TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
कुंड व गोलक

धर्मसिंधु - कुंड व गोलक

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


कुंड व गोलक

पति जिवंत असता जारापासून उत्पन्न झालेला तो कुंड; आणि पति मरण पावल्यावर जारापासून उत्पन्न झालेला तो गोलक. कुंड व गोलक यांचे संस्कार करावे असे जे वचन आहे ते इतर युगांविषयी होय. कारण ते वचन क्षेत्रज्ञ पुत्रासंबंधी वचनांपैकी आहे. कलियुगात दत्तक व औरस यांवाचुन इतर पुत्रांचा निषेध सांगितला आहे. "गर्भाधानापासून आरंभ करून जे संस्कार सांगितले आहेत ते ज्येष्ठ पुत्राचे होण्याच्या अगोदर कनिष्ठ पुत्राचे (समान संस्कार ) करू नयेत" असे शातातपाचे वचन आहे. हे वचन चौलापासून उपनयनापर्यंतच्या संस्कारासंबंधाने आहे. विवाहासंबंधी विकृतांग इत्यादिकांविषयी हा नियम नाही. कन्येसंबंधाने देखील ज्येष्ठ कन्येचा विवाह झाल्यानंतरच कनिष्ठ कन्येचा करावा. ज्येष्ठ पुत्राचा विवाह झाला नसेल तथापि कनिष्ठ कन्येचा विवाह करावा. ज्येष्ठ पुत्राचे उपनयन होण्याचे अगोदर कनिष्ठ कन्येचा विवाह करू नये.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-19T06:09:26.5570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

clinical trial

  • चिकित्सा परीक्षण 
RANDOM WORD

Did you know?

If the rituals after the death are not performed what are the consequences?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site