TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५३

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५३

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय ५३

श्रीगणेशाय नमः ॥

शास्त्रसंख्यावदन जियेचे ॥ गुण वर्णिता थके तियेचे ॥ एकमुखे या मनुष्यवाचे ॥ काय वानू मंद मी ॥१॥

परी हस्त बाळकाचा ॥ धरोनि लिहवी गुरू तयाचा ॥ तैसा कृष्णाप्रसादाचा ॥ ग्रंथविचार हा असे ॥२॥

मदनदहनतनय मुनीसी ॥ म्हणे गोतीर्थपूर्वभागेसी ॥ प्रमाण पन्नास धनु जयासी ॥ परिसा अनंत तीर्थ ते ॥३॥

जेथे गरुडापासोनि भीति ॥ धरोनि अनंते लिंगाप्रती ॥ स्थापोनि केले तप आणि चिंती ॥ शयन हरीचेचि होईन ॥४॥

यापरी लोटता कित्येक दिन ॥ हरिहर जाहले तया प्रसन्न ॥ तेथे येवोनि अभयवचन ॥ देवोनि करिती अमरही ॥५॥

शयन व्हावे तुवा माझे ॥ बोलोनि ऐसे वैकुंठराजे ॥ उमावरासह तात्काळ निजे ॥ शेजेवरी तयाचे ॥६॥

स्पर्श होता शंकराचा ॥ शांत जाहला ताप शेषाचा ॥ म्हणे जन्मा आलियाचा ॥ लाभ जाहला आजचि ॥७॥

तव पातले ब्रह्मादिदेव ॥ वेदतीर्थे मुनिपुंगव ॥ देखोनि फणावरि शिव माधव ॥ स्तवन करिती सर्वही ॥८॥

पुष्पवर्षाव अमरगण ॥ करिती गाती गंधर्वचारण ॥ तदा अनंतही वरप्रदान ॥ मागे हरिहरांसी ॥९॥

माझेचि नामे हे तीर्थ हो ॥ अंश तुमचाही येथ राहो ॥ तीर्थ सुरांचा तयापरी अहो ॥ हेचि मागणे तुम्हांला ॥१०॥

ऐसे परिसोनि नारायण ॥ तथास्तु बोलोनि देत वचन ॥ येथ करिता स्नान दान ॥ फल अनंत होतसे ॥११॥

शिव म्हणे जे स्नान येथे ॥ करोनि भक्तीने पूजिती माते ॥ पावती ते परम सुखाते ॥ ब्रह्मादि बोलती यापरी ॥१२॥

मग तेथेचि जाहले गुप्त ॥ ऐसे प्रसिद्ध हे अनंततीर्थ ॥ हरिहरात्मक लिंग तेथ ॥ अद्यापि शिलात्म फणावरी ॥१३॥

पाच नामे आणीक असती ॥ सिद्ध जाणती तयांप्रती ॥ पुण्यदृश्या नाम देता ॥ शिळेप्रती दुजे हो ॥१४॥

अनंततीर्थी करोनि स्नान ॥ हरिहरात्मक लिंगपूजन ॥ शेषास भक्तीने करा नमन ॥ जपा मंत्र यापरी ॥१५॥

मंत्रम्‍ ॥ योनन्तो धरणी धत्ते योनन्तः सचराचरः ॥ योनन्तस्त्वं च विश्वेशः त्रीनन्तान्नतोऽस्म्यहम्‍ ॥१६॥

यापरी अनंत थोरी ॥ श्रवण करिता कुलवृद्धि करी ॥ सर्परोगादि भय निवारी ॥ पठण करिता भक्तीने ॥१७॥

अनंताचे पूर्व बाजूसी ॥ शंभर धनु प्रमाणेसी ॥ सुर्यतीर्थ ते देत सिद्धीसी ॥ सोमेश पश्चिमेसि जयाचे ॥१८॥

तेथ महर्शी पावमान्य ॥ तप करोनि असामान्य ॥ सूर्या करोनि ध्यानगम्य ॥ करी स्तवन भक्तीने ॥१९॥

अव्यक्त सविता दिसमणी ॥ स्मार्त त्रयीमय बालतरणी ॥ शुद्धबुद्ध ध्येय मनी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२०॥

जैसे रवी ग्रीष्मामाजि गवत ॥ तैसेचि जाळी भक्तदुरित ॥ तूचि परिपूर्ण जग समस्त ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२१॥

सकल जगाचा संहार करी ॥ सृष्टिकर्ता स्वच्छंदचारी ॥ हितकर्ता चक्रधारी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२२॥

ब्रह्मादिभूसुर संध्यासकाळी ॥ देती तुजलाचि उदकांजुली ॥ तूचि आयुष्यदाता त्रिकाळी ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२३॥

जन्ममृत्यु जराव्याधी ॥ नष्ट करिसी तू दयाब्धि ॥ तूचि अंतमध्यआदि ॥ भक्तिगम्य श्रीहरी ॥२४॥

यापरी स्तविता चंडभानू ॥ आला होवोनिया प्रसन्नू ॥ देखोनि करी साष्टांग नमनू ॥ पावमान्य मुनी तो ॥२५॥

भक्तवत्सल दिवाकर ॥ म्हणे ऊठ बा ऊठ लवकर ॥ माग वाटेल तो वर ॥ स्तोत्रतपे मी तोषलो ॥२६॥

ऐसे ऐकून पावमान्य ॥ म्हणे रोग असे जो भवजन्य ॥ त्यासि औषध ज्ञानावीण अन्य ॥ कैसे असेल सांग भो ॥२७॥

परिसोनि मुनीची विनंती ऐशी ॥ तथास्तु बोले विश्वसाक्षी ॥ म्हणतील सूर्यतीर्थ यासी ॥ आजपासोनि गा मुने ॥२८॥

माझे येथे जाहले येणे ॥ दिसेलही शिळा ताम्र तेणे ॥ येथे करोनि स्नान भक्तीने ॥ पूजोन सोमेश वंदिजे ॥२९॥

तुवा जे का स्तोत्र केले ॥ तेणे जयांनी मला स्तविले ॥ तयालाही भक्तिने वरिले ॥ ज्ञानसंतती कराया ॥३०॥

यापरी तीर्थासि मुनीसि वर ॥ देवोनि गेला दिवाकर ॥ ऐसे सुर्यप्रसादकर ॥ सूर्यतीर्थ मुनी हो ॥३१॥

पुढे पवित्र कोटितीर्थ ॥ शिळासेतू जेथ पर्यंत ॥ दिसे जेथे मुनी सप्त ॥ स्नानासि पातले दुपारी ॥३२॥

एकेक ऋषि कोटितीर्थे ॥ म्हणे यावीत आतांचि येथे ॥ तव पातली तदा तेथे ॥ तीर्थे सप्त कोटीही ॥३३॥

मग करिती स्नान ते मुनी ॥ कोटितीर्थ नाम तेथुनि ॥ जेथे श्राद्ध जप करोनि ॥ सप्तकोटिगुण फल असे ॥३४॥

पुढे असे चक्रतीर्थ ॥ जेथे शिळेवरी जगन्नाथ ॥ बैसोनि सांगे जनहितार्थ ॥ अंबरीष नृपासि ॥३५॥

अगा भूपते हे सुदर्शन ॥ दावील तीर्थ जे का जाण ॥ तेचि उत्तम ज्ञानसाधन ॥ बोलोनि ऐसे फेकिले ॥३६॥

तदा चक्र ते दावी तीर्थ ॥ म्हणोनि म्हणती चक्रतीर्थ ॥ कात्यायनी निकट जेथ ॥ अंबरीष वसतसे ॥३७॥

चक्रतीर्थी सहा मास ॥ राहोनि हरीचा होवोनि दास ॥ चुकवी संसार चक्रवास ॥ चक्रधरप्रसादे ॥३८॥

चक्रतीर्थाचे पूर्व बाजूला ॥ जेथे शंखाकृती शिळा ॥ तेचि शंखतीर्थ बोला ॥ पुण्यकारक मुनी हो ॥३९॥

एकदा श्रीकृष्ण दक्षिणेसी ॥ जात असता दिग्जयासी ॥ कृष्णातटी निजकर्तव्यासी ॥ मध्याह्नकाळी उतरला ॥४०॥

शंखे आणोनिया पाणी ॥ स्थापी लिंगासी चक्रपाणी ॥ आणी म्हणे की पुण्यखाणी ॥ होईल तीर्थ मुनी हो ॥४१॥

जेथे शिळेवर चिन्ह केले ॥ शंखे हरीने तीर्थ जाहले ॥ शंखनामक तेचि बोले ॥ विश्वेश्वराचा बाळक ॥४२॥

पुढे संगम महातीर्थ ॥ प्रलापहारिणी तट यावत ॥ पापीजनाला कदा प्राप्त ॥ नोहे अगम्य महिम जे ॥४३॥

विस्तार जयाचा कोस मात्र ॥ उत्तम यापरी संगमक्षेत्र ॥ भुक्तिमुक्तिचे वाढिले पात्र ॥ क्षुधित भक्ताकारणे ॥४४॥

वेद तेथे जेथ प्रणव ॥ जेथे सदाशिव तेथे देव ॥ तीर्थे संगमी तैसीच सर्व ॥ वास करिती निश्चये ॥४५॥

जेथे राहता संसार ॥ चुके म्हणोनि शिवक्षेत्र ॥ तैसेचि बोलती सिद्धिक्षेत्र ॥ पुण्यक्षेत्र मुनी हो ॥४६॥

वराहाचे उत्तरेसी ॥ देश दक्षिण संगमासी ॥ माझे क्षेत्र व्योमकेशी ॥ म्हणे ऐसे निजमुखे ॥४७॥

घटपासंगमी रामेश्वरी ॥ अमरकंटकी श्रीशैल्यगिरी ॥ महास्मशानी प्रभासक्षेत्री ॥ सदा राहतो मी म्हणे ॥४८॥

काशीमाजी जो विश्वेश्वरा ॥ संगमतीर्थी संगमेश्वरा ॥ देखोनि नमितो रामेश्वरा ॥ संसारफेरा चुकवी तो ॥४९॥

घटपासंगमी लिंगरुपी ॥ त्रिधा होवोनि तीर्थरूपी ॥ राहे सदाशिव क्षेत्ररूप ॥ भक्तकल्याण कराया ॥५०॥

जैसा काशीमाजी ओंकार ॥ कृत्तिवास कपर्दीश्वर ॥ तैसा घटपासंगमी हर ॥ लिंगरूपीही अष्टधा ॥५१॥

नामे तयांची ऐक आता ॥ रामेश शंकर शशी भारता ॥ बोलती अर्क यज्ञामृता ॥ पंचभूतेश आठवा ॥५२॥

लिंगाष्टकाचा महिमा अनंत ॥ सांगे गौरीस तिचा कांत ॥ तोचि परिसोनि पार्वतीसुत ॥ सांगे सनकादि मुनींसी ॥५३॥

संगमक्षेत्री लिंगपंचक ॥ तेथोनि शतद्वय कार्मुक ॥ अंतर जया तेथेचि देख ॥ चरणद्वय शिवाचे ॥५४॥

ब्रह्मकपालधारक शिव ॥ पंचलिंगमय देखोनि देव ॥ करी पूजन धरोनि भाव ॥ तीर्थयात्रेमजि पै ॥५५॥

पुढे शिवाचे उभय चरण ॥ भुक्तिमुक्तीस जे कारण ॥ करिताचि जेथे पिंडप्रदान ॥ मोक्षासि पितृगण पावती ॥५६॥

संगमी राहता तीन रात्र ॥ पापे न राहती किंचिन्मात्र ॥ मास राहता पूर्वदोष सर्वत्र ॥ दूर होती निश्चये ॥५७॥

एक वर्षे सलोकता ॥ मरणे तात्काल सायुज्यता ॥ हा अध्याय श्रवण करिता कृष्णाकृपापात्र तो ॥५८॥

लंबोदराग्रज म्हणे मुनींसी ॥ पुढे मिळाली कृष्णावेणीसी ॥ मलापहा ती कथा तुम्हांसी ॥ सांगेन कृष्णाप्रसादे ॥५९॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ त्रेपन्नावा अध्याय हा ॥६०॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये संगमतीर्थवर्णनं नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥५३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:28:22.0670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

chondriosome

  • Bot., Zool. (also mitochondrion or chytomicrosome) तंतुणिका (स्त्री.) (तंतु + कणिका) 
  • कलकणु 
  • सूक्ष्मजंतू व निळी शैवले याखेरीज इतर वनस्पतींत आढळणारा आणि विशेषत्व पावलेला कोशिकेतील प्राकलातील सूक्ष्म कण, हा प्रथिन व मेद (चरबी) यांचा बनलेला असून अनेक वितंचके अशा कणांपासून निर्माण होतात. 
  • = mitochondria 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

ADHYAY 43 OF GURUCHARITRA IS WRONGLY PRINTED AND ADHYAY 47 AND 48 ARE SAME KINDLY CHANGE or make correction for it
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.