नाम सुधा - अध्याय २ - चरण २

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


प्रायश्र्वित्तें बहु परि न तीं शुद्धि अत्यंत देती

जैसीं नामें सुलभहरिगुणालागिं जे सूचवीती

तेथें जेव्हां मन रुचि धरी तो पडे केविं पापी

ऐसें पूर्वी विशद बदले विष्णुदूत प्रतापी ॥१॥

आतां म्हणाल असि होउनि विष्णुभक्ती

दुर्वासना जरि करी विषयीं प्रसक्ती

हेही न केवळ विशुद्ध म्हणाल जेव्हां

सांगों रहस्य म्हणती हरिदास तेव्हां ॥२॥

नामींच शुद्धि जरि आचरला तथापी

धांवेल तेंचि मन मागुति त्याच पापीं

तेही न शुद्धि बरधी परि याच नामीं

जें शुद्ध सत्त्व मन तें न बुडेल कामीं ॥३॥

नकळत महिमाही जाळिती सर्व पापें

त्रिभुवनपतिनामें आपुलीया प्रतापें

पुनरपि मन पापीं धांवतें तें न धांवे

जरि हरिगुणगोडी अंतरंगी ठसावे ॥४॥

ऐसी तथापिहि न इच्छिति शुद्धि कामीं

कामीं प्रवर्तनि जरी हरिच्याच नामीं

जे इच्छितील असि शुद्धिहि दीर्घबुद्धी

त्यांची त्वरेंकरुनि होइल सत्त्वशुद्धी ॥५॥

विषय तामस राजस इंद्रियें गढुळ सत्त्व अखंड गुणद्वयें

विषय वाटति गोड बडू मना म्हणुनि सोडवती न कधींजना ॥६॥

करिनि कीर्तनही हरिचें मुखें परि मनीं अतितुच्छतरें सुखें

मन निघो विषयांतुनि थेरिती विषयनिष्ठ कदापि न इच्छिती ॥७॥

करिती कीर्त्तन तेसमयीं हरी वदति मात्र परंतु न अंतरीं

प्रकटतो मनिं माधव जे स्थळीं प्रबळ तेस्थाळिं काम न हा बळी ॥८॥

विषय शत्रु मनीं जयिं वाटती मनिं तया हरिचे गुण दाटती

विषयपाश अशेपहि तूटती मग कधीं कुपथीं न रहाटती ॥९॥

परि न शुद्धि असी जन इच्छिती नरतिजे असि शुद्धि अपेक्षिती

जरि अपेक्षिति काय तया उणें परम शुद्धि रमापतिच्या गुणें ॥१०॥

रज तम गुण दोन्हीं दुष्ट अत्यंत यासी

हरिगुण - अनुवादी छेदिती निश्वयासी

करुनि विमळ सत्वा त्या नरा सत्वधीरा

पुनरपि अणु लागों नेदिती पाप वारा ॥११॥

असिहि शुद्धि अपेक्षितिजे जनीं त्वरित ते तरती हरिकीर्तनीं

म्हणुनि निर्णय हा अति - निश्चयें कथियला हरिच्या भृतकीं स्वये

परमशुद्धि न इच्छिल तो जरी करिल शुद्धहि पाप पुन्हा तरी

म्हणुनि संशय हा धरितो गळां तरि पहा तुम्हि येथ अजामिळा ॥१३॥

सुतमिषें घडतां हरिकीर्त्तनें पतित उद्धरिलाचि जनार्दनें

परि हरुनि कुसंग सुसंगती करुनि दीधली त्यासहि संगती ॥१४॥

सहजकी हरिकीर्तन जो करी सुमतित्यासहि देयिल तो हरी

परम शुद्धिहि जे जन इच्छिती सुमति दे हरि तोचि रमापती ॥१५॥

परि मनीं अतिशुद्धि अपेक्षिती त्वरित ते फळ उत्कट पावती

त्यजिति ते विषयात्मक वासना जितचि मुक्ति अहो मग त्या जनां ॥१६॥

म्हणुनियां मथितार्थ कसे परी पतितपावनया वदनीं हरी

त्वरित नासनि पूर्विल पानकें मग हरी हळु दाविल कौतुके ॥१७॥

इतर शुद्धिहि तो हरि देतसे परि जसा क्रय विक्रय होतसे

करिति जे व्रत तीर्थ तपें जसीं हरि विशुद्धिहि देत असे तसी ॥१८॥

निज अपत्यजना सकळांपरी सकळ लक्षिनि लोक असा हरी

वदनि नाम अखंड जयांचिया करि समस्तहि शुद्धि तयांचिया ॥१९॥

म्हणुनि ये रितिनेंचि अजामिळा, सुमति देउनि सोडवितो गळा

श्रवण हें निजदासमुखें तथा करउनी करितो हरि हे दया ॥२०॥

इतर शुद्धिस हा गहिमा नसे अजित नाम न जंथ मुखीं वसे

म्हणुनियां जन हो भल भलत्यापरी पतितपावन यो वदनीं हरी ॥२१॥

पतित पावन - नाम - पदें जसीं करिति शुद्धि न तीं इतरें तसीं

म्हणुनि नेउं नका नरकाप्रती द्विज असें हरिकिंकर बोल ती ॥२२॥

नेऊं नका तुम्हि अतःपर या द्विजाला

संव्हार ज्यास्तव अघां सकळांस झाला

कीं जेधवां मरणकाळ सरों निघाला

तेव्हां मुखीं पतिनपावन विष्णु आला ॥२३॥

मरणसमयिं याचें नाम वाचेसि आलें

म्हणउनि अवघेंहि पाप याचें जळालें

जितचि अजित - नामें हीं न जेव्हां समर्थ

म्हणउनि मनि शंका श्रोतयां या श्रुतार्थे ॥२४॥

अभिप्राय हा व्यक्त होईल जेव्हां मनींहूनि शंका निवारेल तेव्हां

अहो वर्णिला मूळ पद्यार्थ ऐसा वरा आयका येथ भावार्थ कैसा ॥२५॥

पूर्वश्लोकीं वासना - त्याग रीती जे कां शुद्धि इच्छिती त्यांस होती

ऐसे जें कां बोलिले त्या द्विजांला नाहीं झाला येथ संदेह ज्याला ॥२६॥

अशेष पापें म्हणतां जळालीं जे शुद्धि त्याला न कळोनि झाली

नो मृत्यु येतां इतुक्यांत कांहीं कुकर्म झालें तरि शुद्धि नाहीं ॥२७॥

असें बोलती दूत चित्तीं यमाचे म्हणोनी मनीं दूत सर्वोत्तमाचे

विचारुनियां बोलनी मृत्यु तेव्हां मुखी याचिया स्वामिचें नाम जेव्हां

देहावसान - समयीं जरि पाप झालें

देहावसान - समयीं जरि नाम आलें

कांहींच शुद्धि नसली जरित्यासि पूर्वी

हें एक नामचिहि शुद्धि करील पूर्वी ॥२९॥

हा अंतकाळ नरकाप्रति जावयाच्या

काळीं अशाहि जरि गर्जलि नाम वाचा

मागील सर्वहि अहो अघ तैजळालें

धाकेंचि जे नरक सर्वहि ते पळाले ॥३०॥

नेऊं नका म्हणुनि जे म्हणतों तुम्हाला

तें नाम शेवटिल हेम फळलें द्विजाला

पूर्वीमुखीं रक्तमियें हरिनाम आलें

नैं नाम यासि अतिशुद्धिसि हेतु झालें ॥३१॥

हा आजि नाममहिमा श्रवणासि आला

सत्सुंग जो क्षणहि हाचि फळेल याला

टाकूनि संग भजनां हरिनाम घोषें

दुर्वासना जळति त्या अघवीजशेषें ॥३२॥

गंभीर भाव हदयांत धरुनि ऐसा

ते बोलिले अजित - किंकर बोल तैंसा

कीं प्राणयानसमयीं हरिनाम जेथें

नेऊं नका पुरुष तो नरकास तेथें ॥३३॥

येथें सूचविलें जनांस सकळां दूतीं हरिच्या असें

कीं देहीं हरिनाम अंतसमयीं येणार वाचे क्सें

जैसें पुत्रामिसे अजामिळमुखीं जे नाम होतें सदा

आलें तेंचि तदर्थ नाम हरिचें गर्जा मुखीं सर्वदा ॥३४॥

म्हणति ते हरिकिंकर यावरी तुम्हि म्हणाल न हा स्मरला हरी

सतन हा स्मरला निज - आत्मजा घडलि शुद्धि म्हणाल कसी द्विजा

तरि सुधा कसिही पडतां मुखीं हरि जरामरणासि करी सुरवी

धरुनि भाव मनांत असा बरा वदति वैष्णव त्या यमकिंकरा ॥३६॥

सांकेत जीं निजसुतादिनिमित्त नामें

संकेतरुप रचिलीं परि श्रुद्धि धामें

गोविंद नाम हरि माधव चक्रपाणी

कोण्या मिसें तरि वदो परि धन्य वाणी ॥३७॥

हरि हरि म्हणुनी हा नाचतो काय वेडा

अज अजित म्हणूनी गर्जतो काय रेडा

मुखिं हरि परिहासें ये अशाही प्रकारें

तरि जळतिल पापें पापियांचीं अपारें ॥३८॥

घडि घडी वदनीं हरि आळवी स्वहरिदासपणें जन - चाळवी

सकळ पापकुळें जळती तरी करुनि दंभ हरी म्हणतो जरी ॥३९॥

हरिकथा उदरार्थ जरी करी स्वगुण नाम करी भलत्यापरी

विकितसे उदरार्थ फुलें जरी शुभ सुगंध कधीं न चुके तरी ॥४०॥

हरि हरि हरि ऐसें बोलतां काय होतें

हरि हरि म्हणती हा नावडे शब्द गातें

हरि हरि म्हणतां तो होय निष्पाप पापी ॥४१॥

कोण्या मिसें - करुनि ये हरिनाम वाचे

जे पापराशि अवघे जळतील त्याचे

वाचे जरी सुतनिमित्तक नाम आलें

सांकेत्य कीर्तनमिसें अघ तें जळालें ॥४२॥

आतां म्हणाल हरिनाम समस्त पापें

नासूनि उद्धरिलही सहजप्रतापें

दुर्मृत्युनें मरति दुर्गाति सिद्ध याला

दुर्मृत्युचे नरक चूकति केविं बोला ॥४३॥

तरि न दुर्मरणें करि दुर्गती म्हणुनियां हरि - किंकर बोलती

जरि हरि - स्मरणें मरणें घडे भलतसे नरकी न तरी पडे ॥४४॥

पृथ्वीछंद - पडे अडरवले गळे करपदादि भंगे मरे

डसे भुजग अग्निही करुनि जीविता अंतरे

मरेल जरि मारितां तरिन त्या नरा यातना

स्मरेल मरतांच जो वियशाही जगत्पावना ॥४५॥

विवशनें न मुखा हरि ये तरी नर वदे हरिनाम सदा जरी

म्हणुनियां हरिनाम सदा मुखीं जपति गर्जति तेचि जगीं सुरवी ॥४६॥

प्रायश्र्विनें नाशती पापमात्रें वीजें त्यांची राहती तीं विचित्रें

तींही जाती आवडे नाम जेथें ऐसें मागें वर्णिलें स्पष्ट येथें ॥४७॥

पूर्वी येथें विशद कथिलें कीर्तनाच्या प्रतापा आतां सेवा हरिचरणिची जे स्तुती स्तोत्र - रुपा

तेथें नामें - करुनिच महा पातकी शुद्ध होती

ऐसें बोलों म्हणुनि हदयीं चिंतिलें विष्णुदूतीं ॥४८॥

जी कीर्तनी तारक विष्णुनामें सेवा मिसें तींच विशुद्धिधामें

आतां असें बोलति तेचि वाचे श्लोकद्वयें किंकर माधवाचे ॥४९॥

थोरां थोरें लाहना लाहभालीं प्रायश्र्वित्तें ब्राम्हणीं बोलियेलीं

पापें त्यानीं भस्म होती तयाषी राहें जें का चित्त जें पापरुपी ॥५०॥

मळ अनादि मनांत कुवासना हरि तिला हरिपाद - उपासना

भजनिंही हरिनामक मंत्र ते अजितनामक सर्वहि तंत्र तें ॥५१॥

स्तुति स्तोत्र सन्मात्र सूक्तें विचित्रें समस्तां तरीं विष्णुनामें पवित्रे

करीती तिहीं पुंडरीकाक्ष - पूजा हरी श्रीहरी त्यांचिया पापबीजा ॥५२॥

असिच धर्मसुताप्रति भारती वदलि जान्हवि - नंदन - भारती

पुससि तूं जरि धर्म युधिष्ठिग वदतसें मज जो गमला बरा ॥५३॥

हा श्लोक भीष्ममुखिंचा परमार्थ जेथें

भाषें करुनि वदिजेल तदर्थ येथें

स्तोत्रें स्तुती करुनि जे हरिभक्ति पूजा

हा एक धर्म दिसतो मज धर्मराजा ॥५४॥

या धर्मा सकळांत संमत मला तो धर्म हा आगळा

नाहीं त्यासम धर्म आणिक नृथा तो धर्म या वेगळा

जो स्तोत्रें दृढ भक्तिनें प्रतिदिनीं गोविंद हा पूजणें

ऐसें कृष्णसमीप भीष्ममुखिंचे श्रीभारती बोलणें ॥५५॥

नामप्रताप हरिचा सकळां पुराणीं

व्यासादि बोलति मुनीश्वर - वेद - वाणी

याकारणें परम नामचि जेथ तेथें

जें प्रस्तुतीं वदति हें हरिदूत येथें ॥५६॥

असें कीर्तनें आणि सेवादिरुपें महा शुद्धि देविष्णुनामप्रतापें

न जाणोनि उच्चारितांही हरी पातकें येथ वैषम्य नाहीं ॥५७॥

जसजसा अति सादर कीर्तनीं तसि तसी हरिभक्ति फुगे मनीं

परि पुरातन पातक तों नुरे भलतसे हरिनाम वदो पुरे ॥५८॥

वदति येथुनि पद्ययुगें रसें अजितकीर्तन हें उपमा मिसें

गमन ते करिती मग तेथुनी शुक वदेल अतःपर येथुनी ॥५९॥

नकळत कळतां घे उत्तमश्लोकनामें

सहज निजगुणें ही नासती पापधामें

नकळत कळतांही घालिती अग्नि जेथें

करि सहज - गुणें तो भस्म जाळूनि तेथें ॥६०॥

श्रीउत्तमश्लोक म्हणूनि त्याचें श्लोकांत या वर्णिति नाम साचें

सत्कीर्ति जे श्लोक तिला म्हणावें जेविष्णुनाभात्मक रुप भावें ॥६१॥

गोपाळ - बाळ म्हणतां व्रजबाललीळा

नामें सुचे हदविं केशवकीर्तिमाळा

गोपांगनारमण नाम विलास - लीला

वी हार सूचवि असें हदयी तयाला ॥६२॥

वदनिं नाम धनंजयसारथी उभय कृष्ण मनीं दिसती रथीं

शनसहस्त्र असीं हरिनामकें अजित - कीर्ति - सुधा - रसधामकें ॥६३॥

ऐसी जगत्पावन विष्णुनामें वैकुंटकीर्त्यात्मक पुण्यकामें

नेणोनि जाणोनि मुखासि आलीं पापें तयाचीं अवघीं जळालीं ॥६४॥

न अग्नि टाकी रचगुणासि जेव्हां टाकी कसें नाम गुणासि तेव्हां

जाळी स्वनामेंचि अघें अपारें ते उत्तमश्लोक अशा प्रकारें ॥६५॥

नामें हरीचीं हरिकीर्निरुपें न नाशनी हींजरि लोक - पापें

प्रसिद्धमात्रेंचि कसें म्हणावें तो उत्तमश्लोक म्हणोनि नावें ॥६६॥

विख्यात पापी बहुसाल होती वेदीं पुराणीं श्रवणासि येती

तसी नव्हे कीर्ति रमापतीची तारी जगा ख्याति असीच तीची ॥६७॥

हरी पाप तें नाम कोण्याप्रकारें स्मरे सादरें त्यासि सोख्यें अपारें

जसी नेणतां औषधी रोग नाशी पुढें सेवितां तेचि दे सोरेव्यराशी ॥६८॥

करि अहो गुण कांचन औषधी न करि कां हरिनाम - सुधा - निधी

धरुनि भाव असे मित बोलिले मग उगे हरिकिंकर राहिले ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP