मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सोळावा|

एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् ।

किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥२९॥

षड्‍गुणभाग्यें भाग्यवंत । पूर्णांशे जो भगवंत ।

वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥२६॥

भागवतांमाजी अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण ।

ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥२७॥

उद्धवें करितां नमन । कृष्णें दिधले आलिंगन ।

आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥२८॥

उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण ।

'मी तो तूं' जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥२९॥

दोघांचे मोडलें दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण ।

कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥२३०॥

तेणें उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाघला आपणांत ।

मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥३१॥

वानरांमाजी हनुमंत । तो मी म्हणे कृष्णनाथ ।

तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥३२॥

जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर ।

न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥३३॥

ऐसें विचारूनि चित्तां । सवेंचि नमिलें कृष्णनाथा ।

तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥३४॥

तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर ।

सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP