्पोपहार , न्याहारी ; बाळभोग . ( क्रि० झोकणें ; चढविणें ; करणें ; खाणें ; होणें ).
वाटा ; भाग ; हिस्सा .
०वैद्य  पु. लहान मुलांचा वैद्य .
०शब्द  पु. लहान मुलांसारखें बोलणें , आवाज , उच्चार . बाळशब्दें खेळवील तनुजाला ।
०शिरें  न. ( कों . ) बाळंतिणीला तिच्या मुलाकरितां धर्मार्थ दिलेलें दूध , भांडीं व इतर आवश्यक वस्तू इ० [ सं . बाल + क्षीर ]
०सरस्वती  स्त्री. बालसरस्वती पहा . सवत स्त्री . ( बायकी ) लहानपणापासूनची सवत . [ बाल + सं . सपत्नी ]
०स्वार वि.  
लहानपणापासून घोड्यावर बसणारा .
( ल . ) लहानपणापासून एखाद्या शास्त्रांत किंवा उद्योगधंद्यांत प्रवीण असलेला ; जन्माभ्यास असलेला . हिरडा , हरडा , डी , हर्तकी - पुस्त्री . बालहरीतकी ; कोवळा वाळविलेला हर्डा ; हें एक औषधी फळ आहे . चांभारी - हिरडा पहा . [ सं . बालहरीतकी ] बाळांबा - पु . बाळआंबा पहा . बाळाभ्यास , बाळाभ्यासी - बालाभ्यास , बालाभ्यासी पहा . बाळामराई - स्त्री . आंब्याच्या लहान झाडांची बाग . [ बाळ + आमराई ] बाळायती - वि . बाळ ; लहान . त्या बाळायती गोपीतें । हरिलें दैत्य वेषें तेथें । - रास २ . ३६० . बाळेभोंक - न . बाळभोंक ; बगळा . बाळेभोळे - वि . अज्ञ आणि भोळसर . माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथें बाळेभोळे स्थूळ बुद्धी । - एभा ३ . २२४ . बाळोपचार , बाळोपचारी - बालोपचार - री पहा .

Related Words

बाळ पिशाच उन्मत्तता   बाळ   अकाबाईचें बाळ   घुघुलें बाळ   होतील बाळ, तर फेडतील काळ   गायीचे बाळ   असतील बाळ, तर फेडतील काळ   आगें मागें, बाळ रांगू लागे   अवदसेचें बाळ   ऐकले तर बाळ, नाही तर काळ   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा   बाळ बुंद पाडतो नि बाय गुलाल खेळते   बाळ भिक्षुकः त्यागीयाचे लक्षुकः   बाळाला बाळ झालं तरी बाळ अजून बाळच   भुरगें ना बाळ चोट वाजयता टाळ   माझें बाळ गोजिरवाणें, दुसर्‍याचें बाळ किळसवाणें   कोणाचेंहि जळो, (बाळ) ओसरी खेळो   लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक   विवेकाचा जाळ, करी विराटाचा बाळ   बाल गंगाधर टिळक   बाल गंगाधर तिलक   بال گَنٛگادَھر تِلَک   బాలగంగాధర్ తిలక్   বাল গংগাধৰ তিলক   বাল গঙ্গাধর তিলক   ବାଳ ଗଙ୍ଗାଧର ତିଳକ   ਬਾਲ ਗੰਗਾਧਰ ਤਿਲਕ   લોકમાન્ય તિલક   ಬಾಲ ಗಂಗಾಧರ ತಿಲಕ   बालगंगाधरतिलकमहोदयः   ബലഗംഗാധരതിലകന്   பாலகங்காதரதிலகர்   केशव गंगाधर टिळक   लेकरू   गुणीबाळ   खाल्लेंघालें   अब्रु गाड्यावरुन चालणें   अब्रु गाड्यावरुन जाणें   कुत्र्याचे पिल्लू   भीण   भेलांडा   शेऊळ   हिरण्यकशप   साईत सुईत   झेपावणे   बाळेला   धाकणें   धौतल   धौतल्या   लाजलावणा   अटकणें   चित्रवत   चिरकणे   मन दुग्ध्यांत पडणें   पाणी मरणें   अक्काबाईचें पोर   साता नवसाचा   गायीचा पुत्र   जाणून   जाणूनउमजून   जाणूनपुसून   जाणूनसमजून   जाणूनसवरून   अदत   अनवाळ   छोकरा   काउ   उयशी   कुचाल   बाळें   भयां भयां करणें   भयां भयां करीत जाणें   भयां भयां करीत फिरणें   भुर्गो   ननुबाळ   रीतिस्थिति   वशट   अडगुलेंमडगुलें   घुघु   हिरडा   साईत   अठोपपरब्रह्म   अवदसचिन्ह   एकलौता   एकलौती   कृत्रिमी   बिरखडी   बिरखुडी   बूध   नन्नुबाळ   निन्निबाळ   निपराद   निपराध   निपराधी   पालख   वढे   वरभा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP