मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय बाविसावा|
श्लोक १७ वा

एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सर्गादौ प्रकृतिर्ह्यस्य कार्यकारणरुपिणी ।

सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते, पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥१७॥

प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणांचिया गुणलीळा ।

सात कारणें, कार्यें सोळा । ऐक वेगळा विभाग ॥१७०॥

महदहंकारमहाभूतें । सातही ’कारणें’ निश्चितें ।

अकरा इंद्रियें विषययुक्तें । जाणावीं येथें ’कार्यें’ सोळा ॥७१॥

यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हातीं ।

कार्यकारणांचिया युक्तीं । करी उत्पत्ती सृष्टीची ॥७२॥

सृजिलिये सृष्टीसी जाण । सत्त्वगुणें करी पालन ।

तमोगुण निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥७३॥

पुरुषें न करितां ’ईक्षण’ । उत्पत्ति स्थिति निर्दळण ।

प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेंही उपलक्षण अवधारीं ॥७४॥

हात पाय न लावितां जाण । केवळ कूर्मीचें अवलोकन ।

करी पिलियांचें पालन । तैसें ईक्षण पुरुषाचें ॥७५॥

कां सूर्याचिया निजकिरणीं । जेवीं अग्नीतें स्त्रवे मणी ।

तेणें स्वधर्मकर्में ब्राह्मणीं । कीजे यज्ञाचरणीं महायागु ॥७६॥

तैसें हें जाण चिन्ह । येणें होय कार्य कारण ।

चाले स्वधर्मआचरण । यापरी जाण उद्धवा ॥७७॥

ऐसें चालतां प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार ।

तेणें वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥७८॥

तेवीं पुरुषाचें ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण ।

उत्पत्तिस्थिति-निर्दळण । करावया पूर्ण सामर्थ्य पावे ॥७९॥

छायामंडपींचें विचित्र सैन्य । दिसावया दीपचि करण ।

तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुषाचें ॥१८०॥

जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण ।

प्रकृति प्रकाशी पुरुष जाण । तो महाकारण या हेतु ॥८१॥

प्रकृति व्यक्त, पुरुष अव्यक्त । हे विकारी, तो विकाररहित ।

हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजांगें ॥८२॥

प्रकृति स्वभावें चंचळ । पुरुष अव्ययत्वें अचळ ।

प्रकृति बद्धत्वें शबळ । पुरुष केवळ बंधातीत ॥८३॥

प्रकृति स्वभावें सदा शून्य । पुरुष केवळ चैतन्यघन ।

प्रकृतीस होय अवसान । पुरुष तो जाण अनंत ॥८४॥

प्रकृति केवळ निरानंद । यालागीं तेथ विषयच्छंद ।

पुरुष पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥८५॥

प्रकृतिपुरुषांचें वेगळेंपण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण ।

हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीसी ॥८६॥

तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद ।

त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सांगेन ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP