एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे ।

चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥१२॥

बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया ।

तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥९२॥

माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां ।

यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥९३॥

सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं ।

तेवीं मायनियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥९४॥

माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण ।

मजपाशीं माया जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥९५॥;

मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण ।

त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥९६॥

जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन ।

मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥९७॥

जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक ।

आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥९८॥

यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो ।

त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥९९॥

गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण ।

जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥२००॥

ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध ।

येथ कर्मी उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥१॥

कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं ।

तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥२॥;

येचि अर्थीचें निरुपण । सांगीतलें मिश्रलक्षण ।

आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥३॥

जो गुण वाढे अतिउन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती ।

ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP