TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३०

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३०

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


अध्याय३०

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय भक्तचकोरचंद्रे ॥ कृष्णावेणी गुणसमुद्रे ॥ नष्ट करी हो सकल अभद्रे ॥ आश्रय माते देऊनी ॥१॥

ऋषीश्वरासी स्कंद म्हणे ॥ परिसा कथाहो सावध मने ॥ केला होता याज्ञवल्क्याने ॥ प्रश्न उत्तर तयाचे ॥२॥

म्हणे व्यास याज्ञवल्क्याला ॥ अगा जाणिजे ही प्रेतशिळा ॥ पिंड जेथे पूर्वजांला ॥ देता प्रेतत्व नष्ट करी ॥३॥

पूर्वी भगीरथ पुण्यखाणी ॥ सूर्यवंशशिरोमणी ॥ होता राजा इये अवनी ॥ महाज्ञानी धार्मिक ॥४॥

पितर तयाचे सगर सकळ ॥ जाळिता जाहला मुनी कपिल ॥ प्रेतत्व पावले ते केवळ ॥ ऐसे भूपाळ समजला ॥५॥

तदा वाटोनि मनी खेद ॥ जावोनि मुनीचे धरी पाद ॥ म्हणे पितर जाहले दग्ध ॥ कपिलकोनामुळे हो ॥६॥

प्रेतत्व जाहले तया सगरा ॥ सांगा उपाय मुक्तीचा खरा ॥ शरण आलो दयासागरा ॥ करा कृपा झडकरी ॥७॥

नीलवृषोत्सर्ग केला ॥ परी मनोरथ व्यर्थ झाला ॥ ऐसे ऐकोनि भगीरथाला ॥ मुनी बोलती सकळही ॥८॥

धन्य धन्य भगीरथा ॥ यत्‍न करिसी पितृभक्ता ॥ पुत्र जन्मला तोचि वृथा ॥ जो का न तारी पितरांसी ॥९॥

सगरांसि व्हावी गती विमला ॥ ऐसे इच्छिसी तरी नृपाळा ॥ कृष्णातटी जी प्रेतशिळा ॥ आहे जाई तेथ तू ॥१०॥

श्राद्ध सपिंड यथाविधी ॥ करोनि तेथे स्नान आधी ॥ देई गो भू हिरण्यादि ॥ फोडी सजल कुंभही ॥११॥

पिंड सातूचा तिळमिश्रित ॥ ठेवोनि शिळेवरी भक्तियुक्त ॥ मंत्र म्हणावा हाचि तेथ ॥ ऐक भगीरथराजया ॥१२॥

मंत्र ॥ ये केचन गता यत्र ह्यग्निमंत्रविवर्जिताः ॥ विषोद्वंधजलादिभ्यते गच्छन्तु गति शिले ॥१३॥

नंतर करावी रामगया ॥ अर्पी पितरांसि दधिपया ॥ तर्पण करितांचि गा राया ॥ होतील सगर मुक्त पै ॥१४॥

यापरी मुनीचे वचनामृत ॥ कानी पडताचि भगीरथ ॥ ऋष्युक्त करोनी कर्म जेथ ॥ तारिता जाहला सगरांशी ॥१५॥

ती ही असे गा प्रेतशिळा ॥ काय वान इची लीला ॥ परो यथामति वर्णिली तुला ॥ व्यास म्हणाला यापरी ॥१६॥

याज्ञवल्क्य तपोनिधी ॥ व्यासही विष्णुतीर्थामधी ॥ स्नान करोनि सकल विधी ॥ करिती शिळेवरी मुनी हो ॥१७॥

गयेमाजी पिंडपात ॥ करोनि दोघे भक्तियुक्त ॥ विष्णुपदासि पूजिती त्वरित ॥ भूतनायकसुत म्हणे ॥१८॥

कृष्णेचिया पश्चिमतटी ॥ रामलिंगा पाहिले दृष्टी ॥ पंचामृत सुगंधउटी ॥ अर्पूनि पूजिती उभयतां ॥१९॥

बोलोनिया अनुवाक अकरा ॥ स्नान घातले पार्वतीवरा ॥ करोनि साष्टांग नमस्कारा ॥ स्तोत्रासि दोघे बोलती ॥२०॥

जय जय भीमपराक्रमा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ देवाधिदेवा ह्रदयरामा ॥ रामलिंगा शरण मी ॥२१॥

चंद्रशेखर महादेवा ॥ भवभयनाशना सदाशिवा ॥ फणींद्रभूषणा गिरिजाधवा ॥ रामलिंगा शरण मी ॥२२॥

व्योमकेशा गिरीशा हरा ॥ कालकूटधरा भर्गशंकरा ॥ नेत्रत्रयगंगाधरा ॥ रामलिंगा शरण मी ॥२३॥

हे धूर्जटे वेदवेद्या ॥ महाकाया त्रैलोक्यवंद्या ॥ अंधकारे ओंकार सत्या ॥ रामलिंगा शरण मी ॥२४॥

यापरी करिता स्तवन दोघे ॥ लिंगापासाव शब्द निघे ॥ मन इच्छित तेचि मागे ॥ याज्ञवल्क्य व्यासजी ॥२५॥

ऐसा ऐकता मधुर शब्द ॥ उभयताही जाहले स्तब्ध ॥ अंगी रोमांच कंठ सद्‌गद ॥ नयनी आनंदजल भरे ॥२६॥

नावेक होवोनि ऐसी स्थिती ॥ नंतर उभयतां वर मागती ॥ रामलिंगी तुझी वसती ॥ असो धूर्जटी सदाही ॥२७॥

होई भक्तासी कामधेनू ॥ जोवरी आहेत चंद्रभानू ॥ ऐसे ऐकता उमारमणू ॥ दोघांसि म्हणू लागला ॥२८॥

इच्छा होईल पूर्ण तुमची ॥ असो जे का रामलिंगाची ॥ केली स्तुती तुम्ही साची ॥ तेणेचि स्तविती जे मज ॥२९॥

तयांचीही मनकामना ॥ पूर्ण करीनचि सत्य जाणा ॥ बोलोनि ऐसे कैलासराणा ॥ गुप्त जाहला सवेचि ॥३०॥

रामलिंगी तेज गुप्त ॥ जाहले देखोनि अति विस्मित ॥ होवोनि मुनी नमन करित ॥ भक्तिभावेकरोनी ॥३१॥

आता पुढे याज्ञवल्क्या ॥ व्यास सांगेल रामगया ॥ भक्तिवांचोनि सकळ वाया ॥ सायास केवळ मुनी हो ॥३२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अध्याय तिसावा गोड हा ॥३३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये प्रेतशीलाविष्णुतीर्थकथनं नाम त्रिंशत्तिमोऽध्यायः ॥३०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-26T23:27:51.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

board of director

 • संचालक मंडळ 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.