Dictionaries | References

तारंबळ होणें-उडणें

[तारंबळ, तारामळ, तारांबळ=ताराबल
नक्षत्रांची अनुकुलता.]
‘तदेव लग्‍नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव’ हा मंगलाष्‍टकाचा श्र्लोक मुहूर्ताची घटका संपत आली म्‍हणजे फार घाईने म्‍हणतात. यावरून घाई, धांदल होणें. ‘मी आपुल्‍या गृहीची एक। तारंबळ होतसे।।’ -नव २०.५५. ‘जिजाऊ-(रुसव्या स्‍वरानें) माझी अशी तारांबळ उडावी, आणि आपण मौज पहात रहावे हे चांगले वाटले ना?’ -शिसं १.१.
अडचण, ओढगस्‍तपणा
हाल. ‘आपले सैन्य इंग्रजांपाशी चाकरीस ठेवण्याचा तह करण्याविषयी गव्हर्नरचा नानास आग्रह चालला होता
पण त्‍यास त्‍यांतला मतलब कळून एकंदर राज्‍याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही.’ -निबंधमाला.

Related Words

ओम् फस होणें   गाय होणें   ठिकर्‍या होणें   पाठ पोट सारखें होणें   अर्धा जीव होणें   मन-मन उठणें-उडणें   कमाल होणें   अंगाचा खुर्दा होणें   फत्ते होणें   काळ विन्मुख होणें   सई होणें   निशाणी होणें   काळीज दो जागा होणें   मातीमोल होणें   खिरापत होणें   डोंब पाजळणें-होणें   बस-बसोटी-बस-बसोटी उडणें   हबेलंडी-हबेलंडी उडणें   पातळ होणें   तारंबळ   गळ्याचा लाखोटा होणें   आरती होणें-करणें   एकार जाणें-होणें-कलणें   भयांभयां होणें   गांडीचे रुद्राक्ष होणें   चरू होणें   नमो नमो होणें   बिरीज-बिरीज बिरीज होणें   एखाद्याची मुंबई होणें   बूड-गांड जड होणें   होन-होना पायली होणें   पूर्वाषाढा सुरु होणें   गार होणें   वज्रलेप होणें   मुंजाचा पितर होणें   सळो कीं पळो असें होणें   फुटाण्यासारखा उडणें   धापू होणें   दिशाभूल होणें   चतुर्भुज होणें   पाणपत होणें   उडणें   पुर्वापाढा सुरु होणें   खुंट होणें   (जिभेस) लाकूड होणें   पांढर्‍याचे काळे होणें   बाह्या फुरफुरणें-फुरारणें-उपासणें-उडणें   एखाद्याचा बाप होणें-बाप लागून राहणें   अरिष्टांतून पार पडणें, तोचि जिवाचा लाभ होणें   हंडीबाग-हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें   उजवा स्तन उडणें   उडणें   काळीज धडधड उडणें   खजुरी बोर्‍या उडणें   चांदी उडणें   चौपायीं धांवणें-पळणें-उडणें-सुटणें-निघणें   चौफेर निघणें-उडणें-लागणें-जाणें   जीव उडणें   तारंबळ   तीन ताड उडणें   धूळ उडणें   नाचणें उडणें   पत-पातेज उडणें   पत्रावळ उडणें   पाडा उडणें   पातेरा उडणें   पिकाचा फुफाटा उडणें   फुटाणे-फुटाणे उडणें-फुटणें   फुटाण्यासारखा उडणें   फडशा-फडशा उडणें   फेफे-फेंफें, फेफे होणें-उडणें   बंदूक-बंदूक उडणें   बस-बसोटी-बस-बसोटी उडणें   बाह्या फुरफुरणें-फुरारणें-उपासणें-उडणें   बोर्‍या-बोर्‍या उडणें-वाजणें   भगल-भग्गल-भगल-भग्गल उडणें   भदें उडणें   मन-मन उठणें-उडणें   रंग-रंग उडणें   रंजक-रंजक उडणें-झडणें   रेवडी-रेवडी उडणें-होणें   लाही-लाही उडणें   शिकल-शिकल उडणें   सरबत्ती-सरबत्ती उडणें-झडणें होणें   हबेलंडी-हबेलंडी उडणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP