TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
एकच ब्राह्मण असेल तेव्हा

धर्मसिंधु - एकच ब्राह्मण असेल तेव्हा

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


एकच ब्राह्मण असेल तेव्हा

जेव्हा एकच ब्राह्मण असेल तेव्हा विश्वेदेवस्थानी शिवलिंग किंवा शाळिग्राम स्थापून सर्व श्राद्ध करावे. देवांचे अन्न अग्नीत टाकावे किंवा ब्रह्मचार्‍यास द्यावे. तीन स्थानी मिळून १ ब्राह्मण सांगावा. असा जो पक्ष तो सपिंडीकरणातून अन्यत्र जाणावा. सपिंडीकरणात तर पार्वणास तीनच ब्राह्मण सांगावेत. नांदीश्राद्धात देवस्थानी २ व प्रत्येक पार्वणी २।२। मिळून ८ ब्राह्मण निकृष्टपक्षी असावेत. संपत्ति असल्यास देवस्थानी ४ व प्रत्येक पार्वणी ४ याप्रमाणे १६ असे देवस्थानी व पितृस्थानी सम ब्राह्मण सांगावेत हा विशेष आहे. सर्वथा ब्राह्मण न मिळतील तर दर्भमय बटु करून प्रेष, अनुप्रेष यासहीत सर्व श्राद्ध करावे. या दर्भ बटुश्राद्धी अनुकूलरूप दृष्ट प्रयोजन नसले तरी अदृष्ट फळाकरिता दक्षिणा द्यावी. याप्रमाणे संन्याशी श्राद्धात बसला असताही त्यास दक्षिणा द्यावी. दर्भ बटूस दिलेली दक्षिणा अन्यकाली दुसर्‍यास द्यावी अथवा जो मनुष्य पूजिलेले लिंग किंवा शाळग्राम देवपितृस्थांनी पीठावर ठेवून श्राद्ध करितो त्याचे पितर कल्पकोटि शतपर्यंत स्वर्गी राहतात. ब्राह्मणास श्राद्धाचे निमंत्रण करावयाचे ते पूर्वदिवशी किंवा श्राद्धदिवशीच करावे व श्राद्धसंबंधी नियम आपण करुन ब्राह्मणाकडून श्रवण करवावेत. ते नियम असे. "श्राद्धकर्ता जो मी व श्राद्धभोक्ते ब्राह्मण जे तुम्ही त्या सर्वांना क्रोधरहित, शौचतत्पर व निरंतर ब्रह्मचारी स्थितीत असावे."

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-28T22:52:20.8300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर

  • जो मनुष्य राजदरबारामध्यें आपलें काम करून देण्यास उपयोगी पडतो. त्याला स्वतःला कांहीं तरी पैशाची प्राप्ति व्हावी अशी अपेक्षा असते. दरबारी मनुष्य दुसर्‍याच्या उपयोगी पडतो तो लांचखाऊ असतो. 
RANDOM WORD

Did you know?

चातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.