मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अकरावा|
श्लोक ४९ वा

एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


अथैतत्परमं गुह्यं श्रृण्वतो यदुनन्दन ।

सुगोप्यमपि वक्ष्यामि त्वं मे भृत्यः सुहृत्सखा ॥४९॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां

एकादशस्कन्धे भगवदुद्धवसंवादे एकादशोऽध्यायः ॥११॥

ऐकें यदुवंशकुळटिळका । तूं स्वगोत्र भृत्य सुहृद सखा ।

तुज न सांगिजे हा आवांका । सर्वथा देखा न धरवे ॥६५॥

मज गुप्ताचें गुप्त सार । साराचें गुप्त भांडार ।

ते भांडारींचें निजसार । तुज मी साचार सांगेन ॥६६॥

ऐसें गुह्याचें गुह्य निश्चितीं । नाहीं सांगीतलें कोणाप्रती ।

तूं सखा जिवलग सांगाती । अनन्य प्रीती मजलागीं ॥६७॥

केवळ कोरडी नव्हे प्रीती । तैसीच माझी अनन्यभक्ती ।

भक्तीसारिखी विरक्ती । अवंचकस्थिती तुजपाशीं ॥६८॥

यादववंषीं पाहतां देख । मजसमान तूंचि एक ।

समान सगोत्र आणि सेवक । हें अलोकिक उद्धवा ॥६९॥

नव्हेसी कार्यार्थी सेवक । सर्वभावें विश्वासुक ।

किती वाणूं गुण एकएक । परम हरिख मज झाला ॥१५७०॥

यालागीं गुह्य तेंही तुझ्या ठायीं । वंचावया मज धीरु नाहीं ।

हृदय आलिंगलें हृदयीं । चिदानंदू पाहीं तुष्टला ॥७१॥

मग म्हणे सावधान । सादर आइक माझें वचन ।

तुज फावल्या माझें गुह्य ज्ञान । वंश‍उद्धरण तुझेनी ॥७२॥

जे वंशी होय ब्रह्मज्ञानी । तो वंष पवित्र त्याचेनी ।

हे सत्य जाण माझी वाणी । विकल्प मनीं न धरावा ॥७३॥

म्हणसी स्वयें तूं ब्रह्म पूर्ण । वंशीं अवतरलासी नारायण ।

तेणें वंश उद्धरला जाण । माझें ज्ञान तें किती ॥७४॥

तरी नाम रूप जाति गोत । या अवघ्यांसी मी अलिप्त ।

सकळ कुळेंसी मी कुळवंत । गोत समस्त जग माझें ॥७५॥

ऐसें म्हणोनि निजगुह्यसार । तुज मी सांगेन साचार ।

तेणें होईल जगाचा उद्धार । ऐसें शारङ्गधर बोलिला ॥७६॥

तें ऐकावया गुह्य ज्ञान । उद्धवें मनाचे उघडिले कान ।

सावध पाहतां हरीचें वदन । नयनीं नयन विगुंतले ॥७७॥

यापरी उद्धव सावधान । त्यासी कृष्ण सांगेल गुह्य ज्ञान ।

पुढीले अध्यायीं अतिगहन । रसाळ निरूपण हरीचें ॥७८॥

एका विनवी जनार्दन । संतीं मज द्यावें अवधान ।

श्रोतीं व्हावें सावधान । मस्तकीं चरण वंदिले ॥७९॥

तुमचेनि पदप्रसादें । श्रीभागवतींचीं श्र्लोकपदें ।

वाखाणीन अर्थावबोधें । संत स्वानंदें तुष्टलिया ॥१५८०॥

यालागीं एका शरण जनार्दनीं । तंव जनार्दनचि एकपणीं ।

जेवीं कां सागरींचें पाणी । तरंगपणीं विराजे ॥१५८१॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां

श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादशपूजाविधानयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥११॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४९॥ ओव्या १५८१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP