मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक २७ वा

एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरद्भुतकर्मणः ।

जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिलचेष्टितम् ॥२७॥

मुख्य भक्तीचें कारण । हरीचे जन्म-कर्म-गुण ।

पूर्ण श्रद्धा करावे श्रवण । हरिकीर्तन स्वानंदें ॥५४४॥

हरिकीर्तनाचिया जोडी । सकळ साधनें केलीं बापुडीं ।

अद्भुत कर्में हरीचीं गाढीं । गातां अति‍आवडी उल्हासे ॥५४५॥

शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन धरिला करीं ।

निद्रा न मोडितां सकळ नगरी । द्वारकेमाझारीं आणिली मथुरा ॥५४६॥

निमाला गुरुपुत्र दे आणूनि । मुखें प्राशिला दावाग्नि ।

गत गर्भ आला घे‍ऊनि । निजजननीतोषार्थ ॥५४७॥

अजन्म्या जन्में नेणों किती । अकर्म्याचीं कर्में गाती ।

अगुणाचे गुण वर्णिती । तेणें श्रीपति सुखावे ॥५४८॥

जो सुखैकमूर्ति निजस्वभावें । तोही जन्म-कर्म-गुणवैभवें ।

गातां कीर्तनीं अतिसुखावे । स्वानंदगौरवें डुल्लतु ॥५४९॥

ऐशी कीर्तनीं गातां कीर्ति । निर्मळ होय चित्तवृत्ति ।

तेथें ठसावे ध्यानस्थिति । ऐक ते नृपती सांगेन ॥५५०॥

मुकुट कुंडलें मेखळा । कांसे कसिला सोनसळा ।

आपाद रुळे वनमाळा । घनसांवळा घवघवित ॥५५१॥

ऐशी मूर्ती सुरेख सगुण । कां निरसून रूप नाम गुण ।

ध्यानीं ठसावे निजनिर्गुण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥५५२॥

ऐसें ठसावतां ध्यान । भक्तांची सबाह्य क्रिया पूर्ण ।

ते ते होय कृष्णार्पण । स्त्रीपुत्रादि जाण सर्वस्वें ॥५५३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP