मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
संध्येचे प्रायश्चित्त

धर्मसिंधु - संध्येचे प्रायश्चित्त

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


जे द्विज नियमाने संध्येची उपासना करतात ते निष्पाप होऊन ब्रह्मलोकाला जातात. जे संध्या करीत नाहीत ते अशुचि होत, म्हणून त्यांना अन्य कर्माचे फळ प्राप्त होत नाही. ते जिवंत असता शूद्र होत व मेल्यावर निश्चयाने श्वानाच्या जन्माला जातात. तीन संध्यांच्या कालाचा अतिक्रम होईल तर प्रायश्चित्त म्हणून एकेक अर्घ्य अधिक देऊन रात्री एक प्रहरापर्यंत दिवसास उक्त अशी कर्मे करावी. रात्री ब्रह्मयज्ञ व सौर मात्र वर्ज्य करावे. संध्येचा सर्वथा लोप होईल तर प्रत्येक लोपाबद्दल एक उपवास अथवा दहा हजार अथवा १००८ गायत्रीजप करावा. अति सशक्त असेल त्याने प्रत्येक संध्येच्या लोपाबद्दल १०० गायत्रीजप करावा. दोन दिवस अथवा तीन दिवस संध्येचा लोप होईल तर वरील प्रायश्चित्ताची आवृत्ति करावी. यापेक्षा जास्ती दिवस लोप होईल तर कृच्छ्रादि प्रायश्चित्त करावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP