वेदांताविण बात्द्य - वैदिकमतें जीवात्मता त्या मती
सूक्ष्माहूनिहि सूक्ष्म शाश्वत सदा नित्यत्वही मानिती
प्रत्यक्षां जरि सूक्ष्मता अनुभवीं जीवा न हे बाधिती
स्व - प्रामाणिकता मतासि तितुक्या सर्वासही साधिती ॥१॥
नाना जीवहि मानितां अणुपणें नित्यत्वही आणिता
वृद्धिर्‍हास नसे तयासि अथवा आहे वदा तत्वता
वृद्धिर्‍हास नसे म्हणाल नघडे तेव्हां अहो नित्यता
वृद्धिर्‍हास नसे तई अनुभवा येताचि देहात्मता ॥२॥
मशक तेचि तिमिंगिळ जेधवां कसि न वृद्धि तयासिहि तेधवां
मशक - देह तिमिंगिळ पावती उरति ते अणु होउनि मागुती ॥३॥
नपावे जई वृद्धि विस्तीर्ण देहीं नव्हे स्वल्य देहीं जई र्‍हास कांहीं
नव्हे भोग अत्यल्य ते जीव जेव्हां घडे भोग सर्वत्र तो थोर तेव्हां ॥४॥
व्यापीन हा देह समस्त जेव्हां गृहांत तैसा तनुमाजि तेव्हां
भिंतीस स्रक - चंदन - भोग होती याला न ते तों सुख शैत्य देती ॥५॥
गृहामाजि देहास जों आढळेना गृहस्थासि शीतोष्णता तों कळेना
गृहा ऊपरी तापतो सूर्य जेव्हां गृहीं हा सुखी साउली मानि तेव्हां ॥६॥
शरीरास शीतोष्णता जेथजेथें शरीरीं स्वयें भोगितो तेथतेथें
कसें व्यापकत्वासि नाहीं म्हणावें कडें हातिंचें दर्पणीं कां पहावें ॥७॥
व्यापोनि देह सुख - दुःखहि भोगिताहे
त्याला अणुत्व म्हणणें सहसा नसाहे
त्याला महत्व म्हणतां मग सर्व देहीं
तो एक भेद मग जीवपणासि नाहीं ॥८॥
नसे भेद चैतन्यजीवांसि जेव्हां नव्हे भोगणें वेगळें त्यासि तेव्हां
अणुत्वा महत्वासही हा नसाहे वदा हो कसा केवढा जीव आहे ॥९॥
बहू थोर हा मानिजे जीव जेव्हां घडे एक - जीवत्व - सिद्धांत तेव्हां
असे दूषिला हा कुसिद्धांत पूर्वी तसी अल्पता हे घडेनाचि सर्वीं ॥१०॥
येथें बहू भांडति भेद - वादी अणुत्व आहे म्हणताति वेदीं
कुयुक्ति ही आणिति येथ कांहीं तथापि ते साधक होत नाहीं ॥११॥
उपाधियोगोंचि अणुत्व वेदीं ते मानिती सार्थक भेदवादीं
तये स्थळीं हे श्रुति बोलिजेते या श्लोक वृत्तें वरि वाचिजेते ॥१२॥
बुद्धेर्गुणेनात्मगुणेन चैव आराग्रमात्रे त्द्यवरोपिदृष्टः
या वेद वाक्यें अणुतेसि जेथें निरुपिला भाव असाचि तेथें ॥१३॥
गुणें बुद्धिच्या आत्मयाच्या गुणेंही कधीं अत्यही होय अत्यंत देही
गुणें बुद्धिच्या शुद्धसत्वांत नीरीं चिदात्मा दिसे चिद्गुणें त्या शरीरीं ॥१४॥
उदक अल्प बहू घट जेवडा मनिफळे अवकाशहि तेवडा
म्हणुनि अल्प उपाधि घडे जई तदनुरुप चिदात्मकता तई ॥१५॥
म्हणुनि जीवपणें अति सूक्ष्मता जसि उपाधी तसी प्रतिबिंबता
सहज बिंब अनंत असे स्वयें परि अणू प्रतिबिंबचि विस्मयें ॥१६॥
अणोरणीयान् महतो महीया नात्मा गुहायां वदति श्रुती या
अणोरणीयान् प्रतिबिंबरुपें महत्व चिद्विंब सुख - स्वरुपें ॥१७॥
अणुत्व वदवे कसें न घडतां परिच्छिन्नता
अणूहुनि अणू जसें नवदवे महापर्वता
गिरींद्र अणुमात्र तो अणु जळांत भासे जसा
उपाधि अणु त्यामध्यें अणु दिसे चिदात्मा तसा ॥१८॥
उपाधिविण तो स्वयें न अणुमात्र आत्मा असे
विरुद्ध अणुमात्रता अनुभवीं समस्तां दिसे
म्हणाल अभिमानुनी तनुसि भोग भोगी जरी
वदा गृह - तनूंतही तदभिमानियाच्या परी ॥१९॥
गृहीं गृहामाजि गृहाऽभिमानी छायेंत त्याचे न तदुष्ण मानी
गृहावरी वृष्टि परंतु याला लागेल ते वृष्टि किमर्थ बोला ॥२०॥
देहाभिमानी तरि उष्ण - शीतें स्पर्श कसें हो सुख दुःख होतें
शीतोष्ण वारुनि गृहांत जैसा देहांत कां जीव असे न तैसा ॥२१॥
जैसा गृहीनिजगृहावरि उष्ण वृष्टी
घेऊनि आंत वसतो परि तो न कष्टी
व्यापूनि जीव नसता तरि सर्व गात्रें
दुःखी सुखीहि नव्हता अभिमान - मात्रें ॥२२॥
जैसा गृहीं गृहतनूवरि उष्ण वृष्टी
घेऊनि आंत नव्हता जरि जीव कष्टी
व्यापोनि यास्तव असे अवघ्या शरीरीं
कैसा गृही निजगृहांत अशा प्रकारीं ॥२३॥
अणुत्व अत्यंत विरुद्ध ऐसें वेदीं पुराणीं वदतील कैसें
तथापिही बोलति भेद जेथें उपाधि योगें प्रतिबिंब तेथें ॥२४॥
वेदीं पुराणीं प्रतिबिंबरुपी जीवासि या वर्णिति चित्स्वरुपी
उपाधियोगें प्रतिबिंब जेव्हां उपाधिकत्वें अणुरुप तेव्हां ॥२५॥
अणुस्वरुपेंचिकरुनि जेव्हां एकत्र देहांत असेल तेव्हां
अन्यत्रही भोग तयासि कैसे होतील कां पां नपहाचि ऐसें ॥२६॥
यानंतरें बोलति युक्ति काहीं कीं व्यापतो चंदन - बिंदु देहीं
एकत्र तो बिंदु जसा असोनी व्यापी तनू शीतळ तें करुनीं ॥२७॥
एकत्र हा जीवह याप्रकारें असोनियां व्यापितसे शरीरें
अदीर्घदर्शी कुमताऽभिमानी जो आइके तो खरि युक्ति मानी ॥२८॥
जो व्यापितो चंदन - बिंदु देहीं तें शैत्य त्याचा गुणमात्र कांहीं
तें नाशतें शैत्यहि अग्नितापें तो बिंदु अंगीं असतां स्वरुपें ॥२९॥
न शैत्य नाशे जरि बिंदु - नाशें सर्वत्र हा भोग वदाल कैसें
शैत्यासवें बिंदुस नाश येना तेव्हां तयाचा गुण भिन्न माना ॥३०॥
देहीं गुण व्यापक चंदनाचा मानाल तैसा जरि सिद्ध साचा
देहीं जई व्यापक गंधबिंदू शैत्यें तई व्यापक कान इंदू ॥३१॥
दीप - प्रभाव्यापक सर्व - गेहीं जैसी तसा व्यापक जीव देहीं
या व्यापकत्वीं सुख दुःख जेव्हां न व्यापकातें सुख दुःख तेव्हां ॥३२॥
पायांत शैत्य न उरे जरि ताप ताहे
भाळीं यथास्थितचि चंदनबिंदु राहे
रात्रीं जळे वन तयांतिल शैत्य नाशे
तेव्हां नभीं न शशिमंडळिं दाह भासे ॥३३॥
न तापे शिरीं पोळतां पाय बिंदू न तापे दिशा तापतां पूर्ण इंदू
जरी सर्वदेहासि जीव प्रकाशी न दुःखी सुखी बोलवे एक देशी ॥३४॥
न हाले घरीं दीप निर्वातदेशीं जरी बात्द्य - वात - स्थळीही प्रकाशीं
तसा जीवही एक देशी शरीरीं तया भोग सर्वत्र कैशा प्रकारीं ॥३५॥
भाळीं चंदन वाळलें परि पुन्हा ओलें जळें होतसे
पायीं व्यापक तें तरी पद धुतां ओलें न जेव्हां दिसे
तेव्हां जीव त्द्यदंबुजीं नखशिखा व्यापोनि आहे तसा
कांतालिंगन - ताडनें करि सुखी दुःखी शरीरीं कसा ॥३६॥
ओले होतां चरण निढळीं गंधही आर्द्र होतें
तेव्हां साम्य स्व - मति - कृत हें व्यापकत्वासि येते
दृष्टांतीं हा असुख सुखही भोगितो सर्वठायीं
जैसा पाहा त्दृदयिं म्हणतां मस्तकीं हात पायें ॥३७॥
म्हणाल हे अद्भुत जीवशक्ती शक्तीस नाहीं सुख दुःख भुक्ती
तथापि हा जीव असेल जेथें देतील शक्ती सुख दुःख तेथें ॥३८॥
हे भोग तेव्हां त्दृदयीं घडावें सर्वत्र देहांत न सांपडावे
या कारणें सर्वहि या कुयुक्ती अणुत्व तेव्हां न घडेल भुक्ती ॥३९॥
नाडिद्वारा म्हणति फिरतो जीव हा तेथतेथें
देहामध्यें असुख सुख घे कारणें होति जेथें
एके काळीं नघडति तरी शीत - उष्णादि बाधा
तर्के ऐशा करुनि अणुता या स्वजीवासि साधा ॥४०॥
वेदाश्रितें भेद - मतें समस्तें झालीं पहा येरिति येथ अस्तें
सिद्धांत हा भास्कररुप जेथें भेदांधकारा बळ काय तेथें ॥४१॥
अणुत्वा महत्वा न हा जीव साहे स्व - नानात्व एकत्वही जो न लाहे
म्हणोनी अनेका जळीं सूर्य नाना तसा जीव - सिद्धांत दूजा घडेना
म्हणउनी श्रुतिही वदती असें स्मृति - पुराण - कदंब वदे तसें
सकळ बिंब हरी प्रतिबिंब हा जितुकिजे तनु हा तितुका पहा ॥४३॥
सकळ - जीव - कदंब हरी स्वयें अनुभवी प्रतिबिंबपणें भयें
लय - सुषुप्तिंत नित्य तदैक्यता हरिस कां नघडे सकळात्मता ॥४४॥
अनुभवी सुख दुःख पृथकपणें डळमळी जळिं भानु न आपणें
अणुमहत्वउपाधिगुणें तया प्रकृति ईश - अनीशपणें जया ॥४५॥
अनीश माया - प्रतिबिंबरुपी ईशत्व तें बिंब सुख - स्वरुपी
अनीश्वरोपाधिमधें अविद्या उपाधि जो ईशपणांत विद्या ॥४६॥
दुःखादि - भोक्तृत्व अनीश्वरासी भोक्तृत्व नाहीं परमेश्वरासी
सिद्धांत ऐसा सकळश्रुतींचा ज्या द्वासुपर्णादिक वेद - वाचा ॥४७॥
म्हणुनि तत्वभमी बहुधा श्रुती वदति ऐक्य अवाधित येरिती
असिपदें निरुपाधि चिदैक्यता हरुनि भेद निरुपति तत्त्वता ॥४८॥
असिपदें जरि नित्य चिदैक्यता वदतसां कसिचित्प्रतिबिंबता
जरि म्हणाल असें तरि तत्त्वता प्रतिमुखासि निदान मुखात्मत ॥४९॥
घडि घडी प्रतिबिंब दुजें दिसे परि मुखाविण अत्प न तें असे
मुटुळ नीर तई स्वमुखीं वसे प्रतिमुखास दुजें वदतां कसे ॥५०॥
प्रत्यक्ष भेद नदिसे पडतां सुषुप्ती
स्वप्नांत जागृतपणीं उभय प्रतीती
देहामधें प्रतिमुखीं सुख - दुःख - सिद्धी
बिंबावरी फिरति सर्व सबात्द्य वृद्धी ॥५१॥
बिंबत्मतें करुनि बुद्धि जगांत धांवे
देहांत दुःख सुख हें प्रतिबिंब पावे
सर्वानुभूति परि हे नकळे जनाला
अल्पाविणें स्फुरण तों नघडे मनाला ॥५२॥
हें उत्तर प्रकरणीं जगदेकबंधू
बोलेल वामन - मुखें करुणैकसिंधू
हा जीवतत्व म्हणऊनि अशेष - नाथें
अध्याय येथ रचिला निजबोध जेथें ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP