मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
जयजय आदिमाये , अनुसूये !...

आरती अनसूयेची - जयजय आदिमाये , अनुसूये !...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


जयजय आदिमाये, अनुसूये ! दत्तात्रय जननीये,

ओवाळूं आरती, पंचार्ती मृगराजाचल निलये ॥जय० ॥धृ॥

श्रीशुभसौभाग्य, सुवासिणी । मंडित कंकणपाणी ।

प्रसन्न वरद सदा, द्विजवाणी । लावण्याची खाणी ।

सद्‌गुण सत्वाची, शिराणी । अत्रिऋषीची राणी ।

तुजपुढें पतिव्रतेची कहाणी । न वदे व्यास पुराणीं ।

न करी प्रसादाची वाणी । धांव पाव निरवाणीं ।

जयजय देवहुतीचे तनये । तुजविण जगीं चेत नये ॥जय० १॥

शुभगुण शुभांगे शुभगात्रे । पावन परमपवित्रे ।

कुंकुम मळवट तांबुल वक्‍त्रें । कज्जल कुरंग नेत्रे ।

बाळ्या बुगडया मंगळसूत्रें । मुद राखडी फुलपत्रें ।

भौक्‍तिक रत्‍नमणी नक्षत्रें । हार कनकांबर छत्रें

अनंत खेळविसी स्वतंत्रे । ब्रह्मांडाचीं चित्रें ।

करुणा करि करुणाघनहृदये । श्रुत हृदयांबरिं उदये ॥जय० २॥

सिंहासन सिंहाद्रीवरती । शोभे सुंदरमूर्ती ।

श्रीहरिहर ब्रह्मादिक स्तविती । नारद तुंबर गाती ।

सन्मुनी नर नारी जन करिती । त्रिकाळ मंगळ आरती ।

चौघडे वाजंत्री वाजती । वेदध्वनी गर्जती ।

उदयाचळिं तुझिया अभ्युदये । प्रभु दिनकर उदया ये ॥जय० ३॥

पुरविसी अतीतांची अपेक्षा । किमपि न करिसी उपेक्षा ।

म्हणउनि पात्र करी अपेक्षा । श्रीशिवजीव परीक्षा ।

दुर्जय षड्रिपुसी करि शिक्षा । च्छेदुनि भव-भय-वृक्षा ।

प्रेमानंदाची दे भिक्षा । यतिची न पाहे परीक्षा ।

देशील पदकमळीं जरि साक्षा । तरि मग मागुं न मोक्षा ।

विष्णुस्वामी म्हणे, चातुर्ये । आत्मसाक्षिणी तुर्ये ॥जय० ४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP