एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् ।

युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥१५॥

रज सत्व करुनि गूढ । जैं तमोगुण होय रुढ ।

तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥२८॥

विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे ।

कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥२९॥

स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें ।

संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥२३०॥

धुईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणें ।

तेवीं विवेकाचें जिणें। तमोगुणें ग्रासिजे ॥३१॥

सत्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक ।

दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥३२॥

करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण ।

तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरुप पूर्ण तें ऐक ॥३३॥

तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ ।

लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥३४॥

कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण ।

या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥३५॥

जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ ।

कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥३६॥

समस्ताही इंद्रियवृत्ती । अनुद्यमें स्तब्धगती ।

निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥३७॥

मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख ।

मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मी ॥३८॥

ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक ।

निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥३९॥

पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें होय पुरुषलक्षण ।

वाढल्या सत्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥२४०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP