• Register

शंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.

493 views
asked Jul 30, 2014 in Hindu - Puja Vidhi by TransLiteral (9,280 points)

1 Answer

0 votes

खरेतर शंखनादचा विपरित अर्थ असा की, उलटा हात तोंडावर ठेउन बोंब मारणे, आणि हे अशुभ समजतात. महादेवाच्या मंदिरात शंखनाद करतात. दत्तसंप्रदायाशी संबंधित नवनाथ, साधुदेखील शंखनाद करतात. शंखनाद करणे ही एक अतिशय पवित्र घटना आहे, त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते. घरात शंखनाद करू नये असे म्हणतात पण त्याला कोणताही शास्त्राधार नाही, पण घरात फक्त देवघरातच शंखनाद करावा. पूर्वीच्या काळी महाभारतात युद्ध सुरू करण्यापूर्वी शंखनाद करीत, आणि युद्ध चालू होत असे, त्यामुळे कदाचित कलहाला आमंत्रण मिळते म्हणून घरात शंखनाद करीत नसावेत. बंगालमध्ये लग्नात शंखनाद करतात, आणि ते पवित्र समजतात.

यजुर्वेदात सांगितले आहे की,

यस्तु शंखध्वनिं कुर्यात्पूजाकाले विशेषतः, वियुक्तः सर्वपापेन विष्णुनां सह मोदते ।

अर्थात जी व्यक्ति पूजेसमयी शंखनाद करेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याला भगवान विष्णुसोबत आनंद प्राप्त होतो.

घरात दक्षिणावर्ती शंख असावा.

answered Jul 30, 2014 by TransLiteral (9,280 points)

Related questions

...