TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १०६ ते ११०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन १०६ ते ११०

भजन - १०६

कठिण मन का हरी ! केले, नसे का तुज दया थोडी ?

तुझ्याविण अखिल या जगती, कोण आम्हासि रे ! जोडी ? ॥धृ॥

अशाश्वत दृश्य हे सगळे, कधी दिसते, कधी नसते ।

राहते नी किती जाते, साथ हा घाट मम सोडी ॥१॥

स्वार्थि या लोकिचे गाणे, प्रेमही स्वार्थिचे जाणे ।

कळेना कोण हे जीणे ? कुठे वाढे, कुठे मोडी ? ॥२॥

अनुभवे पाहता जगती, न काही सत्यसे दिसते ।

प्रभू ! तूची खरा असशी, म्हणुनि ही गर्जना फोडी ॥३॥

पदरि घे दास-तुकड्याला, उरु न दे देह-भावाला ।

रंग तव लाव जीवाला, देह तुजवरुनि कुरवंडी ॥४॥

भजन - १०७

टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी ।

उगिच पापे करुनिया ही, जिवाला कष्टमय करिशी ॥धृ॥

किती राजे, महाराजे, होउनी जाति नी येती ।

न कोणी साथ दे काही, तूच का या भ्रमी मरशी ? ॥१॥

कांचनाची पुरी शोभे, रत्नमय रावणाची ती ।

ढसळता रीत कर्माची, न उरली कौडि ही सरशी ॥२॥

अती लोभे, अती पापे, कंस हा मातला होता ।

प्रभु धावोनिया त्याची, राख केली गृहासरसी ॥३॥

अरे ! जे शोभते तेची, करावे जीव-उध्दारा ।

सांगतो दास तुकड्या हा, प्रभू स्मर सत्य तू सरशी ॥४॥

भजन - १०८

भुलु नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी ।

लूटती भोंदु अपणाते, दावुनी थोरवी भारी ॥धृ॥

संत जरि पुत्र हे देती, न मरते लोक पृथ्वीचे ।

निकामी स्वार्थि जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ॥१॥

कावरे लोभि जे असती, भ्रष्ट होती तयाच्याने ।

न सुचते ज्ञान हे त्यांना, मिरविती भोंदुची थोरी ॥२॥

ठेवुनी साक्ष 'ज्ञानोबा', म्हणे ती भीत चालविली ।

कळेना वर्म संतांचे, वाहती मार्गि काटेरी ॥३॥

चमत्कारेच संतांची, परिक्षा होत जरि असती ।

गारुडी काय ना करिती ? लावती बाग आंबेरी ॥४॥

संत तोची जगी जाणा, जयाचे विषय हरि झाले ।

म्हणे तुकड्या निजज्ञाने, बोधुनिया जना तारी ॥५॥

भजन - १०९

अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली ।

लागला ज्वाळ हृदयाला, वेळही कायशी उरली ? ॥धृ॥

गमे हा मार्ग हिंदुंचा, बिघडला लोपता झाला ।

पाहती तोंड दुसर्‍याचे, सोडुनी नीति ही अपुली ॥१॥

कुणी त्या चर्चला जाती, कुणी पुजताती पीराला ।

आपुली सोडुनी नीती, हिंदुची भ्रष्ट मति झाली ॥२॥

न यांना धर्मही कळतो, समाजी देह ना वळतो ।

न ठावे राजकारण ते, गती अधरापरी झाली ॥३॥

कारणही व्हावया ऎसे, एकची वाटते मजला ।

पारतंत्र्यी भरत-भू ही, आपुली माउली पडली ॥४॥

करा हो एकमेकांना. संघटित प्रेम लावूनी ।

जागवा राष्ट्र-भक्ती ही, म्हणे तुकड्या त्यजा भूली ॥५॥

भजन - ११०

सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली ।

बुध्दिच्या पूर्ण भावाची, विलिनता रामरुपि झाली ॥धृ॥

न अपुली वाटली काया, न जनता जिवपणे स्फुरली ।

रामराय विश्वची सारे कि, प्रभु-माया खरी नटली ॥१॥

निसर्गे बागही फुलली, निसर्गानेच सुखि झाली ॥२॥

न काही कामना उरली, धर्मे-कर्मे उठाठेवी ।

म्हणे तुकड्या गार जैसी, जली दिसली तशी मुरली ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-10-02T22:28:57.1930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जठर

  • न. पोट ; उदर . [ सं . ] जठराग्नि , जठरानल - पु . पोतांतील अग्नि , पचनशक्ति . 
  • ना. उदर , कुक्ष , कूस , पिचंड ; 
  • n  The stomach. 
  • ना. तुंद , दोंद , ढेरपोट , ढेरी , पोट , लंबोदर . 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.