• Register

जननशांती म्हणजे काय ? ती केव्हा करावी ?

517 views
asked Mar 21, 2015 in Hindu - Beliefs by TransLiteral (9,280 points)

1 Answer

0 votes
ज्या बालकाचा जन्म कृष्ण चतुर्दशी, अमावस्या क्षय तिथी, अश्विनी नक्षत्राची पहिली ४८ मिनिटे, पुष्य नक्षत्राचे दुसरे व तिसरे चरण, ज्येष्ठा, आश्लेषा आणि

मूळ नक्षत्राची चारहीे चरणे, मघा नक्षत्र प्रथम चरण, उत्तरा नक्षत्राचे प्रथम चरण, चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध, विशाखा नक्षत्राचे चतुर्थ चरण, पूर्वाषाढा  नक्षत्राचे तिसरे

चरण, रेवती नक्षत्राची शेवटची ४८ मिनिटे, वैधृती, व्यतिपात भद्रा, ग्रहणपर्व काल, जुळे जन्मल्यास, अधोन्मुख जन्म असेल, माता किंवा पित्याच्या जन्म

नक्षत्राचर जन्म असेल, तीन मुलींवर मुलाचा जन्म झाला असेल तर, सूर्य संक्रमण पुण्यकाळ, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या काळात जातकाचा जन्म झाला

असेल तर जनन शांती करून घ्यावी लागते.

हि जनन शांती ब्राह्मण शक्यतो घरी न करता बाहेर देवळात करतात.
answered Mar 27, 2015 by TransLiteral (9,280 points)
...