मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ३४ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


राजोवाच-नारायणाभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः ।

निष्ठामर्हथ नो वक्तुं यूयंहि ब्रह्मवित्तमाः ॥३४॥

सर्वां भूतीं भगवद्भावो । हा मुख्य मायातरणोपावो ॥

आ‍इकोनि सुखावला रावो । तेणें आनंदें पहा हो परब्रह्म पुसे ॥६२३॥

करितां नारायणाची भक्ति । उत्तम भक्त माया तरती ।

ते नारायणाची निजस्थिति । साक्षेपें नृपति पुसतु ॥६२४॥

ब्रह्म-परमात्मा-नाराय । वस्तूसीच म्हणणें जाण ।

ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण । राजा आपण पुसतु ॥६२५॥

सकळांमाजीं अधिष्ठान । सबाह्य ज्याचेनि परिपूर्ण ।

त्या स्वरूपातें नारायण । स्वयें वेदज्ञ बोलती ॥६२६॥

तुम्हां‍ऐसे ज्ञाननिधि । भाग्यें जोडलेति त्रिशुद्धी ।

तुमच्या वचनामृतबोधीं । अहंबुद्धि उपजेना ॥६२७॥

तुमचिया वचनोक्तीं । वोसंडली स्वानंदस्फूर्ति ।

लांचावली चित्तवृत्ति । श्रवणें तृप्ति कदा न मनीं ॥६२८॥

ऐकोनियां रायाचा श्रेष्ठ प्रश्न । प्रबुद्धाधाकुटा पिप्पलायन ।

तो बोलावया आपण । स्वानंदें पूर्ण सरसावला ॥६२९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP