नाम सुधा - अध्याय ३ - चरण ३

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


आत्मा हरि प्रिय असें समजोनि वाचे

गानी गुण श्रवणिं आइकती तयाचे

ते भक्त दुर्लभ तरी अधिकार तेथें

सर्वा म्हणूनि वदला यमधर्म येथें ॥१॥

सर्वास भक्ति अधिकार जया प्रकारें

तोही उपाय वदला यम या विचारें

कीं साधन प्रथम माधवनाम घेणें

नाशूनि पाप भजनीं रुचि होय तेणें ॥२॥

त्याही मधें नकळतांचि जरी स्वभावें

येती मुखा हरिति पातक विष्णुनावें

या कारणें स्मरणकीर्तन - रुप नामें

तीं मुक्तिहूनि अधिकें सुखपूर्णकामें ॥३॥

म्हणुनिनिर्णय वर्णियला यमें वदति जो मुनिहो निगमागमें

परि न जाणति कर्मठ धर्म हा म्हणतसे यमधर्मचि तें पहा ॥४॥

म्हणाल नामीं जरि मुक्ति होते कां कर्ममात्रीं रत शास्त्रवेत्ते

ते मोहिले वैदिककाम्य - कर्मे बोलेले ऐसीं यमधर्म वर्मे ॥५॥

यम म्हणे निगमागम जाणती जन तयांसि महाजन बोलती

परि तयांसि रहस्य न ठाउकें करितिकर्ममखादिक कौतुकें ॥६॥

विरळ त्यांत रहस्य विचारुनी तरति हे हरिच्या गुणकीर्तनीं

परि अहो बहुतेक न जाणती मृगजळांत बुडोनिहि राहनी ॥७॥

यज्ञादिकींकरुनि होइल चित्तशुद्धी

ज्ञाने करुनि तदनंतर मोक्षसिद्धी

या कारणें निगम बोलति यज्ञ - दीक्षा

हे स्वर्ग - मात्र - गमनीं धरिती अपेक्षा ॥८॥

स्वर्गादिकाम करिती विविधां मखांसी

ते तों न पावति निजात्म महासुखासी

कोशिंबिरी करुनि भक्षिति पुष्पमात्रें

त्याला फळें मग न त्यां तरुचीं विचित्रें ॥९॥

यज्ञादि - वृक्ष फळ मोक्ष तयांसि येती

स्वर्गादिरुप - सुमनें जन तींच घेती

सर्वज्ञ जे करिति त्या सुमनीं उपेक्षा

होऊनि तींच सुमनें फळ देति मोक्षा ॥१०॥

फुलोएं भक्षितो तो फळें केविं लाधे मनीं स्वर्ग कैंसा तया मोक्ष साधे

मनीं कामना तेन तों चित्तशुद्धी अशुद्धां तयां केवि कैवल्यसिद्धी ॥११॥

स्वहित केवळ ते न अपेक्षिती तरिच ते हरिभक्ति उपेक्षिती

त्यजुनियां अमरां अमरावती प्रतिहि जाउनि दुःखचि भोगिती ॥१२॥

जसा भाडियाचा तदू स्वर्ग तैसा तयाचा अहो मानिती लाभ कैसा

सरे पुण्य लोटूनियां देति जेव्हां रडे फुंढफुंदों पडे मूळ तेव्हां ॥१३॥

धरुनी भुजीं कंठ देवांगनाचे विमानी वनी नंदनी तेथ नाचे

भुजें त्याच त्यांचे गळे ते धरुनी रडे त्यांस टांकूनि जातां म्हणूनी ॥१४॥

पुण्यास पाप म्हणती अतएव योगी

आधंत पाप - पळ यद्यपि पुण्य भोगी

लोखंड - रुप जसि पातक - कर्म - बेडी

बेडी सुवर्णमय हे तरि काय गोडी ॥१५॥

स्वर्गादिपुण्यफळ इच्छुनि दीर्घ - कामी

झाले महाजन पराङ्युख विष्णुध्रामी

लोकांस गोड उपदेशहि हाचि वाटे

अंधासवें फिरति अंध जसे कुवाटे ॥१६॥

स्वर्गादिमात्र वदती फळ वेद जेव्हां

आद्यंतवंत फळदायक मात्र तेव्हां

राज्यादिलाभकर लौकिक यत्न जैसे

स्वर्गादिलाभपर वैदिक यज्ञ तैसे ॥१७॥

वेदीं चातुर्मास्थयाजी तयाचें आहे कींजें पुण्य अक्षय्य साचें

नेणोनीयां अर्थ ते त्या श्रुतीचा वाखाणीती भाव जैसा मतीचा ॥१८॥

म्हणति अमर देवां नश्वरांलागिंजैसें

कतुफळ वदती हे वेद अक्षय्य तैसें

अमरहि मरणातें पावती दीर्घकाळें

क्षय बहु दिवसांतें अक्षयें कर्ममूळें ॥१९॥

वदति शाश्वतमुक्तिफळें श्रुति तरि तदर्थ किमर्थन ये रिती

म्हणुनि येथ असें जरि बोलती तरि वदों प्रतिउत्तर त्यांप्रति ॥२०॥

नव्हति शाश्वत मुक्तिफळें तरी श्रुति पुराण असें असतें जरी

नव्हति शाश्वत कर्ममयें फळें म्हणुनि बोलतसें श्रुति या बळें ॥२१॥

नाना कर्म करुनियं क्षितितळीं राज्यादि संपादिती

तैसा स्वर्गहि यज्ञ - पुण्य - विविधा कर्मीच कीं पावती

जैशा या इहलोक राज्यपदव्या कर्मार्जिता नासती

तैसीं तीं परलोक दैविक पदें बोले असे हें श्रुती ॥२२॥

आतां चातुर्मास्ययज्ञादि पुण्यें अक्षय्येंतीं केविं बोला अगण्यें

तेव्हां ऐसा अर्थ अक्षय्य - शब्दें कींते पुण्ये राहती फार अब्दें ॥२३॥

म्हणूनि देवां अमरत्व जैसें नित्यत्व या कर्मफळासि तैसें

कोण्ही श्रुति ज्ञानफळासि तैसा न बोलती नाश तयांत ऐसा ॥२४॥

या कारणें मुक्तिसि नाश नाहीं न नित्यता कर्मफळासि कांहीं

सोडूनियां मोक्ष अशा फळाला बोलेल कां वेदजनास बोला ॥२५॥

स्वर्गकाम - सुतकाम - जनाला यज्ञ कां वदतसे श्रुति बोला

पूर्वपक्षकरिताति असा ही वेदतत्व तरि ठाउक नाहीं ॥२६॥

नयनि दाउनि लडुक शर्करा जननि दे कडु औषध लेंकरा

न फळ साखर औषधिचें जसें श्रुति वदे फळ काम्य जगीं असें ॥२७॥

करुनि वैदिक कर्म जसें तसें म्हणुनि वेद फळें वदती असें

तदपिही न विरक्त जनाप्रती फळ अपेक्षित त्यासचि मागती ॥२८॥

स्वर्गाचीही कामना ज्या नराला जौतिष्टोमा तो यजू कां सुराला

ऐसा अर्थ स्पष्ट पाहा श्रुतींत ज्योतिष्टोमा स्वर्गकामो यजेत ॥२९॥

श्रवण कीर्तनही वदती श्रुती परि न तुच्छ फल श्रुति बोलती

म्हणति वैष्णवधर्म धरा अरे त्रिभुवनेश्वरकर्म पहा बरें ॥३०॥

ऋग्वेदिंचि त्रीणिपदा म्हणुनी हे गर्जताहे श्रुति विश्वकानीं

कीं विष्णुचे धर्म धरुनि राहा ऐकोनि तत्कर्म मनांत पाहा ॥३१॥

गोशब्दें जड बुद्धि इंद्रिय तथां जे पाळिती गोप ते

हे गोपाळ म्हणूनि हे श्रुति तथा संबोधुनी बोलते

कीं हें आक्रमिलें पदेंकरुनियां त्रैलोक्य याकारणें

त्याचे धर्म धरुनि कर्महि पहा कर्मासि जें पारणें ॥३२॥

कर्माणि पश्यति म्हणे श्रुति विष्णुकर्मे

पाहा मनीं श्रवण - कीर्तनरुप - धर्मे

संध्या जसी श्रुति वदे विधि येथही हा

कर्माणि पश्यति म्हणे हरिकर्म पाहा ॥३३॥

स्वर्गादिकाम नर ते कमळापतीची

सेवा करुनि असि उक्ति कधीं श्रुतीची

येथें उग्याच म्हणती हरिकर्म पाहा

त्या विष्णुचे परम धर्म धरुनि राहा ॥३४॥

ऐसा विवेक न कळोनि मुकुंदनामीं

श्रद्धा न ते धरिति वैदिक लोककामीं

स्वर्गासि जातिल कदाचित ते तथापी

जाती अधोगतिस होउनि तेचि पापीं ॥३५॥

नहुष इंद्रपदाप्रति जाउनी त्रिभुवनेश्वर इंद्रहि होउनी

भुजग होउनि तो पडला जसा रकडांसहि शेवट तो असा ॥३६॥

स्वर्गासि जाउनि हि मागुति जन्म पावे

दुर्वासनें करुनि पापपथींच धांवे

तेव्हां तयावरि कृतांत करी चपेटा

हा काम्य वेदपथ याकरितांच खोटा ॥३७॥

यालागिं केवळ फळात्मक वेदवाचा

जैसी लता फुलति हाचि विचार तीचा

पुष्पें उपेक्षिति तयां फळलाभ देती

दूतांसि येथ वदला यम येचि रीती ॥३८॥

पढतमूढ धरुनि अशा श्रुती फुलचितें फळ मानुनि मोहनी

म्हणुनि नेणनि वैष्णवधर्म ते करिति तुच्छफळात्मक कर्मते ॥३९॥

या अध्यायीं श्लोक जो बाविसावा व्यासें केला साधकांचा विसावा

तेथें दूतां धर्म जें बोलियेला या तीं श्लोकीं अर्थ तो सिद्ध केला ॥४०॥

तन्नामस्मरणें तदद्वयपणें त्याची कळे आवडी

तन्नामें सुटला अजामिळ तुम्हां हे साक्षि तों रोकडी

ऐसे धर्म न कर्मठांस कळती एवं स्वदूताप्रती

धर्मे सांगितलीं पुढें वदतसे सद्वैष्णवांची रिती ॥४१॥

ऐसें बरें दृढ विचारुनि दीर्घबुद्धी

टांकूनियां सकळ वैदिक - काम्यसिद्धी

सर्वात्मभाव धरिती मग ते अननीं

नामेंचि भक्ति असि साधिलि सर्व संतीं ॥४२॥

माझें नसे यम म्हणे भय एक त्याला

कीं विष्णु - भक्ति - निधि सापडला जयाला

स्वर्गास जाउनि हि कर्मठ जन्म घेती

पापें असे नरक मागुति त्यांस होती ॥४३॥

ऐसा मनीं धरुनि भाव कृतांत आतां

श्लोकोत्तरार्ध वदतो यम त्या खदूतां

कीं दंड योग्य नव्हती हरिदास माझे

त्यांचे शिरीं कधिं पडेलन दंड - ओझें ॥४४॥

पाण्यास दंड करणें मदधीन येथें

नामाऽनळें सकळपातक भस्म तेथें

त्याला प्रवृत्तिच कधीं न घड़ेल पापीं

तेही तुरे जरि घडेल कधीं तथापी ॥४५॥

वैकुंठदूतां यमधर्मदूतां परस्परें ये रिति वाद होतां

अजामिळाला उपदेश व्हावा दुःसंग त्यानें अवघा त्यजावा ॥४६॥

संकल्प ऐसा हरिनेंचि केला याकारणें वाद तयांसि झाला

जीवंत ते यास्तव दूत गेले श्रीविष्णुशस्त्रें करिं ते न मेले ॥४७॥

जरि असें हरिच्या न सतें मनीं परतने यमदूत न तेथुनी

वदति नाम तथां हरि आयुधें सतत रक्षिति होउनि सावधें ॥४८॥

म्हणूनियां श्रीहरि भक्ति जेथें झणी तुम्हीं नेणत जाल तेथें

येणे रितीनें यमधर्म आतां हितोपदेशें वदतो स्वदूतां ॥४९॥

जे साधु विष्णुमय पाहति सर्व सृष्टी

ज्यांच्यासदा वदति देव पवित्र गोष्टी

ते वासुदेव शरणागत भक्त जेथें

त्यांच्या झणी जवळि जाळ कदापि तेथें ॥५०॥

यम म्हणे यमकिंकर हो सदा हरिजनासि रमा पतिची गदा

करि सुरक्षण काय तयां भयें न करवे मन दंड तयां स्वयें ॥५१॥

हरिजनास पहाल तुम्ही जरी करिल मृत्यु गदा हरिची तरी

विहित दंड धरा इतरा नरीं म्हणुनियां यम वर्णिल यावरी ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP