• Register

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?

140 views
asked Aug 31 in Hindu - Puja Vidhi by TransLiteral (9,280 points)

1 Answer

0 votes
गणेशोत्सवाच्य काळात सार्वजनिक गणेशासमोर अथवा घरी सत्यनारायण पूजा करतात, ते अस्थानी विधान आहे. कारण त्या त्या देवांसमोर त्यांचीचे व्रते करावीत. उदा. गणेशासमोर गणेशाचे आणि देवी समोर देवीचेच.

जर तुम्ही पोलीस कमिशनर समोर बसून आयकर कमिशनर बद्दल बोलत असताल तर?

अगदी तसेच जर आपण मोरयासमोर " दुर्गे दुर्गट भारी :" आरती म्हणू तर ते कसे होईल? आरती ही त्या देवी देवतांची स्तुती असते, मग त्या देवासमोर त्यांचीच स्तुती करावी ना? बॅंक अधिकार्‍यासमोर जर, व्यापार्‍याची स्तुती केली तर कर्ज मिळेल काय?

आता असा युक्तिवाद होतो की, देव एकच आहे, तर देवीच्या पूजनाला साडी खण बांगड्यांची तयारी केली तर ती पूजा मारूतीला चालेल काय?

अद्वैताची निर्गुण निराकाराची पूजा, सगुण साकार उपासनेत चालत नाही.

मोरयासमोर जर व्रत पूजा करावयाची असेल तर " सत्य विनायक "च. आतापर्यंत जर सत्यनारायण करत असताल तर विसरा पण यापुढे " सत्य विनायक " पूजा करा.

सत्य नारायणाच्या पूजेत आपण पुजारी असतो आणि भगवान श्रीकृष्ण पूज्यदेवता असतात. पण सत्य विनायक पूजेत भगवान श्रीकृष्ण पूजक आहेत आणि गणपती बाप्पा पूज्य परमात्मा आहे.

भगवान शंकर हे व्रत आदिशक्ती पार्वतीला सांगतात की, श्री ब्रह्मदेवांनी सृष्टीरचना आणि श्रीविष्णूंनी सृष्टी पालनासाठी सामर्थ्य लाभावे म्हणून हे व्रत पूर्वी केले होते. श्री सत्यविनायक व्रतात श्री महान गजानन गणेशाची, जे पंचेश्वरांनाही पूजनीय आहेत, त्यांची कथा वर्णिलेली आहे.

तरी गणेशोत्सवाच्या काळात सत्य विनायक व्रत करावे.

 

-
answered Aug 31 by TransLiteral (9,280 points)
...