TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
घरी उष्णोदकाने स्नान

धर्मसिंधु - घरी उष्णोदकाने स्नान

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


घरी उष्णोदकाने स्नान

घरी स्नान करावयाचे ते उष्णोदकाने करावे, शीतोदकाने करू नये. त्याचा विधि पात्रामध्ये शीतोदक घालून त्यावर उषोदक घालावे.

"शंनो देवी० । आपः पुनं तु० । द्रुपदादिवे० । ऋत च० । आपोहिष्ठा० ।"

या पाच ऋचांनी ते उदक अभिमंत्रण करून

"इमं मे०"

इत्यादि मंत्रांनी तीर्थाचे स्मरण करीत स्नान करावे. गृहस्नानाविषयी संकल्प, आचमन, अघमर्षण आणि तर्पण ही नाहीत. स्नानानंतर आचमन व मार्जन ही करावी. याप्रमाणे स्नान केल्यावर वस्त्राने अथवा हाताने अंगावरील पाणी न पुसता कोरडे कापसाचे वस्त्र परिधान करून वरच्या बाजूने ओले वस्त्र काढावे. कच्छरहित (कासोटा न घातलेला), उत्तरीय वस्त्ररहित, नग्न, वस्त्ररहित अशा पुरुषाला श्रौत अथवा स्मार्त कर्माविषयी अधिकार नाही. दुहेरी वस्त्र धारण करणारा, दग्धवस्त्र धारण करणारा, शिवलेले व ग्रंथियुक्त वस्त्र धारण करणारा. भगवे वस्त्र धारण करणारा आणि दिगंबर हे सर्व नग्न होत. पिळलेले वस्त्र खांद्यावर ठेवू नये. वस्त्र पिळावयाचे ते घरी चोहेरी करून खाली दशा करून भूमिवर पिळावे, नदीच्या काठी वर दशा करून पिलावे. तिहेरी वस्त्र पिळू नये. ज्यांचा पिता व ज्येष्ठ भ्राता जिवंत आहे त्यांनी उत्तरीय वस्त्र धारण करू नये. पांघरावयाचे वस्त्र सर्वांनी धारण करावे. याप्रमाणे नित्य असे प्रातःस्नान सांगितले. (मध्याह्नस्नान देखील नित्य आहे असे कोणी ग्रंथकार म्हणतात)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-29T20:13:56.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका

  • लहानसेंच काम करीत असतां एखादा मनुष्य खूप आरडाओरड गाजावाजा करीत असतो 
  • पण एखादें मोठें काम समोर दिसलें म्हणजे उगाच आपणास करावें लागून त्रास होईल म्हणून अशावेळीं बाजूला राहतो. 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site