TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
कन्येला रजोदर्शन झाल्यास

धर्मसिंधु - कन्येला रजोदर्शन झाल्यास

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कन्येला रजोदर्शन होईल तर निर्णय

विवाह होण्याचे पूर्वी कन्येला रजोदर्शन होईल तर तिची माता, पिता व भ्राता यांना नरक प्राप्त होतो, कन्येला वृषलीत्व येते. आणि तिच्या भर्त्याला वृषलीपतित्व येते. याविषयी शुद्धीचा प्रकार-कन्येचे दान करणाराने जितके वेळा ऋतु प्राप्त झाला असेल तितकी गोप्रदाने अथवा एक गोप्रदान अथवा यथाशक्ति ब्राह्मणांना भोजन द्यावे म्हणजे तो कन्यादान करणारास योग्य होतो. कन्येने तीन दिवस उपवास करून गाईचे दूध प्राशन करून ब्राह्मणाचे कुमारीला रत्नयुक्त अलंकाराचे दान करावे म्हणजे ती विवाह करण्याला योग्य होते. वराने कुश्मांड होम करून कन्येला वरावी म्हणजे तो दोषी होत नाही. विवाहहोमाचे प्रसंगी रजोदर्शन होईल तर कन्येला स्नान घालून "युजान" या तैत्तिरीय मंत्राने प्रायश्चित्त होम करून होमतंत्र समाप्त करावे. जर दान करणारा नाही म्हणून कन्येला रजोदर्शन प्राप्त होईल तर तीन वर्षेपर्यंत वाट पाहून तिने स्वतः पति वरावा. अशा कन्येचे दान घेणार्‍या वरालाही दोष नाही. याप्रमाणे कन्येच्या रजोदोषासंबंधी निर्णय सांगितला.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-28T22:22:03.3700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

एका मुठीनें

  • एकदम 
  • एकाच हप्त्यानें, एकाच वेळीं ( रुपये देणें घेणें, फडशा पाडणें ). 
RANDOM WORD

Did you know?

देवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site