मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक ५६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


तस्मादुद्धव मा भुंक्ष्व विषयानसदिन्द्रियैः ।

आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम् ॥५६॥

विषयांची जे आसक्ती । ते बाधक परमार्थप्राप्ती ।

विषय सांडीं सांडीं निश्चितीं । परतोनि हातीं नातळें ॥५१॥

आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्यें विषयभोग ।

तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागीं त्याग करावा ॥५२॥

विखें रांधिलें परमान्न । तें ग्रासमात्र हरी प्राण ।

विष एकदां मारक जाण । विषय पुनःपुनः मारक ॥५३॥

म्हणसी प्रारब्धें भोग येती । ते त्यागिले केवीं जाती ।

विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिती घडे केवीं ॥५४॥

प्रारब्धें विषयभोग येती । ते साधका दुःखरुप होती ।

वणवां मृगें आहाळती । तैशी स्थिती भोगणें ॥५५॥

व्याघ्रमुखीं सांपडे गाये । तैशा भोगी चरफडीत जाये ।

ऐसेनि अनुतापें पाहें । वैराग्य होये अनिवार ॥५६॥

वैराग्य जाहलिया धडफुडें । सद्गुरुकृपा हाता चढे ।

तेणें गुरुक्रुपाउजियेडें । संसार उडे द्वंद्वेंसीं ॥५७॥

झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म ।

तेथ जन्ममरण कैंचें कर्म । भवभ्रम असेना ॥५८॥

तेथ वाती लावूनि पाहतां । संसार दिसेना मागुता ।

जेवीं निभ्रमें पाहों जातां । न लगे हाता रज्जुसर्प ॥५९॥

भवंडीचेनि वेगवशें । भिंगोरी नीट उभी दिसे ।

तेवीं भ्रमाचेनि आवेशें । संसार भासे सत्यत्वें ॥६६०॥

केवळ जो निबिड भ्रम । संसार हें त्याचें नाम ।

येर्‍हवीं निखिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ॥६१॥;

ऐसें जरी झालें ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावें गा जाण ।

जेवीं कुलाल भांडें ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ॥६२॥

वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडितां न वचे सार्द्रपण ।

तेवीं होतांचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ॥६३॥

त्या प्रारब्धाचिये गती । विषयभोग जरी येती ।

तेथ उपावो न करावा निवृत्ती । निजशांती साहावें ॥६४॥

विषयभोग आलियाही जाण । निजशांति धरोनि संपूर्ण ।

सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥६५॥

हाता आलिया निजशांती । संसार बापुडा तो किती ।

तेचि शांतीची स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥६६॥

जें निजशांतीचें कल्याण । जेणें जीव पावे समाधान ।

तें अतिगोड निरुपण । दों श्र्लोकीं श्रीकृष्ण सांगत ॥६७॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP