मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तिसरा|
श्लोक ६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कर्माणि कर्मभिः कुर्वन् सनिमित्तानि देहभृत् ।

तत्तत्कर्मफलं गृह्णन् भ्रमतीह सुखेतरम् ॥६॥

मनीं धरोनि विषयकाम । कर्मेंद्रियीं करितां कर्म ।

तेथें निपजती धर्माधर्म । बाधक परम पुरुषातें ॥३६॥

कल्पिला फळभोग घडे । त्यासारिखें देह धरणें पडे ।

देहें देहाची खाणी उघडे । मरणही वाढे तैसेंचि ॥३७॥

फळाशा कर्म अतिदारुण । अमरां आणी अमित मरण ।

अजन्म्या अंगीं जन्म पूर्ण । पुनः पुनः जाण आदळती ॥३८॥

एवं स्वर्ग आणि संसारा । जन्ममरणांच्या येरझारा ।

नाना योनि अपारा । निजकर्मद्वारा स्वयें भोगी ॥३९॥

डोळे बांधुनि जुंपिला घाणा । तेलियाचा ढोरु जाणा ।

करकरीतु परिभ्रमणा । अविश्रम जाणा भोंवतसे ॥१४०॥

तेवीं बांधोनि ज्ञानाचे डोळे । भोगूं जातां निजकर्मफळें ।

तंव जन्ममरणांचे सोहळे । भोगी आगळे अनिवार ॥४१॥

उदोअस्तांचेनि प्रमाणें । जैसें सूर्यासी पडे भंवणें ।

तैशीं हीं जन्ममरणें । अतिदारुणें स्वयें सोशी ॥४२॥

शिणशिणों जंव जन्म कंठी । सवेंच मरण ये त्यापाठीं ।

जैसीं जावळीं फळें एक देठीं । तैशा जन्ममरणकोटी भोगी स्वयें ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP