TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|स्वात्मसौख्य|ज्ञानकांड|
ज्ञानकांड ओवी संग्रह २

स्वात्मसौख्य - ज्ञानकांड ओवी संग्रह २

श्रीस्वात्मसौख्य ग्रंथात कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक विज्ञानांतील मुख्य सर्व गोष्टी सूत्ररुपाने दाखविल्या आहेत


ओवी संग्रह २

इहजन्मीं आश्वलायन । जन्मांतरी माध्यंदिन ॥

तदनंतरें सामपठण । तृतीयवेदीं ॥११॥

अथर्वण चतुर्थवेद । शुद्धयादिक माझा भेद ॥

पंचम तैं कैवल्यपद । वामांग जें ॥१२॥

सूक्ष्म वेद तो वामांग । अणुप्रमाण ज्याचें अंग ॥

ज्ञानकांडाची लगबग । झाली माते ॥१३॥

वाचें हातीं बोलविता । ऐसी लाघविका सत्ता ॥

जैसा उगवला सविता । प्रकाशरुप ॥१४॥

सूर्याचा प्रकाश झाला । अन्यत्र काय घेऊन आला ॥

शब्दी शब्द प्रकटला । प्रगटाकृती ॥!५॥

मुख्य पाहतां कारण । तेंचि ज्ञान संभाषण ॥

उभयत्रासी जाणून । विज्ञानरुपें ॥१६॥

विज्ञान रुपाचा देखणा । देखिल्याविण आणिला ध्याना ॥

तरी या संप्रदाय खुणा । काय व्यर्थ होती ॥१७॥

व्यर्थ कांहीच न कीजे । सकळ ब्रह्मरुप जाणिजे ॥

अवकाशमाजी देखिजे । घनस्वरुप ॥१८॥

अवकाशामाजी घन । तें घटांतरील चिन्ह ॥

विश्व व्यापूनी अभिन्न । भिन्न नाहीं ॥१९॥

भिन्न भावितां भासे सर्प । परि रज्जूचा आरोप ॥

यदर्थी काय साक्षेप । करावाची लागे ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-10-13T05:48:21.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पंच कल्याण-णी

  • चार पाय गुडघ्यापर्यंत पांढरे व तोंडावर पांढरा पट्टा असलेला घोडा. ‘पंचकल्याणी घोडा अबलख।’ 
  • (उप.) सर्व अवयव विकृत असलेला मनुष्य. 
  • (उप.) भाडयाचें तट्टू (यास दोन टांचांनी, दोन मुठींनीं व दांडक्यानें मारुन किंवा तोंडानें चक्‌चक करुन चालवावें लागतें म्हणून). 
  • (उप.) ज्याच्या नाकास सदैव शेंबूड असून तो मणगटानें टिरीस पुसतो असा पोर. 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.