मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
देवा मजला दाखवा । हो देवा...

भक्ति गीत कल्पतरू - देवा मजला दाखवा । हो देवा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


देवा मजला दाखवा । हो देवा मजला दाखवा ।

त्या तुमच्या हो सुंदर रुपा । देवा मजला दाखवा ॥धृ०॥

चरण मृदु ते नवनीताहुनी । झुळझुळ गंगा वाहे त्यांतुनी ।

ऐसे चरण पाहीन नयनी । सांगा केधवा । हो देवा मजला दाखवा ॥१॥

चरण महिमा वर्णूं मी किती । पतीत पावन स्मरतां होती ।

ऐसी त्रैलोकीं ती ख्याती । असें माधवा । हो देवा० ॥२॥

निशिदिनीं चरण हृदयीं ध्यातां । मुक्त संसारीं करी निजभक्ता ।

नाही जन्म मरण वार्ता । पुनरपी ह्या जीवा । हो देवा० ॥३॥

चरणकमलीं भ्रमरी होवुनी । मोद प्रमोद सेविन प्रेमानी ।

वारीचा दृढ निश्चय जाणुनी । आंस ही पुरवा । हो देवा० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP