TransLiteral Foundation

खंडोबाची आरती - जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


खंडोबाची आरती

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।

मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥

नानापरिची रचना रचिली अपार ।

तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥

जय देव जय देव शिवमार्तंडा ।

अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।

त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥

नाटोपे कोणास वरे मातला ।

देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।

मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।

चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।

अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥

मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।

देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥

अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।

देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अभ्यंतर

  • न. 
  • आंतील भाग ; अंतर्भाग ; गाभा ; मध्यभाग ; अंतरंग . आणि अभ्यंतरिलियेकडे । - ज्ञा १३ . ३८४ . 
  • मन ; ह्रदय ; अंत : करण . 
  • समाविष्ट झालेली जागा ; माजघर ; आंतील बाजू . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site