एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहश्रमे ।

स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥८॥

पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम ।

तेथ नित्यनैंमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥५१॥

गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान ।

गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥

नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म ।

हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥५३॥

गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण ।

गुणीं गुणवंत करुन । कर्माचरण करविती ॥५४॥

न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे ।

तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मी ॥५५॥

जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण ।

तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥५६॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP