TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
अग्नौकरण

धर्मसिंधु - अग्नौकरण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अग्नौकरण

आता अग्नौकरण सांगतो - गृह्याग्निमान्‌ आश्वलायनांनी व्यतिषंगाने श्राद्धप्रयोग असता गृह्याग्नीवर चरु शिजवून त्या चरूने गृह्याग्नीवरच अग्नौकरण करावे. व्यतिषंग प्रयोग नसेल तर ब्राह्मणाच्या हातावर होम करावा. श्रौताग्निमंतानी दर्शश्राद्धी व्यतिषंगाभाव असल्याने पाणिहोमच करावा. पूर्वेद्युःश्राद्ध व अन्वष्टक्य श्राद्ध या श्राद्धी दक्षिणाग्नीवर चरुःशपण व होम ही करावीत. निरग्निकांनी सर्वत्र ब्राह्मणाच्या हातावरच होम करावा. आपस्तंब शाखी इत्यादि श्रौताग्निमंत सर्वाधानी यांनी दक्षिणाग्नीवर चरुःशपण व होम हि करावी. अर्धाधानी व गृह्याग्नियुक्तांनी गृह्याग्नीवरच करावी. प्रवासात असणार्‍यांनी व 'निरग्निकांनी अयाश्चाग्नेमनोज्योतिरुब्दुष्टयध्वं' व व्याह्रति यांचा होम करून उत्पन्न केलेल्या लौकिकाग्नीवर होम करावा, व अग्नीचे विसर्जन करावे. या आपस्तंबादिकांस पाणिहोम कोठेही सांगितला नाही. पाक करणे तो पचनाग्नीवरच करावा. गृह्याग्नियुक्त कात्यायनांनी गृह्याग्नीतून अग्नि घेऊन त्या पचनाग्नीवर पाक व अग्नौकरण गृह्याग्नीवरच करावे. श्रोताग्नियुक्त असून सर्वाधान पक्ष असेल तर दक्षिनाग्नीवर अग्नौकरण व अर्धाधान पक्ष असेल तर गृह्याग्नीवर अग्नौकरण करावे. असे काशिका ग्रंथात सांगितले आहे. कात्यायनास अर्धाधानपक्ष योग्य आहे असे वाटते. निरग्निक कात्यायनांनी अपसव्यादिकाने पितरांकडच्या पहिल्या ब्राह्मणाचे हस्तावरच अग्नौकरण करावे, याविषयी दोन पक्ष, देवाकाच्या ब्राह्मणाचे हस्तावरच सव्याने होम करावा. असे दोन पक्ष जाणावे. ऋग्वेदी यांनी पितरांकडचे ब्राह्मणांचे हस्तावरच प्रत्येक ब्राह्मणाचे ठायी होम करावा. वाजसनेयी यांनी एक होमच करावा, असे श्राद्ध काशिका ग्र्थात कातीय सूत्राच्या वृत्तीत सांगितले आहे. कित्येक 'पृष्टोदिवि' या विधानाने अग्नि उत्पन्न करून अग्नीमध्येच अग्नौकरण होम करितात. साग्निक सामगादिकांनी अग्नीवर अग्नौकरण करावे. अग्नी संनिध नसेल तर देवाकडचे ब्राह्मणाचे हस्तावर किंवा पितराकडचे ब्राह्मणाचे हस्तावर करावे. निरग्निक असतील तर देवाकडचे ब्राह्मणाचे हस्तावरच करावे. मृतपत्निक अपत्नीकाने पहिल्या देवब्राह्मणाचे हस्तावरच होम करावा. पितरांकडच्या ब्राह्मणाचे हस्तावर करू नये. याप्रमाणे हा निर्णय सर्वसाधारण जाणावा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-28T23:25:38.8530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

unit of sale

  • विक्री घटक 
RANDOM WORD

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site