कथाकल्पतरू - स्तबक १० - अध्याय १६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नम:॥

॥ ऐसा वधिला द्रौणीतात ॥ तैं दळ क्षुधातृषापीडित ॥ महाउव्दिग्न समस्त ॥ होतें जाहलें ॥१॥

दुर्योधन अमगराज ॥ शकुनी आणि मद्रराज ॥ शल्य बाल्हीक कृप भोज ॥ कलिंगादी ॥२॥

कृतवर्मा समसत्पक ॥ ससैन्येंसीं सकळिक ॥ दाहीदिशांप्रति देख ॥ पळते जाहले ॥३॥

जें होतेंसैन्य उरलें ॥ तें दुर्योधनासवें पळालें ॥ द्रोण पडतां तिये वेळे ॥ कोणी कोणा न सांभाळी॥४॥

देखोनि सैन्य आकांत ॥ परमत्र्कोधें द्रोणसुत ॥ येवोनियां असे बोलत ॥ दुर्योधनासी ॥५॥

अगा हें सैन्य समस्त ॥ कां पां असे पळत ॥ आणि तूं उव्दिग्न बहुत ॥ काइसेनी ॥६॥

कर्णादिक तरी समस्त॥ कांगा युध्द नाहीं करीत ॥ तंव दुर्योधन जाहला बहुत ॥ बाष्पपूर्णाक्ष ॥७॥

काहींचि न बोले तयासी ॥ तंव कृप ह्मणे परियेसीं ॥ आह्मी द्रोणमुरव्य पांचाळांसी ॥ झुंजिन्नलों निकरानें ॥८॥

कुरुसोमक पांडव ॥ एकत्र मिळाले होते सर्व ॥ तयां ब्रह्मास्त्रें अपाव ॥ केला आचार्ये ॥९॥

तेणें परदळक्षय जाहला ॥ परि धृष्टद्युम्नें शेवटीं वधिला ॥ इत्यादि वृत्तांत सांगितला ॥ कृपाचार्ये ॥१०॥

हें ऐकोनि सत्र्कोध ॥ पिटोनि ललाट हस्तपाद ॥ दांत खाविनि प्रसिध्द ॥ बोलता जाहला ॥११॥

ह्मणे परशुरामापासोनी ॥ द्रोण आला विद्या शिकोनी ॥ ते सकळां उपदेशोनी ॥ पूर्ण केले पार्थादिक ॥१२॥

जो वीर्यवंत दारुण ॥ कार्तवीर्याचिये समान ॥ बुध्दीच्या ठायीं परिपूर्ण ॥ बृहस्पती ऐसा ॥१३॥

धैर्याविषयीं गौरीवर ॥तेजें जेवि अंगार ॥ गांभीर्ये तरी समुद्र ॥ कृपाळु ममपिता ॥१४॥

ऐसा धर्मिष्ठ पवित्र भला। तो छद्में करोनि मारिला ॥ मग रुदन करुं लागला॥ बोलतबोलतां ॥१५॥

त्र्कोधें काळासमाम होउनी ॥ ह्मणे गांधारा ऐक वाणी माझेनि पितयें रणांगणीं ॥ टाकितां अस्त्रें ॥१६॥

धृष्टद्युम्नें केली शांती ॥ युध्दीं जयाजय असती ॥ तें दु:ख नाहीं माझे चित्तीं॥ पिता गेला पुण्यलोकीं ॥१७॥

परि तुह्मां देखतां रणीं ॥ पिता मारिला केश धरोनी ॥ हेंचि वाटे माझे मनीं ॥ थोर दु:ख ॥१८॥

तेणें धृषद्युम्नें चांडाळें ॥ मी नाहीं ऐसें पाहिलें ॥ धर्मेही अनृत बोलोनि वहिलें ॥ टाकविलीं शस्त्रास्त्रें ॥ १९॥

तरी त्याचें रक्त जाण ॥ मी भूमीवरी पाडीन ॥ सर्व उपायें करीन ॥ पांचाळवध ॥२०॥

लोक स्वरक्षणाकरणें ॥ पुत्र इच्छिती प्रयत्नें ॥ अहो मत्पिता दुष्टें तेणें ॥ मारिला कीं मज असतां ॥२१॥

माझा परात्र्कम अस्त्रबळ ॥ जीवितादि धिक् सकळ ॥ मजही मृत्यु तये वेळ ॥ कां आला नाहीं ॥२२॥

तरी सर्वाची शांति करोनी ॥ मीही शांति पावेन निर्वाणीं ॥ आपुली स्तुती स्ववचनीं ॥ करुंचि नये ॥२३॥

आजी माझे वीर्यहावे ॥ जरी त्रैलोक्य मिळेल आघवें ॥ तरीही जिंकाया शक्त नव्हे ॥मज द्रौणीसी ॥ २४॥

मजऐसा वीर अस्त्रज्ञ ॥ नाहीं येका अर्जुनावांचोन ॥ तरी एकदा नारायण ॥ विप्रवेषें आलाहोता ॥२५॥

तेव्हां नानोपचारीं त्यातें ॥ पूजिलें माझे बापें निरुतें ॥तेणें प्रसन्नत्वें द्रोणातें ॥ दीधलेंसे नारायणास्त्र ॥२६॥

तें प्रयुंजिलें असतां ॥ संहारी त्रैलोक्या समस्ता ॥ महातेजस्वी सोडितों आतां ॥अप्रतिहत ॥२७॥

ऐसें वचन आइकोनी ॥ सकळ्ही आनंदले मनीं ॥ दमामे निशाणें वाजवुनी ॥ जाहले मुरडते ॥२८॥

तैं महाशब्द वर्तला ॥ अश्र्वत्थामा तये वेळां ॥ प्रयोग करिता जाहला नारायणास्त्राचा ॥२९॥

तें प्रयुंजिलें अस्त्र ॥ तेणें वायु भूमि अंबर ॥ समुद्र नद्या पर्वत समग्र ॥ पावलीं क्षोमा ॥३०॥

पांडवां अपशकुन जाहले ॥ स्वर्गी देवगंधर्व भ्याले ॥ सर्वसैन्य त्रास पावलें ॥ उभयदळींचें ॥३१॥

सकळां हाहा:कार सुटले ॥ रथ टाकोनि अश्र्व पळाले ॥ यावरी अर्जुनें ह्मणितलें ॥ सकळ सैनिकां ॥३२॥

अहो हा कौरवांचा मेळा ॥ द्रोणीच्या बळें परतला ॥ हा द्रोणी जैं उपजला ॥ तैं सूर्यें केला महोत्साह ॥३३॥

सहस्त्रगाई अलंकारयुक्ता ॥ ब्राह्मणांतें जाहला देता ॥ यांचा गजर जाहला असतां ॥ उच्चै:श्रवा न हिंसे ॥३४॥

ह्मणोनि याचें नाम तेवेळे ॥ अश्र्वत्थामा ऐसें ठेविलें ॥ कां जे अश्र्वा येणें केलें ॥ स्तब्ध देखा ॥३५॥

तो पार्षतनाशाकारणें ॥ आतां येत आहे सत्राणें ॥ धर्मा ओखटें जाहलें करणें ॥ गुरु अधर्में मारविला ॥३६॥

आह्मी पापी आणिउ बुध्दिहीन ॥ वधिला गुरु वृध्दब्राह्मण ॥ याचिये परीसमरण ॥ तेंचि भलें ॥३७॥

हें पार्थवाक्य ऐकोनी ॥ महारथी नबोले कोणी ॥ मग भीम सत्र्कोध होउनी ॥ बोलता जाहला ॥३८॥

अगा अरण्यगत मुनी जैसे ॥ कां न्यस्तदंड राजा ऐसें ॥ पार्था बोलसी वाक्य तैंसें ॥ उदासपणें ॥३९॥

जोक्षतापासाव रक्षी ॥ तोचि क्षत्रिय तूं लक्षीं ॥ युध्दीं मेलिया क्षत्रिय मोक्षीं ॥ पावे निश्र्वयें ॥४०॥

तूं अज्ञपणें बोलतोसी ॥ कांण वनवास नाठविशी ॥ सभेमध्यें कांताकेशीं ॥ आकर्षिली आमुची ॥४१॥

तुवां प्रतिज्ञा केली पूर्वी ॥ कीं राज्य घेणें आहवीं ॥ कृष्ण साह्य असतां जीवीं ॥ भय धरिसी कासया ॥४२॥

मजसारिखा वंधुजन ॥ इये गदें करोनि जाण ॥ पृथ्वी पर्वत करील चूर्ण ॥ तुज भय कायसें ॥४३॥

ऐसाही जरी भीत अससी ॥ तरी तूं राहें मी झुंजेन यांसी ॥ यावरी बोले आवेशीं ॥ धृष्टद्युम्न ॥४४॥

ह्मणे ऐकें पार्थावचन ॥ द्रोण तरी हा ब्राह्मण ॥ याची षट्कर्मे जाण ॥ यजनयाजनादिकें ॥४५॥

आणि तेणें अज्ञानगती ॥ जेक्षुद्र अस्त्रें नेणती ॥ त्यावंरी टाकिलीं शांत्यर्थी ॥ ब्रह्मास्त्रादिकें ॥४६॥

सैन्यसंहार तेणें केला ॥ तो अधर्मी म्यां मारिला ॥ तरी पुरुषार्थ निंदिला॥ कां तुवां माझा ॥४७॥

पाहें मी अग्निपासोनी ॥ जन्मलों द्रोणवधालागोनी ॥ जो कर्तव्यार्थ जन्मोनी ॥ जाणेचि ना॥ ४८॥

तो काय विप्र कीं क्षत्री ॥ जेणें क्षुद्र मारिले ब्रह्मास्त्रीं ॥ तो कां पां गा समरीं ॥ वध्य नव्हे ॥४९॥

याचें आमुचें कुळत्र्कमागत॥ वैर आलेंसे चालत ॥ तरी खेद कराया यथार्थ ॥ कारण नाहीं तुह्मासी ॥५०॥

कीं तोद्रोण महानुभाव ॥ धनुर्वेदीं ज्यापासाव ॥ वीर प्रवीण जाहले सर्व ॥ तो मारिला पार्षदें ॥५२॥

मग ते वीर पांचाळातें ॥ काय जाहले बोलते ॥ तंव संजयो ह्मणे रायातें ॥ ऐकें सावधान ॥५३॥

पार्थे त्र्कोधें धिक्कारिले ॥ येर राजे उगे राहिले ॥ तें देखोनियां बोले ॥ सात्यकी तेथें ॥५४॥

अरे हा गुरुनिंदक निर्धारीं ऐशिया पापात्म्याची संसारीं ॥ उरोंनयेचि उरी ॥ निश्र्वयणें ॥५५॥

अरे तवजीविताचें कांहीं ॥ आह्मासि प्रयोजन नाहीं ॥ ऐसा नानापरी सही ॥ निंदिला पार्षद॥५६॥

यावरी धृष्टद्युम्न ह्मणत ॥ एतदर्थीच माझें जीवित ॥ परि त्वां केलें अनुचित ॥ पाहें विचारोनी॥ ५७॥

मारिला छिन्नवाहू भूरिश्रवा ॥ आह्मां दोष ठेविशी बरवा ॥ आतां जरी बोलसी स्वभावा ॥ तरी पाडीन शिर तुझें ॥५८॥

ऐसें सात्यकी ऐकोन ॥ ह्मणे बोलसी पुरुष वचन ॥ तरी गदेनें मारीन ॥ ह्मणोनि वेगें धांवला ॥५९॥

तंवदेवें भीम धाडिला॥ तेणें सात्यकी आवरिला ॥ आणि सहदेवो बोलिला ॥ धृष्टद्युन्मासी॥६०॥

आमुचे तुह्मी सखेजन ॥ तंव ह्मणे धृष्टद्युन्म ॥ आधीं या सात्यकीचा प्राण॥ घेईन मी ॥६१॥

मग कौरवांचा नि: पात॥ करीन मी आणि पार्थ ॥ दोहीं वाहुंसहित ॥ मारीन आतां ॥६२॥

मग श्रीकृष्ण धर्म मीनले ॥त्या दोघांसि समजाविलें ॥ इकडे द्रोणपुत्रें वाइलें ॥ प्रतिज्ञा करोनी ॥६३॥

तेणें नारायणास्त्रें भलें ॥ सर्व संहारा मांडिलें ॥ तंव धर्म सैनिकांसि बोले पळापळा समग्र ॥६४॥

परि श्रीकृष्ण ह्मणे सकळांतें ॥ उतरा वाहनांखालते ॥ शस्त्रें टाकोनि करा दंडवतें ॥ तेणें हें उपशमेला॥ ६५॥

नातरी मारील श्स्त्रधरातें ॥ तंव भीम ह्मणे मी वारीन यातें ॥ मग शस्त्रास्त्रें अमितें ॥ वर्षौ लागला ॥६६॥

आणि पार्थासि ह्मणे अवधारीं ॥ तूं धनुष्य त्यजिसी जरी ॥ तरी कलंक जौसा चंद्रीं ॥ तैसा तुज लागले ॥६७॥

मग नारायणास्त्रें करोन ॥ भीम जाहला आछिन्न ॥ सर्ववीरीं शस्त्रें टाकोन ॥ केला हाहा: कार ॥६८॥

भीमासि व्याकुळ देखिलें ॥ पार्थौ वारुणास्त्र प्रेरिलें ॥ परि तेंही वृथा गेलें ॥ नव्हे उपशम ॥६९॥

ह्मणोनि कृष्णपार्थ धांवले शस्त्रास्त्रजाळ प्रेरिलें ॥ भीमासि वेढोनि काढिलें ॥ घेतलीं शस्त्रें करींचीं ॥७०॥

रथाखालीं पाडोनी॥ भीमासि ह्मणे चत्र्कपाणे ॥ अरे याचिये शांतीलागोनी ॥ हाचि उपाय जाणावा॥७१॥

आणिक कांहीं न चाले ॥ ऐसे अवघे नि:शस्त्र जाहले ॥ भारता मग तें उपशमलें ॥ नारायणास्त्र ॥७२॥

दिशा निर्मळ जालिया ॥ पांडवसेना पळालिया ॥ कौरव ह्मणती अश्र्वत्थामया॥ मागुतें अस्त्र प्रयुंजीं ॥७३॥

मग तो जाहला बोलता ॥ कीं सअस्त्र मागु तें प्रयुंजितां ॥ मज सहितही समस्तां ॥ ग्रासील सत्य ॥७४॥

आणि याचा शांत्युपाय ॥ जाणत असे यादवराय ॥ गांधार ह्मणे हें न होय ॥ तरी प्रयुंजी आणिकें ॥७५॥

तूं आहेसि अस्त्रसागर ॥ मग त्र्कोधें द्रोणपुत्र ॥ सोडोनि पांची बाणा प्रखर ॥ विंधिला धृष्टद्युम्न ॥७६॥

येरें वीसबाणी निवारिलें ॥ चहूंनी चारी वारु भेदिले ॥ आणीक ही असंस्व्य प्रेरिले ॥ बाण देखा॥७७॥

महाघोर युध्द जाहलें ॥ तंव अश्र्वत्थामा गर्जोनि बोले ॥ अरे मातें जाणीतलें ॥ नाहीं तुवां ॥७८॥

आजि सर्वा करीन नि:पात ॥ तंव सात्यकी आलाविधित ॥ त्यासीही झुंजे अम्दुत॥ अश्र्वत्थामा ॥७९॥

मग भीमावरी धांवला ॥ घोर संग्राम भविन्नल ॥ भूपाळांसी मारिता जाहला॥ असंरव्यात्न ॥८०॥

युवराज बृहत्क्षेत्र पौरव ॥ चेदिराज सुदर्शज मालव ॥ वीर मारोनियां सर्व ॥ झुंजे भीमासीं ॥८१॥

परावभविला भीमसेन ॥ मग धनंजय येवोन ॥ महाघोर युध्द करोन ॥बोलता जाहला॥८२॥

अरे तव पौरुष ज्ञानशक्ती ॥ आणि कौरवांच्या ठायीं प्रीती ॥ आमुच्या ठायीं अप्रीती ॥ तें दाखवीं आजी ॥८३॥

तुझा अभिमान बहुत ॥ हा काळानळ पार्षत ॥ दूरी करील कीं पार्थ ॥ मीचि करीन ॥८४॥

इकडे धृतराष्ट् ह्मणे आइका ॥ गुरुपुत्र मानयोग्य सखा ॥ त्यातें पुरुषवाणीनें कां ॥ वदला पार्थ ॥८५॥

संजय ह्मणे ऐस वचन ॥ युवराजादि सुदर्शन ॥ पौरव बृहत्क्षेत्रादि करुन ॥ मारिले मालवादी ॥ ८६॥

धृष्टद्युम्नादि समस्त ॥ तेणें केले पराभूत ॥ ह्मणोनि पुरुषवाणी पार्थ ॥ बोलता जाहला ॥८७॥

असो अश्र्वत्थामा कोपला ॥ कृष्णार्जुनांवरी त्या वेळां ॥ अग्न्यस्त्र प्रेरिता जाहला॥ अभिमंत्रोनी ॥८८॥

तेणें ब्रह्मांड व्यापिलें ॥ पांडवदळ पळों लागलें ॥ मेलें मूर्छागत जाहले ॥ उव्दिग्न येक ॥८९॥

पर्वत गुहा नदी नगरें ॥ सर्व जाळिलीं तेणें अस्त्रें ॥ कौरवीं हर्षवाजंत्रें ॥ वजविलीं तैं ॥९०॥

यावरी सर्वास्त्रप्रतिघाता ॥ जें अस्त्र निर्मिलें होतें विधाता ॥ तें पार्थ जाहला प्रेरिता ॥ सर्वशामक नामें ॥९१॥

तेणें अग्न्य स्त्र निवारिलें ॥ मग पांडव सहर्ष जाहले ॥ इकडे अश्र्वत्थामा रथाखालें ॥ उतरला देखा ॥९२॥

महादु:खिया जाहला ॥ रणांतूनि बाहेर गेला ॥ तंव व्यासपुढें देखिला ॥ तेजोराशी ॥९३॥

त्यासी नमस्कारुनि बोले ॥ स्वामी म्यां सर्वथा स्वबळें ॥ अजेय होतें अर्जिलें ॥ जाहलें निर्फळ ॥९४॥

पाहें शस्त्रास्त्रें टाकिलीं ॥ परि तीं सर्व वृथा गेलीं ॥ आतां मरिजे तरी भली ॥ गोष्टी होय ॥९५॥

तरी कृष्णार्जुनीं वहिला ॥ सांगें काय प्रतिकार केला ॥ तंव व्यासदेव बोलिला ॥ ऐकें सावधान ॥९६॥

हा आदिपुरुष श्रीकृष्ण ॥ ऊर्ध्वबाहू वायु भक्षून ॥ येणें तप केलें पूर्वी दातु ॥ साठीसहस्त्र वरुषें ॥९७॥

तेणें तपें भूगोळ व्यापला ॥मग हा ब्रह्मभूत जाहला ॥ त्यानंतरें येणें देखिला ॥ महादेव ॥९८॥

जो विश्र्वेश्र्वर स्थाणु ॥ लहानाहूनि लहानुन ॥ मोठयापरीस मोठा ईशानु ॥ रुद्र धूर्जटी पिनाकी ॥९९॥

वज्री पतश्र्वधी शूली ॥गदी जटी चंद्रमौळी ॥ व्याघ्राजिनकटी मेखळी ॥ परिघदंडयुक्त ॥१००॥

अंगदी यज्ञोपवीत ॥ सर्वदेव समन्वित ॥ अचिंत्य महिमा पार्वतीसहित ॥ सगुणनिर्गुण ॥१॥

तो नानापरि स्तविला ॥ महेश संतोष पावला॥ अनेक वरदेता जाहला ॥ ऐसा हा नारायण ॥२॥

आणि नर तो जाण पार्थ ॥ येणें ही तप केलें बहुत ॥ मग भूभारउत्तरणार्थ ॥ अवतरले दोनी ॥३॥

हा महादेव आदिपुरुष ॥ पूजिताती देवविशेष ॥ चतुर्दशी अष्टमीस ॥ करावें लिंगपूजन ॥४॥

शिवाचीं पार्थिवलिगें करितांपाविजे सर्व मनोरथां ॥ पूजनप्रकार विस्तरत : ॥ असे लिंगपुराणीं ॥५॥

अगा पार्थिवलिंगमहिमा॥ नवर्णवे ब्रह्मादिकां आह्मा ॥ आणि सत्व रज तमा याचे अंश देवत्रय ॥६॥

ह्मणोनि शिवा पार्था केरावा॥ तुवां नमस्कारचि करावा ॥ व्यासें दीधलासे वरवा॥ ऐसा उपदेश ॥७॥

मग रुद्र आणि कृष्णार्जुन ॥ यांसी करोनियां नमन ॥ परावृतजाहलाद्रोण्नंदन ॥ ऐसी शतरुद्री ॥८॥

संजयह्मणे धृतराष्ट्रासी ॥ द्रोण झुंजोनि पांचव्या दिवशीं ॥ स्वयें गेला ब्रह्मलोकासी ॥ ध्यानयोगें ॥९॥

इकडे पार्थ तये वेळां ॥ व्यासां येतां देखता जाहला ॥ नमस्कारोनि पुसता जाहला ॥ अंतर्गत ॥११०॥

अहो मजसी युध्द करितां ॥ कोणी महापुरुष भूनस्पर्षिता ॥ दीसतो शूळ टाकिता ॥ रणांगणीं पुढें ॥११॥

तोचिपुढें सैन्यें जिंकितो ॥ मी तयामागें जात असतों ॥ तंव व्यास ह्मणती अगा तो ॥ श्रीशंकर कृपाळ ॥१२॥

तुझिये तपसामग्री करितां ॥ पुढें साह्यार्थी जात असतां ॥ तरी ध्यानभजन सर्वथा ॥ करीं त्याचें ॥१३॥

तेणें उपदिष्ट परियेसीं ॥ पूजितां सर्व कामना पावसी ॥ पार्थिवपूजन महिमेसी ॥ नवर्णवे एके मुखें ॥१४॥

महादेव महात्मारुद्र ॥ ईशान जटिल भुवनेश्र्वर ॥ पशुपती शिव त्र्यक्ष हर ॥ महाबाहो ॥१५॥

शिखी चीरवासा देवनाथ ॥ स्थाणु जगत्प्रधान अजित ॥ जगत्पती जगब्दीजवंत ॥ जगन्दती ॥१६॥

विश्र्वस्त्रष्टा विश्र्वात्मा ॥ विश्र्वसृज शुध्दांतरात्मा ॥ विश्र्वायोनी विश्र्व्कर्मा विश्र्वमूर्ती ॥१७॥

यशस्वी स्वयंभु विश्र्वेश ॥ भूतभवोम्दव भृतेश ॥ भीम चंद्रशेखर महेश ॥ ऐसीं नानानामें ॥१८॥

इहींयुक्त श्रीशंकर ॥ भजत राहें निरंतर ॥ आणीकही भक्ती अपार ॥ करीं शंभूची ॥१९॥

अवज्ञेस्तव दक्षयज्ञ ॥ विध्वंसिला न लागतां क्षण ॥ तेणें उपद्रवले जन ॥ तिहींलोकींचे ॥१२०॥

मग देव शरण येउनी ॥ दीधला यज्ञभाग शूळपाणी ॥ आणिक राक्षसांचीं तीनी ॥ पुरें जेणें नाशिलीं ॥२१॥

आयस रौप्य सुवर्णमयें ॥ स्वर्गी नगरें भ्रमती तियें ॥ त्यांचे तारकाक्ष मकराक्ष पाहें॥ विद्युन्माली अधिपती ॥२२॥

त्यां ही जिंकिले सुरगण ॥ ह्मणोनि देव गेले शिवा शरण ॥ ह्मणती ब्रह्मवरद हे तिघेजण ॥ मारावे जी शंकरा ॥२३॥

मग महेशें गंधमादन ॥ याचें धनु आणि पृथ्वी स्यंदन ॥ ऐसें करोनि आपण ॥ नागेंद्र अक्ष ॥२४॥

चत्र्कें चंद्रार्क ब्रह्मा सारथी ॥ विष्णु बाणें केली शांती ॥ मग गंधर्वी केली स्तुती ॥ महिम्नस्तोत्रें ॥२५॥

व्यास ह्मणती गा अर्जुना ॥ हे शतरुद्रीय जाणा ॥ सर्वत्र पातकनाशन ॥ पूर्णकामद ॥२६॥

हे तूं अंखड मनीं धरीं ॥ आणि लिंगपूजा भावें करीं ॥ ऐसें बोलोनियां झडकरी ॥ गेले कृष्णद्वैपायन ॥२७॥

संजय ह्मणे धृतराष्ट्रासी ॥ पार्थिवपूजन करितां नेमेंसीं ॥ साम्राज्यपद प्रात्प तयासी ॥ होय शंकरप्रसादें ॥२८॥

वैशांपायन ह्मणती भारता ॥ हे द्रोणपर्वीची समूळ कथा ॥ तुज कथिली संक्षेपता ॥ व्यास प्रसादें ॥२९॥

हें सातवे पर्व होतां संपूर्ण ॥ मृत उठिले सात ब्राह्मण ॥ आणि ब्रह्महत्या सात दारुण ॥ नाश पावल्या रायाच्या ॥१३०॥

वस्त्रही उजळें सात हात ॥ तैसेंचि कुष्ठ हदयापरियंत ॥ जावोनि राव जाहला पुनीत ॥ तेय वेळीं ॥३१॥

श्रीहरीचे वर्णितां गुण ॥ महादोषां होय दहन ॥ तेथें ब्रह्महत्येचें दूषण ॥उरे केवीं ॥३२॥

साधु समागम थोर महिमान ॥ ब्रह्महत्या जाहल्या निरसन ॥ परि खलसंगतीस्तव जाण ॥ भीष्मद्रोण नाडले ॥३३॥

ह्मणोनि कीजे सत्समागम ॥ तेणें पाविजे श्रेय उत्तम ॥ अंतीं लाहिजे परंधाम ॥ वैकुंठींचें ॥३४॥

संगतीचा थोर महिमा ॥ वर्णू न शकती हरिहरब्रह्मा ॥ भेटी होन आत्मारामा॥ संसारदु :ख नि रसोनी ॥३५॥

आतां असो हें युक्तिकथन ॥ दशमस्तबक जाहला संपूर्ण ॥ पुढें एकादशाचें अनुसंधान ॥ कर्णपर्व आयकिजे ॥३६॥

संरव्या वाढेल कल्पतर्यचे ॥ ह्मणोनि कथिलें सारसारची ॥ कीं श्रोतयां उपजावीरुचे ॥ कथामृतप्राशनें ॥३७॥

मूळ संस्कृत ऋषिप्रणीत ॥ त्याचें कथिलें हें प्राकृत ॥ अज्ञानजनां व्हावया प्रात्प ॥ स्वल्पायासें करोनी ॥३८॥

प्रद्युम्नाचे ज्येष्ठ कुमरें ॥ बहिरामश्याह नृपवरें ॥ आज्ञा केली ह्मणोनि आधारें ॥ रचिला ग्रंथ ॥३९॥

त्या रायाचे सभेआंत ॥ चतु:शास्त्रवे ते पंडित ॥ पुराणचर्चा अखंडित ॥असे जयांसी ॥१४०॥

म्यां तयांचे आज्ञाधारे ॥ग्रंथ रचिला मतांतरें ॥ हें करविले सर्वेश्र्वरें ॥ मज रंकाक्रवीं ॥४१॥

माझी केतुलीसी मती ॥ कीं साभिमानें बोलावें ग्रंथीं ॥ परि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ उपजे ज्ञानवैराग्य ॥४२॥

अनंत शास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितेरं ॥ त्या सकळांचे आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणीनसे ॥४३॥

कृष्णयाज्ञवल्कीयें मार्ग दाविला ॥ तोचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तबकापासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरु ॥४४॥

कविमधु करें कृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ दशमस्तबक संपविला ॥ ह्मणेर मधुक्रकवी ॥४५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ दशमस्त्बक मनोहरु ॥ द्रोणपर्वसमाप्तिप्रकारु ॥ षोडशाध्यायीं कथियेला ॥१४६॥

स्तबकओंव्यासंख्या ॥१९५४॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP