TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय ३४

श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णा वामनरूपिणी येता ॥ वाटे भक्तबली चित्ता ॥ द्यावी आपुली सकल मत्ता ॥ अप्री सत्ताचि राहिली ॥१॥

कृष्णाचि अवघी रंगली चित्ती ॥ ऐसे देखोनि श्रोतयांप्रति ॥ म्हणे अमरसेनापती ॥ ऐका भक्तिरसिक हो ॥२॥

वेदसंगमापासाव असे ॥ नागतीर्थ ते दोन धनुषे ॥ जेथ करिता स्नान नाशे ॥ दद्रुकुष्टादि रोगही ॥३॥

स्नान करोनी नागतीर्थी ॥ जळी पाहता नागपती ॥ कदा नसे गा सर्पभीते ॥ सत्यवतीसुत म्हणे ॥४॥

पुढे कृष्णा पूर्ववाहिनी ॥ दोन बाणांतरी तेथुनी ॥ वायुतीर्थ अहो मुनी ॥ वातेश्वरसन्निध ॥५॥

गंधर्वतीर्थ असे पुढे ॥ स्नानेचि जेथे पुण्य रोकडे ॥ गंधर्वेश्वर पूजिता झडे ॥ दोष जन्मांतरींचे ॥६॥

पुढे प्रमाण दहा धनु ॥ तीर्थ हो ते पापनाशनु ॥ जेथ आश्रम परम शोभनु ॥ असे कहोळमुनीचा ॥७॥

कृष्णामाऊलीचरणकमळ ॥ मनी आणोनि बहुत काळ ॥ तप करीतचि होता कहोळ ॥ भक्ति सोज्वळ मुनि हो ॥८॥

पाहोनि तयाचि एकनिष्ठा ॥ कृष्णामाउली जाहली तुष्टा ॥ म्हणे सोसिले किमर्थ कष्टा ॥ बापा स्पष्टा सांग तू ॥९॥

तप करी जो माझिये तीरी ॥ तया देईन ही वैकुंठपुरी ॥ काय इच्छा बा तुझे अंतरी ॥ सांग सत्वर कोहळा ॥१०॥

परिसोनि ऐसी अमृतवाणी ॥ आनंदोनिया कहोळमुनी ॥ म्हणे धन्य हो पिताजननी ॥ नयनी कृष्णा देखिली ॥११॥

कृष्णातरंगज वायु केवळ ॥ लागता जाहले मुक्त पुष्कळ ॥ ऐसे ऐकोनि मज दुर्मिळ ॥ भक्ति उपजली तव पदी ॥१२॥

कलीत होतील लोक पापी ॥ उद्धार तयांचा नोहे कदापि ॥ ऐसे जाणोनि वर्तलो तपी ॥ मुक्त कराया जनांसी ॥१३॥

कृष्णामाजी स्नान दाने ॥ भक्तिपुरःसर करिता द्विजाने ॥ मेळवावी निश्चयाने ॥ मुक्ति हेचि मला दे ॥१४॥

जे का तुझे तीरवासी ॥ तेही तीर्थश्राद्धजपासी ॥ करिता मिळवोत मुक्तीसी ॥ हेचि देणे मला दे ॥१५॥

ऐसे ऐकता म्हणे तथास्तु ॥ दुजा देते वर ऐक तू ॥ नामे तुझिया हे तीर्थू ॥ मोक्षासि हेतु होईल ॥१६॥

यात्रा करावया येता दुरोनी ॥ प्रवर्तावे प्रथम मुंडनी ॥ उपवास कराया ते दिनी ॥ स्नान दान करावे ॥१७॥

पुढे विप्रांसी सदक्षिण ॥ द्यावे पक्वान्नभोजन ॥ तयांचे किती पुण्यप्रमाण ॥ नये सांगता मुनि हो ॥१८॥

यापरी बोलोनि कृष्णावेणी ॥ गुप्त जाहली तेचि क्षणी ॥ ऐसे कहोळतीर्थ तेथोनी ॥ निकत शिळातीर्थ पै ॥१९॥

शिळातीर्थी सहा महिने ॥ स्नान करिता अनुक्रमाने ॥ काया होतसे शिळेप्रमाणे ॥ तया नराची बळकट ॥२०॥

जया ठायी गवत पाला ॥ पडता सहा महिन्यात शिळा ॥ होय म्हणोनी नाम शिळा ॥ तया तीर्थासि बोलती ॥२१॥

याज्ञवल्क्यासि म्हणे व्यास ॥ जेथे आश्रम दो तटांस ॥ सिद्ध साधक मुनी वास ॥ करिती कृष्णेसि भजाया ॥२२॥

हा अध्याय उषःकाळी ॥ ऐकोनि होतसे दुःखहोळी ॥ पुढे तोषेल चंद्रमौळी ॥ दक्षप्रजापतीस हो ॥२३॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चवतिसावा अध्याय हा ॥२४॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कहोळशिलातीर्थवर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥३४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:27:55.6430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गट्टी

 • स्त्री. ( ना . ) दगडाची खडी . 
 • ना. एकी , गाढ स्नेह , दाट मैत्री , निकट संबंध , सलगी . 
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.