एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अन्ने प्रलीयते मर्त्यमन्नं धानासु लीयते ।

धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥२२॥

म्यां पाहिल्या प्रळयदृष्टीं । पडोनि ठाके अनावृष्टी ।

तेणें अन्न क्षीण होय सृष्टीं । अन्नापाठीं शरीर ॥२२॥

येथ असे ’अन्नमय प्राण’ । हें वचन प्रत्यक्ष प्रमाण ।

ते अन्न होतांचि क्षीण । अन्नासवें प्राण प्राण्यांचे जाती ॥२३॥

अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । बीजमात्र राहे आपण ।

तेंही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥२४॥

तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र होय रविमंडळा ।

तो पीठ करी पर्वतशिळा । तेही तृणसाळा उरों नेदी ॥२५॥

तेणें तापलें सप्तपाताळ । पोळलें शेषाचें कपाळ ।

तो वमी विषाग्निकल्लोळ । महाज्वाळ धडधडीत ॥२६॥

तो संकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ ।

ब्रह्मांड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥२७॥

तेव्हां पृथ्वीचें पृथ्वीपण सरे । तें गंधमात्रस्वरुपें उरे ।

तोही गंधू जळीं विरे । तेंचि शार्डगधरें सांगिजे ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP