• Register

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?

1,380 views
घरात एखादी व्यक्ति मरण पावली असता ब्राह्मणाकडे जाउन पंचांग पाहतात आणि त्या मरणवेळेबद्दल विचारतात. काय कारण असावे?
asked Apr 17, 2014 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,280 points)

1 Answer

+1 vote
द्विपाद, त्रिपाद आणि पंचक अशी तीन प्रकारची नक्षत्रे आहेत. या नक्षत्रावर मरण आल्यास त्याची दोन, तीन किंवा पाच वेळा घरातील अथवा जवळच्या नातेवाइकांवर पुनरावृती होते. हे टाळण्यासाठी प्रेत दहनाच्या वेळी पुत्तल विधी करतात, जेणेकरून हे अरिष्ट टळले जावे.

ज्योतिष शास्त्राप्रमाणे मृग, चित्रा आणि घनिष्ठा ही ` द्विपाद ' नक्षत्रे, कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा ही ` त्रिपाद ' नक्षत्रे आणि शततारका, उत्तराभाद्रपदा व रेवती ही ` पंचक ' नक्षत्रे समजतात. प्रेताला अग्नि देण्याअगोदर पुत्तलविधी  केला जातो. ज्या नक्षत्रावर मृत्यु झाला असेल त्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे दोन, तीन अथवा पाच गोळे करून प्रेताच्या छातीवर, प्रेताला अग्नि देणार्‍याकडून ठेवतात. याने शांती होते. या नक्षत्रांवर मरण आले असता पुत्तलविधी करावाच शिवाय चवदाव्या दिवशी उदकशांतीही करावी.

कांही समाजात हा विधी दहाव्याच्या दिवशीही करतात.
answered Apr 17, 2014 by TransLiteral (9,280 points)

Related questions

...