मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
निजलें जग; कां आतां इतक्...

राम गणेश गडकरी - निजलें जग; कां आतां इतक्...


राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


निजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला ।
काय म्हणावें त्या देवाला ?---" "वर जाउनि म्हण जा त्याला." ॥१॥

"तेज रवीचें फुकट सांडतें उजाड माळावर उघडया ।
उधळणूक ती बघवत नाहीं---" "डोळे फोडुनि घेच गडया." ॥२॥
"हिरवी पानें उगाच केलीं झाडांवर इतकीं कां ही ।
मातिंत त्यांचें काय होतसें ?---" "मातिस मिळुनी जा पाहीं !" ॥३॥
"पुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात ।
काय करावें जीव तळमळे---" "उडी टाक त्या पूरांत." ॥४॥
"ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त ।
भरती मूर्खांचीच होत ना ?" "एक तूंच होसी जास्त." ॥५॥
देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी ।

या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 25, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP